संदीप मोहोळच्या हत्येचा पॅटर्न काय होता? कसं जन्माला आलं पुण्यातलं गँगवॉर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुळशी पॅटर्न हा सिनेमा काही वर्षांपूर्वी चर्चेत होता. य़ा सिनेमात पुण्यातल्या गुन्हेगारी टोळया, अर्थकारण त्याच्याशी संबंधित असलेले राजकारण या सगळया घटकांचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले होते. मुळशी पॅटर्न हा सिनेमा नव्हता तर ते जळजळीत वास्तव होतं एक स्टेटमेंट होतं. पण मुळशी पॅटर्न या सिनेमाचा जो नायक होता किंवा काही जणांसाठी जो खलनायक होता राहुल पाटील उर्फ राहुल्या यांची भूमिका ज्या व्यक्तीवर बेतली होती त्याचीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

ADVERTISEMENT

90 च्या दशकात पुणे शहर आणि आसपासचे तालुके हे कात टाकत होते. पुणे म्हणजे पेन्शनरचे शहर, पुणे म्हणजे सायकलींचे शहर ही ओळख जाऊन या शहराची नवी ओळख बनत होती. पुणे हे नवे आयटी हब बनत होते. आंतरराष्ट्रीय कंपन्या शहरात येत होत्या अर्थातच यासाठी मोठ्या प्रमाणात जमीनींचे व्यवहार होऊ लागले होते.

हे वाचलं का?

जमिनी या सोन्यापेक्षा महाग झाल्या होत्या. पुणे शहर जसं वाढत गेलं तसंतसे पुण्याच्या पंचक्रोशीत ज्यांच्या जमिनी होत्या ते अल्पावधीत कोट्याधीश झाले. पैसा आला तशी सत्ता आली, राजकारण आले, हितसंबंध आले, हितसंबंध जपण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आणि याच स्पर्धेतून जन्म झाला तो पुण्यातल्या गँगवॉरचा, भाई लोकांचा आणि मुळशी पॅटर्नचा…..

या भाईगिरीचा, दादागिरीचा आणि वर्चस्वाच्या संघर्षातून पहिला खटका पडला तो 2005 मध्ये…मारणे टोळीतल्या अनिल मारणे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि खून करण्यात आला. 2006 मध्ये मारणे टोळीच्याच सुधीर रसाळची देखील हत्या करण्यात आली या दोन्ही खुनांचे आरोप होते संदीप मोहोळवर. संदीप मोहोळ हा मुळशी तालुक्यातल्या मुठा गावचा होता. संदीप मोहोळला पैलवानकीचा शौक होता. खूप लहान वयात संदीप गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळला होता. संदीप मोहोळचे वडील हे मार्केटयार्डमध्ये हमाली करायचे. घरची परिस्थिती ही बेताची होती.

ADVERTISEMENT

लहान वयापासून संदीप मोहळला जमिनीमध्ये पैसा आहे ही गोष्ट नीट कळली होती. 19 व्या वर्षीच संदीप मोहोळने सुधीर रसाळची टोळी जॉईन केली आणि त्यानंतर काही गंभीर गुन्हांमध्ये संदीप मोहोळचे नाव पुढे येऊ लागले.

ADVERTISEMENT

जमिनी रिकाम्या करणे, सातबारा क्लिअर करणं, जमिनीचे व्यवहार यातून संदीप मोहोळला मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागला.

पैसा हातात येताच संदीप मोहोळला वेध लागले ते राजकारणाचे…संदीप मोहोळ त्याच्या मुठा गावचा सरपंच झाला. यापुढेही जाऊन संदीप मोहोळने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि माथाडी कामगार संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला.राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही क्षेत्रांमध्ये संदीप मोहोळचा वावर होता.

दुसरीकडे मारणे टोळीचे दोन मेंबर मारल्यामुळे मारणे टोळी संदीप मोहोळच्या मागावर होती. दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वाचा वाद होता. जमिनीचा वाद होता मुळशी तालुक्यापासून कोथरुडपर्यंत सत्ता कोणाची यावरुन वाद होता. मारणे टोळीला अनिल मारणेच्या हत्येचा बदला घ्यायला होता. अनेक वेळा संदीप मोहोळला मारण्य़ाचे प्रय़त्न करण्यात आले पण योगायोग म्हणा किंवा नशीब म्हणा तो निसटून जात होता. शेवटी एक फुल प्रुफ प्लान करण्यात आला.

संदीप मोहोळ मुठा गावातून कोथरुडकडे यायला निघाला तेव्हा मारणे टोळीकडून संदीप मोहोळचा पाठलाग सुरु झाला. संदीप मोहोळला याची चाहूल लागली होती. मुठा गावातून कोथरुडपर्यंत संदीप मोहोळ यांच्यावर तब्बल पाचवेळा हल्ला करण्यात आला आणि संदीप मोहोळने दाद दिली नाही. शेवटी संदीपची स्कॉर्पिओ ही कोथरुडमध्ये पोचली आणि तिथे पुन्हा त्याच्यावर हल्ला झाला. गाडीची काच हातोड्याने फो़डण्यात आली आणि गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

या प्रकरणी १८ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी संजय कानगुडे, समीर शेख, सचिन मारणे, गणेश मारणे, राहुल तारू, अनिल खिलारे, विजय कानगुडे, दीपक मोकाशी, शरद विटकर, नीलेश माझीरे, रहीम शेख, दत्तात्रय काळभोर यांची 2021 मध्य़े निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पांडुरंग मोहोळ, दिनेश आवजी, इंद्रनील मिश्रा यांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला. तर सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबूब शेख, संतोष रामचंद्र लांडे या तिघांना जन्मठेप सुनावण्यात आली.

पण संदीप मोहळच्या हत्येनंतर पुण्यातल्या टोळीयुध्दाचा भडका उडाला, गणेश मारणे हा अनिल मारणेच्या हत्येचा बदला घेऊन तुरुंगात गेला, सूत्रं किशोर मारणेकडे आली.

बदला घेण्याची पाळी आता मोहोळ टोळीची होती. शरद मोहोळकडे संदीप मोहोळच्या टोळीची सूत्रं आली होती.किशोर मारणे हा पुण्यातल्या निलायम टॉकीज मध्ये सिनेमा बघायला गेला होता. आणि याचा टॉकीजबाहेर किशोर मारणेची कोयत्याने असंख्य वार करुन हत्या कऱण्यात आली.

या केसमध्ये 33 साक्षीदार तपासण्यात आले आणि 7 आरोपींना जन्मठेप झाली 4 जण निर्दोष सुटले. शरद मोहोळ, हेमंत दाभेकर, दत्ता गोळे, योगेश गुरव, मुर्तझा शेख, अमित फाटक, दीपक भातम्बेकर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. रोहन धर्माधिकारी, अजय कडू, नवनाथ फाले व संदीप नाटेकर या आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. शरद मोहोळचे प्रकरण इथंच संपले नाही तुरुंगात गेल्यानंतरही शरद मोहोळऩे अजून एक मोठं कांड केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT