Crime : यवतमाळमध्ये जावयाने घातला रक्ताचा सडा! पत्नी, सासरा, दोन मेहुण्यांची केली हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

yavatmal crime news four family member killed by son in law killed wife family shocking crime story from yavatmal
yavatmal crime news four family member killed by son in law killed wife family shocking crime story from yavatmal
social share
google news

Yavatmal Crime news : भास्कर मेहरे, यवतमाळ : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मृत कुटुंबियांच्या जावयानेच (Son In Law) हे धक्कादायक कृत्य केले आहे. जावयाने त्याची पत्नी, सासरा आणि दोन मेहू्ण्यांना संपवले आहे. कळंब तालुक्यातील तिरझडा येथील पारधी बेड्यावर मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या घटनेने यवतमाळ (Yavatmal)  हादरले आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. (yavatmal crime news four family member killed by son in law killed wife family shocking crime story from yavatmal)

ADVERTISEMENT

यवतमाळच्या पारधी बेड्यावर ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबियांच्या मुलीशी आरोपीचे लग्न झाले होते. या लग्नाच्या काही वर्षानंतर आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरूवात केली होती.या संशयातून पती-पत्नीमध्ये नेहमीच खटके उडायचे. तर घटनेच्या दिवशी आरोपी जावई हा दारू पिऊन आला होता. त्यामुळे त्याचा पुन्हा पत्नीशी वाद झाला. या वादातूनच त्याने पतीने बायकोचे कुटुंब संपवण्याचा कट रचला.

हे ही वाचा : ‘मी शपथ घेतो तेव्हा ती पूर्ण करतोच.. दीड वर्षांपूर्वी…’, CM शिंदेंचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट

त्यानुसार आरोपी जावयाने सबलीच्या सहाय्याने बायकोच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. आरोपीने सबलीने थेट छातीत हल्ला केला. या हल्ल्यात बायको रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसले, मेहूणा ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सासू रुखमा घोसले या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तत्काळ उपचाराखातर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : राणा दाम्पत्याला न्यायालयाचा झटका, याचिका फेटाळली, नेमकं प्रकरण काय?

या हत्याकांडाची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आणि घटनास्थळावरून आरोपी जावई गोविंद विरचंद पवार याला ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी  चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यू कारण समोेर येणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपासही सुरु केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT