अ‍ॅपल स्टोअरमध्ये फिल्मी स्टाईल चोरी; तब्बल चार कोटींच्या आयफोनवर हात साफ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Thieves tunnelled their way into the store through a bathroom and made off with 436 iPhones worth a jaw-dropping Rs 4.10 crore
Thieves tunnelled their way into the store through a bathroom and made off with 436 iPhones worth a jaw-dropping Rs 4.10 crore
social share
google news

US News: नेटफ्लिक्सवरील सुप्रसिद्ध मनी हेस्ट वेब सीरिजच्या स्टोरीप्रमाणेच अमेरिकेत अ‍ॅपलच्या एका स्टोअरमध्ये चोरीची मोठी घटना घडली आहे. या घटनेत चोरांनी बाथरूममधून अ‍ॅपल स्टोअरमध्ये प्रवेश केला आणि सुमारे 4.10 कोटी रुपये किमतीच्या 436 आयफोनवर हात साफ केला. या फिल्मी चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Thieves tunnelled their way into the store through a bathroom and made off with 436 iPhones worth a jaw-dropping Rs 4.10 crore)

ADVERTISEMENT

शेजारच्या कॉफी शॉपमधून ऍपल स्टोअरमध्ये केला प्रवेश :

स्थानिक वृत्तवाहिनी किंग 5 न्यूजच्या वृत्तानुसार चोरांनी अ‍ॅपल स्टोअरच्या शेजारी असलेल्या कॉफी शॉपचा वापर करुन ही चोरी केली. चोरांनी प्रथम सिएटल कॉफी शॉपमध्ये प्रवेश केला आणि नंतर ऍपल स्टोअरच्या मागील खोलीत प्रवेश मिळविण्यासाठी बाथरूमच्या भिंतीला छिद्र पाडून भुयार तयार केले. या घटनेबाबत बोलताना अ‍ॅपलचे प्रादेशिक किरकोळ व्यवस्थापक एरिक मार्क्स म्हणाले की, या घटनेनंतर सकाळी त्यांना फोन आला तेव्हा त्यांना धक्का बसला.

Crime News : शेजाऱ्याच्या घरात कुलरमध्ये सापडला मुलाचा मृतदेह, तारेने बांधलेले हात-पाय

अ‍ॅपलकडून कोणतेही विधान आले नाही :

मार्क्स यांनी किंग 5 न्यूजला सांगितले की, “मला कधीच संशय आला नाही कारण आम्ही अ‍ॅपल स्टोअरच्या आसपास होतो. चोरींनी अ‍ॅपल स्टोरअ पर्यंत कसा प्रवेश मिळवला ही एक विचार करण्याची गोष्ट आहे.” सिएटल पोलिसांनीही या चोरीला दुजोरा दिला आहे. अ‍ॅपल स्टोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी जवळच्याच दुकानाचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे अ‍ॅपलने मात्र चोरीच्या या घटनेबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. कंपनी सहसा स्टोअर चोरीवर भाष्य करत नाही, असा आजवर दिसून आलं आहे.

हे वाचलं का?

कॉफी शॉपचे सीईओ माइक अ‍ॅटकिन्सन यांनी ट्विटरवर दिली माहिती :

सिएटल कॉफी शॉपचे सीईओ माईक ऍटकिन्सन यांनी ट्विटरवर, अ‍ॅपल स्टोअरच्या बाथरूममध्ये चोरांनी बनवलेल्या भुयाराच्या फोटोसह या घटनेबद्दल पोस्ट केली आहे. ते म्हणाला, “आमच्या एका रिटेल आउटलेटमध्ये दोन पुरुष घुसले. आमच्या दुकानाच्या बाथरूमच्या भिंतीला छिद्र पाडून त्यांनी शेजारच्या ऍपल स्टोअरमध्ये प्रवेश मिळवला. चोरींनी केलेलं तोडफोडीची डागडुजी करण्यासाठीसिएटल कॉफी शॉपला सव्वा लाख रुपये खर्च आला.

Satara Crime: सोशल मीडियावर ओळख अन् शाळेतील मुलीवर लॉजवर लैंगिक अत्याचार

पोलिसांना आणि दुकानदारांना आतल्या लोकांवर संशय येतो :

सिएटल पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अल्डरवुड मॉल ऍपल स्टोअरमधील चोरीच्या तपासात पोलिसांना मदत करत आहे. सिएटलच्या किंग 5 न्यूजच्या म्हणण्यानुसार, गुन्ह्याचा वेग आणि अचूकतेमुळे अ‍ॅटकिन्सनसह काहींना हे आतल्या माणसाचे काम असावे असा संशय येत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT