रुमवर भेटायला बोलावलं,अन् शिक्षक झाला हनीट्रॅपचा शिकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

udham singh nagar honeytrap case
udham singh nagar honeytrap case
social share
google news

A teacher became Honeytrap : देशातील उच्च पदस्थ अधिकारी, भारतीय जवान किंवा मंत्र्यांकडून महत्वाची माहिती गोळा करण्यासाठी अनेकदा त्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढले जाते.अशाच जाळ्यात आता एक शिक्षक अडकला आहे. विशेष म्हणजे या शिक्षकाला फेसबूकवरची मैत्री भोवली आहे. कारण त्याला या हनीट्रॅपचा जाळ्यात ओढणारी ही तरूणी त्याच्या फेसबूकवरची मैत्रीण आहे.या प्रकरणात आता पोलिसांनी एका दाम्पत्यासह 4 आरोपींना अटक केली आहे.या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे. (udham singh nagar honeytrap case four arrested husband and wife frienship)

ADVERTISEMENT

उत्तराखंडच्या उधम सिंह नगरच्या काशीपूरमध्ये एक शिक्षक राहायचं. या शिक्षकाची काहीच दिवसांपुर्वी एका तरूणीची फेसबूकवर मैत्री झाली होती. या मैत्रीनंतर दोघे एकमेकांचे घट्ट मित्र झाले होते. या दरम्यान 21 एप्रिलला शिक्षकाच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. त्यामुळे तिने वाढदिवसानिमित्त शिक्षकाला भेटायला बोलावले होते. मैत्रिणीच्या आमंत्रणानंतर जसपूर खुर्द येथील रूद्राक्ष गार्डनवर शिक्षक पोहोचला होता.

शिक्षकाला रुमवर नेले…

शिक्षक मैत्रिणीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिने त्याला एका रूममध्ये नेले होते. या दरम्यान रूममध्ये दोघे एकटेच होते. यावेळी तरूणीने शिक्षकाचे कपडे उतरवून त्याच्या जवळच्या जाण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान काही तरूण अचानक रुममध्ये शिरले होते. या तरूणांनी शिक्षकांचे तरूणीसोबतचे त्या अवस्थेतले व्हिडिओ काढायला सुरूवात केली होती. शिक्षकाने त्याला विरोध करून सुद्धा त्यांनी हे व्हिडिओ काढलेच होते.

शिक्षकाला केले ब्लॅकमेल

तरूणांनी व्हिडिओ बनवल्यानंतर शिक्षकाला मारहाण केली आणि ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. 2 लाख रूपये दे, नाहीतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी तरूणाने त्याला दिली.यावेळी बदनामीच्या भितीने घाबरून शिक्षकाने कशी बशी मित्र परिवाराकडून 30 हजाराची रोकड जमा केली आणि 10 हजार ऑनलाईन पाठवून स्वत:ची सुटका करून घेतली.मात्र तरुण इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी शिक्षकाच्या मित्राची स्कूटी, क्रेडिट कार्ड आणि मोबाईल देखील हिसकावून घेतला.

दरम्यान या घटनेनंतर शिक्षकाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनंतर पोलिसांना खबरींच्या माध्यमातून घटनेचा शोध घेत 4 आरोपींना ताब्य़ात घेतले.तसेच या चारही आरोपींकडून स्कूटी, क्रेडिट कार्ड, मोबाईल आणि 20 हजाराची रोकड जप्त केली असल्याची माहिती एसएसपी डॉ. मंजूनाथ टीसी यांनी दिली.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT