Yashshri Shinde : 'या' ठिकाणी पडलेला होता यशश्रीचा मृतदेह, ऑन द स्पॉट रिपोर्ट

मुंबई तक

उरणमधील यशश्री शिंदेच्या हत्येनं समाजमन हादरुन गेलं. या प्रकरणात सातत्यानं नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. हत्येच्या वेळी आरोपी दाऊद शेख तिच्यासोबत होता, असे एका सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होतं.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

उरणमधील यशश्री शिंदेच्या हत्येनं समाजमन हादरुन गेलं. या प्रकरणात सातत्यानं नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. हत्येच्या वेळी आरोपी दाऊद शेख तिच्यासोबत होता, असे एका सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होतं.

social share
google news

Yashashree Shinde News : (दिपेश त्रिपाठी, मुंबई) यशश्री शिंदेच्या हत्येने उरण हादरलं आहे. या प्रकरणामध्ये सातत्यानं नवे अपडेट्स समोर येत आहेत. या प्रकरणातील एक सीसीटीव्ही समोर आला आहे. त्यात यशश्री शिंदे बेपत्ता झाली, त्यावेळी दाऊद शेख हा तिचा पाठलाग करत होता. हत्या होण्याआधी आरोपी दाऊद शेख हा तिच्यासोबत होता. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने यशश्रीला मारल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. 

अत्यंत भयावह अवस्थेत यशश्रीचा मृतदेह आढळून आला. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेखचा उल्लेख केलेला आहे. आता या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. यात २५ जुलै रोजी २ वाजून १४ मिनिटांनी यशश्री शिंदे ही जिथे मृतदेह आढळला, त्या ठिकाणाकडे जाताना दिसत आहे. या ठिकाणी २ वाजून २२ मिनिटांनी आरोपी दाऊद शेख हा देखील जाताना दिसत आहे. 

यावरुन हत्येच्या आधी दाऊद हा तिच्यासोबत होता हे स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी कर्नाटकमधून मोहसीन नावाच्या एका व्यक्तीला अटक केलीये. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मोहसीन देखील यशश्रीच्या संपर्कात होता. त्याच्यावरुन दाऊद आणि यशश्रीमध्ये नेहमी भांडणं व्हायची.

    follow whatsapp