‘ते’ हसणं साक्षीसाठी ठरलं जीवघेणं; साहिलने का केला होता तिघांच्या हत्येचा प्लान?
sakshi sahil case in marathi : पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल करताना साक्षीची निर्दयी हत्या करणाऱ्या आरोपी साहिलने आणखी मोठा खुलासा केला आहे. अजयने केलेल्या विनोदावर साक्षी हसली आणि त्यामुळेच साहिलला राग आला होता.
ADVERTISEMENT
What is Delhi Sakshi case? : दिल्लीत रविवारी (28 मे) रात्री घडलेल्या हृदयद्रावक हत्येची कहाणी म्हणजे सकाळी मैत्री, संध्याकाळी वैर आणि रात्री खून अशीही काही मोजक्याच शब्दांत सांगता येईल. म्हणजेच ज्या साहिलने (Who is Sahil in Sakshi case?) साक्षीला चाकूने भोसकून आणि नंतर दगडाने ठेचून ठार केले, त्याच दिवशी सकाळी ते दोघे मित्र होते. मात्र संध्याकाळपर्यंत त्यांच्या मैत्रीचे रूपांतर वैरात झाले आणि रात्री अंधार पडण्यापूर्वी साहिलने साक्षीला कायमच संपवलं. (Why did Sahil murdered Sakshi?)
ADVERTISEMENT
Sakshi Murder Case : रक्त गोठवणारी घटना
जो मुलगा अवघ्या दोन मिनिटांपूर्वी हत्या झालेल्या ठिकाणी आरामात फिरत होता, तो अचानक एवढं भयंकर कृत्य करेल की साऱ्या जगाला ते पाहून धक्का बसेल, असंही कुणालाही वाटलं नसेल. पण, पण साहिलने ज्या पद्धतीने साक्षीला मारले ते अचानक घडलेलं नव्हतं, उलट तो स्पष्टपणे थंड डोक्याने ठरवून केलेला खून आहे, हेच स्पष्ट दिसत आहे. साहिलने विचारपूर्वक हे कृत्य केल्याचं नंतर त्याने दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. अटकेनंतर साहिलने पोलिसांसमोर तोंड उघडले, तेव्हा तो जे काही बोलला तो त्याच्या क्रूर मानसिकतेचाही पुरावा आहे.
हेही वाचा >> sakshi murder : ‘प्रविणसाठी ती मला वापरत होती अन्…’, साहिलने पोलिसांना सगळंच सांगितलं
तिघांची हत्या करण्याचा होता प्लान
याच चौकशीत एका गोष्टीकडे नंतर पोलिसांचे लक्ष वेधले गेले, ते आणखीनच धक्कादायक आहे. कारण साहिलच्या निशाण्यावर साक्षी एकटीच नव्हती. त्याच्या कटात तीन लोक होते आणि योगायोगाने त्यात साक्षी पहिली होती, जिला साहिलने अत्यंत निष्ठूरपणे संपवलं. त्या दिवशी साहिल साक्षी, तिचा मित्र आणि अजय उर्फ झाब्रू यांच्यापैकी जो पहिला दिसेल, त्याला मारण्याच्या उद्देशाने साहिल घटनास्थळी पोहोचला होता आणि याचं कारण होतं, तिघांनीही साहिलची केलेली चेष्टा.
पूर्वनियोजित हत्या
गप्पा मारताना केलेल्या अश्लील विनोदांमुळेच साहिल रागाने लाल झाला होता. साक्षीने तिची मैत्रीण आणि अजयच्या उपस्थितीत साहिलवर ज्याप्रकारे अश्लील विनोद केले होते, त्याच वेळी साहिलला राग आला आणि त्यानंतरच त्याने खून करण्याचा विचार केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार, मरेपर्यंत वार करत राहायचे असा विचार साहिलने आधीच केलेला होता.
हेही वाचा >> Maharashtra Politics : शिंदेंच्या खासदाराची ‘ही’ मागणी शिवसेना-भाजप सरकारचं टेन्शन वाढवणार?
खून करण्यापूर्वी केले भरपूर मद्यपान
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान साहिलने सांगितले की, तो साक्षीला गेल्या दीड वर्षांपासून ओळखायचा. त्याची आणि साक्षीची चार महिन्यांपासून मैत्री होती. घटनेच्या एक दिवस आधी म्हणजेच 27 मे रोजी साहिलला साक्षी तिची मैत्रीण आणि झाब्रूसह बाजारात भेटले होते. चौघेही तिथे उभे राहून गप्पा मारत होते आणि हसत होते.
ADVERTISEMENT
दरम्यान, अजय उर्फ झाब्रू साहिलला उद्देशून काही तरी अश्लील बोलला, जे ऐकून साहिल राग आला. दुसरीकडे साक्षी आणि तिची मैत्रीण जोरजोरात हसायला लागली, यामुळे संतापलेल्या साहिलने साक्षीला अजयपासून दूर राहण्यास सांगितले आणि निघून गेला. त्यानंतर तिथून निघाल्यानंतर साहिलने भरपूर मद्यपान केले. आणि तिथून तो चाकू घेऊन त्याच रस्त्यावर पोहोचला जिथे त्याने साक्षीची हत्या केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Wrestlers Protest News : आंदोलनाची धग सचिन तेंडुलकरच्या दारापर्यंत!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल या तिघांपैकी जो दिसेल त्याला ठार मारण्याच्या उद्देशानेच तिथे गेला होता, जिथे त्याने साक्षीची हत्या केली.
साक्षी दिसली आणि संपली
दरम्यान, त्यावेळी साक्षी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे त्याने पाहिले. त्याने फक्त साक्षीला पकडले आणि तो चाकूने वार करत सुटला. इतकंच नाही तर त्याचा राग इतका होता की साक्षीवर चाकूने वार केल्यानंतर त्याने नाल्याच्या काठावर पडलेला एक दगड उचलला आणि ती मरेपर्यंत मारत राहिला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT