Ajit Pawar : 'मोक्काच्या आरोपीला वाचवलं', जाहीर सभेत अजित पवार हे काय बोलून गेले?
Ajit Pawar save party worker on mcoca : अजित पवारांनी मोक्कातल्या एका आरोपीला वाचवल्याचा प्रसंग सांगितला. हा प्रसंग जाहीर सभेत सांगून अजित पवार चांगलेच फसले आहेत.कारण आता उपमुख्यमंत्री मोक्काच्या कारवाईतून वाचवतात का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
ADVERTISEMENT
Ajit Pawar save party worker on mcoca : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत प्रचार दौरे सुरु केले आहेत. गुरुवारी बारामतीतील अनेक भागात अजित पवारांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. अशाच एका सभेत बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) मोक्कातल्या एका आरोपीला वाचवल्याचा प्रसंग सांगितला. हा प्रसंग जाहीर सभेत सांगून अजित पवार चांगलेच फसले आहेत.कारण आता उपमुख्यमंत्री मोक्काच्या कारवाईतून वाचवतात का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे अजित पवारांच्या या विधानानंतर त्यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. (ajit pawar save party worker on mcoca action baramati rally ajit pawar shocking statment maharashtra politics)
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी रात्री निरावागजमधील सभेत एक किस्सा सांगितला. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांना मदत केल्याचे सांगून मोक्कामधील कार्यकर्त्याला वाचवल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळे अजित पवार मोक्काच्या कारवाईतून वाचवतात का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हे ही वाचा : BJP ने नुकतंच तिकीट दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात पॉक्सो अंतर्गत FIR दाखल!
नेमकं अजित पवार काय म्हणाले?
''आता बारामतीत एका माणसाचं नाव सांगा की जो दादागिरी करतो.त्याच्याकडे बघतोच कसं काय दादागिरी करतो. सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. आताच मला नाना म्हणत होता, नानाच्या एका ओळखीच्या माणसाला पार मोक्का लागत होता. आणि मला मग सगळ्यांनीच सांगितलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बाकीचे सहकारी आले, सागर वगैरै सगळेचे आले. ते म्हणाले, दादा एवढ्याच वेळेस वाचवा. आताच सांगतो एवढ्याच वेळेस, पण पुन्हा चुक केली की अजित पवारांकडे यायचं नाही. त्या कामाच्या करता. बाळासाहेब तुम्हाला कळतंय मला काय सांगायचंय ते. आता तुम्ही काय सांगायचे ते त्यांना सांगा,असे अजित पवार यांनी म्हटले.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Ajit Pawar: 'उतारवयातील लोकांनी भजन करायचं', अजितदादांचा पुन्हा काकांना टोमणा!
अजित पवार पुढे म्हणाले की, ''मला अधिकारी म्हणतात. दादा तुम्ही एवढे कडक वागता. आणि कसं हे पाठिशी घालता तिकडेपण कमीपणा होतो. पण तुम्हीपण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते. पण तसं आता होऊन देऊ नका'', असे अजित पवार कार्यकर्त्यांना बोलताना दिसले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT