Nashik Lok Sabha : ठाकरेंना मोठा झटका! शिंदेंनी एका रात्रीत फिरवला डाव
Vijay Karanjkar Lok Sabha Election : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नाशिकमध्ये मोठा झटका बसला आहे. जिल्हाप्रमुखच शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
विजय करंजकर यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
Vijay Karanjkar, Nashik Lok Sabha election : नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक काही दिवसांवर आलेली असतानाच ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विजय करंजीकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. शिंदेंनी ठाकरेंचा बडा नेता गळाला लावल्याने नाशिकमधील गणित बदलू शकता, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Vijay Karanjkar, district chief of uddhav Thackeray's Shiv Sena has joined Eknath Shinde Shiv Sena)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना आपल्या बाजूने घेत लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात समावेश असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदेंनी मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे.
नाशिकमधून लढवण्यास होते इच्छूक
विजय करंजकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे नाशिकचे जिल्हाप्रमुख आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक होते. ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चाही सुरूवातीला होती. करंजकर यांना वर्षभरापूर्वी तयारी करण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी मतदारसंघात दौरेही केले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> रोहित पवारांच्या अश्रूंचा फुटला बांध, शरद पवारांकडे बघत म्हणाले, 'पुन्हा असं बोलू नका'
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विजय करंजकर यांनी मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू केले होते. त्यांनी तीन दौरे करून मतदारसंघ पिंजून काढला होता. त्याचा फायदा हेमंत गोडसेंना होईल, असे म्हटले जात आहे.
ADVERTISEMENT
ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजेभाऊ वाजे यांना नाशिकमधून उमेदवारी दिल्याने विजय करंजकर नाराज झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्जही दाखल केला. दरम्यान, भाजपचे गिरीश महाजन आणि शिंदेंच्या शिवसेना नेत्यांची भेटही त्यांनी घेतली होती. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार का? असा प्रश्न चर्चेत आला होता. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे हेमंत गोडसे यांची ताकद वाढणार आहे.
ADVERTISEMENT
विजय करंजकर काय म्हणाले?
“मी माझ्या पदांचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास मी इच्छुक होतो. मला आश्वासन देऊनही ते टाळलं गेलं. ज्या माणसाचं नावही चर्चेत नाही अशा माणसाला उमेदवारी देण्यात आली", असे करंजकर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हणाले.
हेही वाचा >> 'सदानंद सुळे काय पर्स घेऊन जातो काय?', अजित पवारांचा चढला पारा, काय बोलले?
"आता गद्दार कोण आहे ते मी दाखवून देईन. ठाकरे गटाच्या शिवसेनेत तत्व आणि सत्व दिसत नाही. ज्यांनी माझा घात केला आहे. त्यांना येणाऱ्या काळात कळेल. हे लोक एकनाथ शिंदेंना गद्दार बोलत आहेत. परंतु खाऱ्या अर्थाने गद्दार पडद्याआड लपले आहेत. त्यांचा चेहरा पडदा फाडून मी समोर आणणार आहे”, असेही ते म्हणाले.
ADVERTISEMENT