BJP List : भाजपचा 'या' खासदारांसोबत 'खेला'; पहा कुणा कुणाची कापली तिकीटे
BJP Candidate List : देशातील एकूण 543 लोकसभा जागांपैकी आतापर्यंत भाजपने 402 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यमान खासदारांची तिकीट कापली आहेत. तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
BJP Candidate List : देशात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला आणि सातव्या टप्प्यासाठी 1 जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीत देशातील एकूण 543 लोकसभा जागांपैकी आतापर्यंत भाजपने 402 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यमान खासदारांची तिकीट कापली आहेत. तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या विद्यमान खासदारांची तिकीटे कापली गेली आहेत. हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
इंडिया टुडे ग्रुपचे हिमांशू मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाजप हायकमांड सतत विचारमंथन करत आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या 402 उमेदवारांच्या यादीत पक्षाच्या 290 विद्यमान खासदारांपैकी सुमारे 100 खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. म्हणजेच या निवडणुकीत भाजपने मोठ्या संख्येने नवे उमेदवार उभे केले आहेत.
हे ही वाचा : Lok Sabha Elections 2024 : नाशिकची जागा भाजपला का हवीये, गोडसेंची उमेदवारीच धोक्यात!
100 उमेदवारांची तिकीटे कापली
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 33 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली गेली होती. दुसऱ्या यादीत 30 आणि पाचव्या यादीत 37 खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहे. विशेष म्हणजे खासदारांसोबतच अनेक राज्यमंत्र्यांची तिकिटेही रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान आकडेवारी पाहिली असता, भाजपने आतापर्यंत जवळपास 34 टक्के विद्यमान खासदारांची तिकिटे नाकारली आहेत. म्हणजेच दर 3 पैकी एका खासदाराला पुन्हा तिकीट मिळालेले नाही.
हे वाचलं का?
'या' विद्यमान खासदारांना डच्चू
भाजपने ज्या बड्या नेत्यांचे तिकीट कापले आहे त्यात गांधी घराण्यातील वरुण गांधी यांचा समावेश आहे तसेच दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या भोपाळच्या सिहोरच्या खासदार प्रज्ञा ठाकूर आणि बहुजन समाज पक्षाच्या खासदाराच्या धर्मावर भाष्य करणारे रमेश बिधुरी यांना पक्षाने तिकिट नाकारले आहे. इतकेच नाही तर लोकसभेत माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक, माजी राज्यमंत्री अश्विनी चौबे, कर्नाटकचे खासदार प्रताप सिम्हा, जनरल व्हीके सिंह, अनंत हेगडे, हर्षवर्धन, दर्शना जरदोश आणि क्रिकेटपटू-राजकारणी गौतम गंभीर यांसारख्या मोठ्या नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे.
हे ही वाचा : Shiv Sena UBT : तीन जागा गमावल्या, ठाकरेंना आता 'हे' मतदारसंघ मिळणार!
119 खासदारांना नाकारली उमेदवारी
2019 मध्ये झालेल्या गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या 282 खासदारांपैकी 119 खासदारांची तिकिटे रद्द केली होती, म्हणजेच सुमारे 42 टक्के खासदारांना पुन्हा तिकीट मिळाले नव्हते. नागरीकांचा उमेदवारांना असलेला विरोध पाहता भाजपने हा निर्णय घेतला होता. 2024 च्या निवडणुकीतही भाजपकडून अशीच रणनीती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 100 नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT