Chhagan Bhujbal : "प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही", भुजबळ नाराज?

मुंबई तक

Chhagan Bhujbal News : आमच्या पक्षातील कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अजितदादांचा काहीही संबंध नाही. एक जागा असल्यामुळे सगळ्यांनाच उमेदवारी देणे शक्य नव्हते, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ इच्छूक होते.
chhagan bhujbal reaction on sunetra pawar nomination ncp ajit pawar mahayuti vs maha vikas aghadi
social share
google news

Chhagan Bhujbal On Rajya Sabha : राज्यसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केला. खरं तर या निवडणुकीसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  इच्छूक होते. मात्र आता सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. ही नाराजी आता त्यांनी उघड बोलूनही दाखवली आहे. ''प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही, काही गोष्टी तुम्हाला मान्य कराव्या लागतात'', असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

छगन भुजबळ माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, ''मी सुद्धा राज्यसभा निवडणूक लढवण्यासा इच्छुक होतो. पण सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. पक्षात चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेला. माझ्या तोंडावर दिसतंय का नाराज आहे? मी नाराज नाही आहे. पक्षात सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात. आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही, काही गोष्टी तुम्हाला मान्य कराव्या लागतात'', असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंनी वाढवली भाजपची 'कटकट'! स्वबळावर लढणार 'एवढ्या' जागा

या जागेसाठी माझ्यासह आनंद परांजपे देखील इच्छुक होतो. मात्र आमच्या पक्षातील कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अजितदादांचा काहीही संबंध नाही. एक जागा असल्यामुळे सगळ्यांनाच  उमेदवारी देणे शक्य नव्हते, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच राज्यात महायुतीचे आमदार असल्याने आमची ही जागा सहज निवडून येईल असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त करत महाविकास आघाडी उमेदवार देणार नसल्याचे म्हटले. 

पक्षात डावलले जाण्याचा मुद्यावर छगन भुजबळ म्हणाले की, सध्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आहेत आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत. मला डावलण्यालं जाण्याचा प्रश्नच नाही. कालच्या बैठकीला मी स्वतः होतो उपस्थित. हा निर्णय सर्वानुमते झाला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : महायुतीत 'बिघाडी'! उद्धव ठाकरे-काँग्रेसने घेतले जुळवून

हे वाचलं का?

    follow whatsapp