Lok Sabha Election 2024: 'या' मतदारसंघांमध्ये ठाकरे-शिंदे थेट भिडणार, पाहा नेमकी यादी
Thackeray vs Shinde: पाहा कोणकोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार विरुद्ध शिंदे गटाचे उमेदवार अशी निवडणूक होणार आहे.
ADVERTISEMENT
Shiv Sena UBT vs Shiv Sena Shinde: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी शिवसेना शिंदे गटाने आज (28 मार्च) आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. ज्यामध्ये त्यांनी पहिले आठ उमेदवार जाहीर केले आहे. यापैकी सात जागांवरचे उमेदवार हे विद्यमान खासदारच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी पहिली यादी जारी करताना कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आत शिंदे गटाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर ते ठाकरेंच्या कोणत्या उमेदवाराशी भिडणार हे आता समोर आलं आहे. (lok sabha election 2024 thackeray shinde will fight directly in 5 constituencies see the exact list)
ADVERTISEMENT
ठाकरेंचे उमेदवार शिंदेंच्या सेनेला कुठे-कुठे भिडणार?
1. मुंबई दक्षिण-मध्य: अनिल देसाई (ठाकरे गट) vs राहुल शेवाळे (शिंदे गट)
2. शिर्डी: भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) vs सदाशिव लोखंडे (शिंदे गट)
हे वाचलं का?
3. बुलढाणा: नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट) vs प्रतापराव जाधव (शिंदे गट)
4. हिंगोली: नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट) vs हेमंत पाटील (शिंदे गट)
ADVERTISEMENT
5. मावळ: संजोग वाघेरे (ठाकरे गट) vs श्रीरंग बारणे (शिंदे गट)
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात शरद पवार मोठी खेळी करणार
या पाच मतदारसंघात दोन्ही शिवसेना हे थेट आमनेसामने असणार आहे. अशावेळी या मतदारसंघामधून नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
एकीकडे ठाकरे गटाने मुंबईतील तब्बल 4 मतदारसंघातील त्यांचे उमेदवार जाहीर केलेले असताना शिंदेंच्या शिवसेनेने केवळ मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघातील उमेदवारच जाहीर केला आहे. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाचे अनिल देसाई हे असणार आहेत. या लढाईकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. कारण मागील दोन टर्म शेवाळे हे येथील शिवसेनेचे खासदार आहेत. तर अनिल देसाई हे ठाकरेंची अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. अशावेळी येथील मतदार नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.
हे ही वाचा>> शिंदेंची मोठी खेळी, मुंबईतील 'या' नेत्याचं तिकीट कापणार?
याशिवाय जिथे-जिथे ठाकरे विरुद्ध शिंदेच्या उमेदवारांची लढत होणार आहे तिथे निवडणूक ही अधिकच रंजक होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघांमधील प्रत्येक घडामोडींवर आपलं लक्ष असेलच आणि मुंबई Tak त्या वाचकांपर्यंत वेळोवेळी पोहचवेल देखील.
शिवसेनेची (शिंदे गट) पहिली यादी
- मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे
- कोल्हापूर - संजय मंडलिक
- शिर्डी - सदाशिव लोखंडे
- बुलढाणा - प्रतापराव जाधव
- हिंगोली - हेमंत पाटील
- रामटेक - राजू पारवे
- हातकणंगले - धैर्यशील माने
- मावळ - श्रीरंग आप्पा बारणे
शिवसेना (ठाकरे गट) पहिली यादी
- बुलढाणा लोकसभा - नरेंद्र खेडेकर
- यवतमाळ -वाशिम लोकसभा - संजय देशमुख
- मावळ लोकसभा - संजय वाघेरे-पाटील
- सांगली लोकसभा - चंद्रहार पाटील
- हिंगोली लोकसभा - नागेश पाटील आष्टीकर
- औरंगाबाद लोकसभा - चंद्रकांत खैरे
- उस्मानाबाद लोकसभा - ओमराजे निंबाळकर
- शिर्डी लोकसभा - भाऊसाहेब वाघचौरे
- नाशिक लोकसभा - राजाभाऊ वाजे
- रायगड लोकसभा - अनंत गीते
- सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा - विनायक राऊत
- ठाणे लोकसभा - राजन विचारे
- मुंबई ईशान्य लोकसभा - संजय दिना पाटील
- मुंबई दक्षिण लोकसभा - अरविंद सावंत
- मुंबई वायव्य लोकसभा - अमोल कीर्तिकर
- परभणी लोकसभा - संजय जाधव
- मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT