Maharashtra Lok Sabha Election Live : "उद्धव ठाकरेंना मी पाच वेळा बोललो, भाजपसोबत युती करा"
Lok Sabha Election Maharashtra Live News : महाराष्ट्र आणि देशभरातील लोकसभा निवडणुकीसंदर्भातील घडामोडी, राजकीय बातम्यांसह महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024 Maharashtra Live Updates : देशात पाचव्या, तर महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यासाठी मतदान उद्या म्हणजे २० मे रोजी होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील धुळे लोकसभा, दिंडोरी लोकसभा, नाशिक लोकसभा, पालघर लोकसभा, भिवंडी लोकसभा, कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा, उत्तर मुंबई लोकसभा, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा, उत्तर पूर्व मुंबई लोकसभा, उत्तर मध्य मुंबई लोकसभा, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा, दक्षिण मुंबई लोकसभा या मतदारसंघात मतदान होणार आहे.
१८ मे रोजी प्रचार संपला असला, तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे. मतदानाच्या पूर्वी समीकरणे कशी बदलतात, यावरही या मतदारसंघाचा निकाल ठरणार आहे.
ADVERTISEMENT
पाचव्या टप्प्यात शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मतदारसंघ आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी लढत या मतदारसंघात होताना दिसत आहे. त्यामुळे इथे कौल कुणाला मिळणार, हेही महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्र आणि देशातील लोकसभा निवडणूक, तसेच राज्यातील महत्त्वाच्या घटना घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...
लाइव्हब्लॉग बंद
- 05:54 PM • 19 May 2024
भुजबळांना मुख्यमंत्रीपदाची होती ऑफर
'भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं, तर पक्ष फुटला असता', असं विधान शरद पवारांनी केलं. त्याला उत्तर देताना भुजबळांनी वेगळीच स्टोरी सांगितली. वाचा नेमकं भुजबळ काय म्हणाले?
- 05:47 PM • 19 May 2024
Maharashtra Lok Sabha : पूनम महाजन विधानसभा निवडणूक लढवणार?
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दोन वेळच्या खासदार पूनम महाजन यांना यावेळी तिकीट दिलं गेलं नाही. भाजपकडून त्यांचा पत्ता कट करण्यात आला. पण, त्यांना दिल्लीत न पाठवता राज्यात पाठवण्याचा निर्णय भाजपचा आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
फडणवीस काय म्हणाले वाचा सविस्तर
- 04:48 PM • 19 May 2024
Sharad Pawar News : 'एकनाथ शिंदेंना मुख्यमंमत्री करण्यास विरोध नव्हता', पवारांनी काय सांगितलं?
२०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यावेळी ठाकरेंनी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा शबद्द दिला होता, अशी चर्चा आजही सुरू आहे. याबद्दल शरद पवार म्हणाले की, "महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा होता. शिवसेना हा पक्ष नेतृत्वसापेक्ष आहे. यामुळेच मी उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविले होते."
"शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमचा विरोध नव्हता, कोणतीही हरकतही नव्हती. पण महाविकास आघाडीची बैठक झाली आणि नेता निवडीचा विषय आला, त्या वेळी सर्वजण गप्प होते. शिंदे यांचे नाव आमच्यापुढे चर्चेत आले नव्हते."
"शिंदे यांच्या नावाबाबत शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचे आम्हाला नंतर समजले. पण त्या वेळी आम्हाला काहीही माहीत नव्हते. त्यामुळे मी शेजारी बसलेल्या उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविले. त्या वेळी कोणीही आक्षेप घेतला नाही किंवा शिंदेंसह अन्य कोणाचेही नाव सुचविले नाही."
"शिंदे यांच्यावरून पक्षांतर्गत वेगळी चर्चा होती हे आम्हाला काहीच माहीत नव्हते. शिंदेंबरोबर आमचा त्या वेळेपर्यंत फारसा संबंध आलेला नव्हता. आता शिंदे आमच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून आहेत", असे पवार यांनी म्हटले आहे.
- 03:06 PM • 19 May 2024
Lok Sabha election Maharashtra : "शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास भाजपचाच विरोध होता"
'२०१९ मध्ये शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु होता; त्यावेळी शिवसेनेने विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली. परंतु शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपचा विरोध होतो. एकनाथ शिंदे हे कनिष्ठ आहेत. त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती', असा संजय राऊत यांनी केला आहे.
'भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की, दिल्लीचा निर्णय काय येईल हे आम्हाला माहीत नाही. पण आम्हाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री चालणार नाहीत. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनंगटीवार यांच्यासह भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला होता. शिंदे कोणालाच नको होते. आम्ही शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचे नेते केले होते. त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. परंतु भाजपने विरोध केल्यामुळे तो निर्णय झाला नाही', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
'भाजपशी चर्चा अयशस्वी झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा सुरु झाली. त्यावेळी या दोन्ही पक्षांनाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको. शिंदे मुख्यमंत्रीपदी नको, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, असे सर्वात आधी सुनील तटकरे, अजित पवार यांनी म्हटले होते. शिंदे यांच्यासारखे लोक कुवत नसताना या ठिकाणी पोहचले आहेत', असा दावा करत राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.
- 12:35 PM • 19 May 2024
Maharashtra Politics News : "उद्धव ठाकरेंना मी पाच वेळा बोललो, भाजपसोबत युती करा"
उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसत आहे. शिवसेनेत फाटाफूट झाल्यापासून दोन्ही पक्षाचे प्रमुख एकमेकांना लक्ष्य करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा उद्धव ठाकरे यांच्या मनात पूर्वीपासूनच होती. भाजपसोबत राहिलो तर कधीच मुख्यमंत्री होता येणार नाही, हे उद्धव ठाकरेंना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी शरद पवारांकडे निरोप पाठवला", असा दावा शिंदे यांनी केला आहे.
"ते आज म्हणतात की, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. हे साफ खोट आहे. शिवसेनाप्रमुखांना कधीच सत्तेची लालसा नव्हती. त्यांना सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा असे वाटायचे. शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नसते", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
"भाजपसोबत युती करा, असे मी किमान पाच वेळ तरी त्यांना बोललो होते. त्यांना ते मान्य नव्हते, कारण मुख्यमंत्री पदावर त्यांचा डोळा होता", असा दावा शिंदेंनी केला आहे.
- 12:25 PM • 19 May 2024
लोकसभा निवडणुकीत वंचितचा प्रभाव पडला नाही -शरद पवार
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीचे जागावाटपावरून फिस्कटले. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून, याचा फटका बसेल अशी चर्चाही सुरू आहे.
याबद्दल शरद पवार म्हणाले, "२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा चांगला प्रभाव पडला होता. यंदा तसा प्रभाव दिसत नाही. गेल्या निवडणुकीत दलित आणि मुस्लिमांची मोट वंचितने बांधली होती. यंदा मुस्लीम समाजाने विचारपूर्वक मतदान केले आहे. हे मतदान वंचितला झालेले नाही. तसेच संविधान बदलण्याच्या चर्चेने दलित समाजातही भाजपच्या विरोधात अस्वस्थता होती. याचाही फटका वंचितला बसला आहे."
- 10:24 AM • 19 May 2024
भाजपच्या माजी सरपंचाची हत्या
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी तीन जणांची हत्या केली. आधी शोपिया, नंतर अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाने प्राण गमावले, तर दोघे जखमी झाले. यात भाजपच्या माजी सरपंचाचाही समावेश आहे.
शोपियातील हिरपोरा भागात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास माजी सरपंच एजाज शेख यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
अनंतनागमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात जयपूर येथील पत्नी-पत्नी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
- 10:18 AM • 19 May 2024
Lok Sabha election : 'जे सहमत नाहीत ते बाहेर जातील', अधीर रंजन यांना खरगेंनी फटकारले
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ते म्हणाले की, राज्यात राजकीयदृष्ट्या त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा नाश करू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने मी बोलू शकत नाही. त्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी फटकारले आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता अधीर रंजन चौधरी म्हणाले, 'बंगालमध्ये मला आणि आमच्या पक्षाला राजकीयदृष्ट्या नष्ट करू इच्छित असलेल्या व्यक्तीच्या बाजूने मी बोलू शकत नाही. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा लढा आहे. मी त्याच्या वतीने बोललो आहे.'
चौधरी म्हणाले की, 'ममता बॅनर्जींना त्यांचा विरोध हा त्यांच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेतून आहे. वैयक्तिक स्वार्थ किंवा गैरसोयीमुळे नाही. माझे त्यांच्याशी वैयक्तिक वैर नाही. पण मी त्यांच्या राजकीय नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.'
अधीर रंजन हे बंगालच्या बहरमपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. 2019 मध्ये ते येथून विजयी झाले होते.
अधीर रंजन ममता बॅनर्जींबाबत कोणताही निर्णय घेणार नाहीत: खरगे
ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले होते की, केंद्रात इंडिया ब्लॉकचे सरकार स्थापन झाल्यास त्या बाहेरून पाठिंबा देतील. त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना अधीर रंजन चौधरी म्हणाले होते की, 'ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवता येणार नाही. त्या भाजपसोबत जाऊ शकतात.
याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विचारले असता ते म्हणाले, 'ममता बॅनर्जी या आघाडीसोबत आहेत. नुकतेच त्यांनी सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. अधीर रंजन चौधरी कोणताही निर्णय घेणार नाहीत. निर्णय मी आणि हायकमांड घेईल, जे सहमत नसतील ते बाहेर पडतील", असे सांगत खरगे अधीर रंजन चौधऱींना फटकारले आहे.
- 10:10 AM • 19 May 2024
Maharashtra Lok Sabha Election : "महाविकास आघाडी 46 जागा जिंकेल"
"महाराष्ट्रात महाविकास आघाडी ४८ पैकी ४६ जागा जिंकणार आहे. महायुतीला एकही जागा मिळणार नाही, असं म्हणणार नाही. त्यांनाही काही जागा मिळतील, पण महाविकास आघाडी जास्त जागा जिंकेल", असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे.
मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना मल्लिकार्जून खरगे यांनी हे भाकित केले. "भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. विरोधी पक्षात फूट पाडली जात आहे. सत्याची बाजू मांडणाऱ्या पक्षांकडून पक्ष व चिन्ह काढून भाजपचे समर्थन करणाऱ्यांकडे दिले जात आहे. पण, यावेळी जनता फसणार नाही. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी देशात आमचे सरकार येणार, हे नक्की आहे", असा विश्वास मल्लिकार्जून खरगे यांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT