लाइव्ह

Maharashtra Exit Poll Result 2024 Live : पाहा India Today चा महाराष्ट्रातील एक्झिट पोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

महायुती आणि महाविकास आघाडी... एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा?
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल, कुणाला किती जागा मिळणार?
social share
google news

Exit Polls 2024 LIVE Update : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर सगळ्यांना वेध असतील, ते ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाचे!

सातव्या टप्प्यातील मतदान पार पडण्यापूर्वीच अनेक राजकीय विश्लेषकांनी, निवडणूक अभ्यासकांनी वेगवेगळे अंदाज मांडले आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, पुन्हा एकदा भाजप सत्तेत येताना दिसत आहे, पण बहुमतांपासून दूर असेल. एनडीएला बहुमत मिळेल. 

दुसरीकडे काहींचे अंदाज आहेत की, भाजप बहुमत मिळवू शकते. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यातील निवडणुकीच्या निकालावर भाजपच्या जागांचे गणित अवलंबून असेल, असेही राजकीय अभ्यासक म्हणत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशाने कुणाला जनादेश दिला, हे स्पष्ट होईल. पण, त्यापूर्वीचे समोर आलेल्या एक्झिट पोल कुणाला कौल देताहेत... सर्व एक्झिट पोलचे आकडेवारी वाचा...

लाइव्हब्लॉग बंद

  • 09:08 PM • 01 Jun 2024

    Maharashtra Exit Poll Result 2024 Live: India Today- Axis My India च्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राचा नेमका अंदाज काय?

    महायुती : 28 - 32
    महाविकास आघाडी: 16-20 
    इतर: 0-2

    • भाजप: 20-22
    • शिवसेना (शिंदे गट): 8-10
    • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): 1-2
    • काँग्रेस: 3-4
    • शिवसेना (ठाकरे गट): 9-11 
    • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 3-5
    • अपक्ष: 0-2
    • रासप: 0 
  • 08:46 PM • 01 Jun 2024

    Maharashtra Exit Poll Result 2024 Live: इंडिया TV च्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राचा नेमका अंदाज काय?

    महायुती : 24-32
    मविआ : 17-24

    • भाजप - 18-22
    • शिवसेना (शिंदे गट) : 5-7 
    • शिवसेना (ठाकरे गट) : 9-13
    • NCP (अजित पवार) : 1-3
    • NCP (शरद पवार) : 4-5
    • कॉंग्रेस - 4-6
    • इतर - 0-0
  • 08:41 PM • 01 Jun 2024

    Maharashtra Exit Poll Result 2024 Live: News 18 lokmat सर्व्हेमध्ये महाराष्ट्राचा नेमका अंदाज काय?

    महायुती : 32-35
    मविआ : 15-18

    • भाजप : 23
    • कॉंग्रेस :  05
    • शिवसेना (शिंदे गट) - 07
    • NCP (अजित पवार गट) - 02
    • NCP ( शरद पवार गट) - 04 
    • शिवसेना (ठाकरे गट) - 07
  • 08:33 PM • 01 Jun 2024

    Maharashtra Exit Poll Result 2024 Live: विजय झाला तर माजायचं नाही अन् पराभव झाला तर..: सुधीर मुनगंटीवार

    मी माझं काम केलं विजय झाला तर माजायचं नाही आणि पराभव झाला तर लाजायचं नाही... मला मत द्यायचं की नाही याचा संपूर्ण अधिकार जनतेचा आहे... मी काँग्रेससारखे खोटे आश्वासन कधी देणार नाही. जनतेने काँग्रेसला निवडून दिल्याने त्यांचं भलं होणार असेल तर असं जनतेला वाटत असेल, तर ठीक आहे. पण  मी निवडून आलो तर जीव तोडून काम केल्याशिवाय राहणार नाही. 

     

    काँग्रेसला निवडून दिल्याने जर जनतेचे प्रश्न सुटत असेल असं जनतेला वाटत असेल पाच वर्ष मी निश्चित राहील.

     

    भाजप आणि एनडीएला आशीर्वाद द्यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष कष्ट घेतले.. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे जनता आपल्या मतरूपी आशीर्वाद एनडीएच्या मागे उभा करेल.

     

    काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष विकास प्रगती यावर कमी बोलेले.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विखारी शब्दांचा उपयोग झाला. 

     

    देश किती मागे आहे जाती जातीत भेद निर्माण होतात या सर्व वातावरणात 'पब्लिक है सब जानती है'  मत रुपी आशीर्वाद आमच्या बाजूने असेल हा आमचा विश्वास आहे.

     

    मी कधी अंदाज करत नाही. आणि चार जूनपूर्वी करण्याची बिलकुल गरज नाही. मात्र या सर्वेपासून दिशा प्राप्त होते. यापूर्वी छत्तीसगड मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये इंडियाचा आघाडीचा विजय होईल असे म्हणायचे पण जनतेने विकासाच्या बाजूने मत दिलेलं.

     

  • ADVERTISEMENT

  • 08:20 PM • 01 Jun 2024

    Maharashtra Exit Poll Result 2024 Live: TV9- Polstrat सर्व्हेमध्ये महाराष्ट्राचा नेमका अंदाज काय?

    भाजप : 18 
    कॉंग्रेस :  05
    NCP (अजित पवार) : 00
    NCP (शरद पवार) : 06
    शिवसेना (शिंदे गट) : 04
    शिवसेना (ठाकरे गट) : 14
    अपक्ष - 1

  • 07:05 PM • 01 Jun 2024

    Maharashtra Exit Poll Result 2024 Live: एबीपी-सी व्होटरचा महाराष्ट्रातील एक्झिट पोल

    एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार नेमक्या कुणाला किती जागा मिळतील?

    महायुती - 22 ते 26 जागा मिळू शकतात

    • भाजप - 17 
    • शिवसेना (शिंदे गट)- 06 
    • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 01 

    महाविकास आघाडीला - 23 ते 24 जागा मिळू शकतात

    • काँग्रेस - 08  
    • शिवसेना (ठाकरे गट)- 09
    • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 06

    अपक्ष - 01 

  • ADVERTISEMENT

  • 06:40 PM • 01 Jun 2024

    Maharashtra Exit Poll Result 2024 Live: द स्ट्रेलेमाचा एक्झिट पोल

    महाराष्ट्राचा पहिला एक्झिट पोल आला समोर.. पाहा द स्ट्रेलेमाचा एक्झिट पोलमधील नेमका काय अंदाज?

    द स्ट्रेलेमाच्या एक्झिट पोलनुसार पाहा महाराष्ट्रात कोणाला किती टक्के मतं मिळतील

     

  • 06:24 PM • 01 Jun 2024

    Maharashtra Exit Poll Result 2024 Live: महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील मतांची टक्केवारी आणि महत्त्वाचे उमेदवार

    पहिला टप्पा - 5 मतदारसंघातील महत्त्वाचे उमेदवार

    19 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडलं.. राज्यात पहिल्या टप्प्यात एकूण 63.71% मतदान झालं.

    1. रामटेक (उमेदवार) एकूण मतदान - 61.01%

    शिवसेना (शिंदे गट) - राजू पारवे
    काँग्रेस - श्यामकुमार बर्वे
    अपक्ष - किशोर गयभिजे (वंचित पाठिंबा)

    2. नागपूर (उमेदवार) एकूण मतदान - 54.32%

    भाजप - नितीन गडकरी 
    काँग्रेस - विकास ठाकरे

    3. भंडारा-गोंदिया (उमेदवार) एकूण मतदान - 67.04%

    भाजप  - सुनील मेंढे 
    काँग्रेस - प्रशांत पडोळे
    वंचित - संजय केवट

    4. गडचिरोली-चिमूर (उमेदवार) एकूण मतदान - 71.88%

    भाजप - अशोक नेते
    काँग्रेस - नामदेव किरसान
    वंचित - हितेश मडावी

    5. चंद्रपूर (उमेदवार) एकूण मतदान - 67.55%

    काँग्रेस - प्रतिभा धानोरकर
    भाजप - सुधीर मुनगंटीवार
    वंचित - राजेश बेले

    दुसरा टप्पा - 8 मतदारसंघातील महत्त्वाचे उमेदवार

    26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडलं.. राज्यात दुसऱ्या टप्प्यात एकूण 62.71% मतदान झालं.

    1. बुलढाणा (उमेदवार) एकूण मतदान - 62.03%

    शिवसेना (शिंदे गट) - प्रतापराव जाधव 
    शिवसेना (ठाकरे गट)- नरेंद्र खेडेकर
    वंचित - वसंत मगर
    अपक्ष - रविकांत तुपकर

    2. अकोला (उमेदवार) एकूण मतदान - 61.79%

    भाजप - अनुप धोत्रे
    काँग्रेस - अभय पाटील
    वंचित- प्रकाश आंबेडकर

    3. अमरावती (उमेदवार) एकूण मतदान - 63.67%

    भाजप - नवनीत राणा 
    काँग्रेस - बळवंत वानखेडे
    अपक्ष - आनंदराज आंबेडकर
    प्रहार - दिनेश बुब

    4. वर्धा (उमेदवार) एकूण मतदान - 64.85%

    भाजप - रामदास तडस 
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - अमर काळे
    वंचित- राजेंद्र साळुंके

    5. यवतमाळ-वाशिम (उमेदवार) एकूण मतदान - 62.87%

    शिवसेना (शिंदे गट) - राजश्री पाटील
    शिवसेना (ठाकरे गट)-  संजय देशमुख

    6. हिंगोली (उमेदवार) एकूण मतदान - 63.54%

    शिवसेना (शिंदे गट)- बाबुराव कदम-कोहळीकर
    शिवसेना (ठाकरे गट) - नागेश पाटील-आष्टीकर
    वंचित - बी. डी. चव्हाण

    7. नांदेड (उमेदवार) एकूण मतदान - 60.94%

    भाजप - प्रतापराव चिखलीकर 
    काँग्रेस - वसंत चव्हाण
    वंचित - अविनाश बोसीकर

    8. परभणी (उमेदवार) एकूण मतदान - 62.26%
      
    रासप (NCP अजित पवारांच्या कोट्यातून) - महादेव जानकर
    शिवसेना (ठाकरे गट) - संजय जाधव 
    वंचित - पंजाबराव डख

    तिसरा टप्पा - 11 मतदारसंघातील महत्त्वाचे उमेदवार

    7 मे 2024 रोजी मतदान पार पडलं.. राज्यात तिसऱ्या टप्प्यात एकूण 63.55% मतदान झालं.

    1. रायगड (उमेदवार)  एकूण मतदान - 60.51%

    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- सुनील तटकरे
    शिवसेना (ठाकरे गट) - अनंत गीते
    वंचित - कुमुदिनी चव्हाण
     
    2. बारामती (उमेदवार) एकूण मतदान - 59.50%

    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - सुनेत्रा पवार
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - सुप्रिया सुळे

    3. धाराशिव (उमेदवार) एकूण मतदान - 63.88%
     
    भाजप - अर्चना पाटील
    शिवसेना (ठाकरे गट) - ओमराजे निंबाळकर 
    वंचित - भाऊसाहेब आंधळकर
     
    4. लातूर (उमेदवार) एकूण मतदान - 62.59%

    भाजप - सुधाकर श्रृंगारे
    काँग्रेस - शिवाजीराव कलगे
    वंचित - नरसिंहराव उदगीरकर 

    5. सोलापूर (उमेदवार) एकूण मतदान - 59.19%

    भाजप - राम सातपुते
    काँग्रेस - प्रणिती शिंदे

    6. माढा (उमेदवार) एकूण मतदान - 63.65%
     
    भाजप - रणजितसिंह नाईक निंबाळकर 
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - धैर्यशील मोहिते पाटील
    वंचित - रमेश बारसकर

    7. सांगली (उमेदवार) एकूण मतदान - 62.27%

    भाजप - संजय काका पाटील 
    शिवसेना (ठाकरे गट) - चंद्रहार पाटील
    अपक्ष - विशाल पाटील (वंचित पाठिंबा)
    ओबीसी स्वतंत्र पक्ष - प्रकाश शेंडगे

    8. सातारा (उमेदवार) एकूण मतदान - 63.16%

    भाजप - उदयनराजे भोसले
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - शशिकांत शिंदे
    वंचित - प्रशांत कदम
    अपक्ष - अभिजीत बिचुकले

    9. रत्नागिरी-सिंधुदुर्ग (उमेदवार) एकूण मतदान - 62.52%
     
    भाजप - नारायण राणे
    शिवसेना (ठाकरे गट) - विनायक राऊत
    वंचित - मारोती काका जोशी

    10. कोल्हापूर (उमेदवार) एकूण मतदान - 71.59%

    शिवसेना (शिंदे गट) - संजय मंडलिक
    काँग्रेस - शाहू महाराज छत्रपती 
     
    11. हातकणंगले (उमेदवार) एकूण मतदान - 71.11%

    शिवसेना (शिंदे गट) - धैर्यशील माने 
    शिवसेना (ठाकरे गट) - सत्यजित पाटील 
    स्वाभिमानी - राजू शेट्टी 
    वंचित - दादासाहेब चवगौंडा पाटील

    चौथ्या टप्प्यातील मतदान: 11 मतदारसंघातील उमेदवार

    13 मे 2024 रोजी मतदान पार पडलं.. राज्यात चौथ्या टप्प्यात एकूण 62.21% मतदान झालं.

    1. नंदुरबार (उमेदवार) एकूण मतदान - 70.68%

    भाजप - हिना गावित
    काँग्रेस - गोवाल पडवी
    वंचित - हनुमंत सूर्यवंशी 

    2. जळगाव (उमेदवार) एकूण मतदान - 58.47%

    भाजप - स्मिता वाघ
    शिवसेना (ठाकरे गट) - करण पवार
    वंचित - युवराज जाधव

    3. रावेर (उमेदवार) एकूण मतदान - 64.28%

    भाजप - रक्षा खडसे
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)- श्रीराम पाटील
    वंचित - संजय ब्राह्मणे 

    4. जालना (उमेदवार) एकूण मतदान - 69.18%

    भाजप - रावसाहेब दानवे
    काँग्रेस - कल्याण काळे
    वंचित - प्रभाकर बाकले

    5. छ. संभाजीनगर (उमेदवार) एकूण मतदान -  63.03%

    शिवसेना (शिंदे गट)- संदीपान भुमरे
    शिवसेना (ठाकरे गट) - चंद्रकांत खैरे
    एमआयएम - इम्तियाज जलील
    वंचित - अफसर खान

    6. मावळ (उमेदवार) एकूण मतदान - 54.87%

    शिवसेना (शिंदे गट) - श्रीरंग बारणे
    शिवसेना (ठाकरे गट) -संजोग वाघेरे
    वंचित - माधवी जोशी

    7. पुणे (उमेदवार) एकूण मतदान - 53.54%

    भाजप - मुरलीधर मोहोळ
    काँग्रेस - रविंद्र धंगेकर
    वंचित - वसंत मोरे
     
    8. शिरूर (उमेदवार) एकूण मतदान - 54.16%

    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - शिवाजीराव आढळराव
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - अमोल कोल्हे 
    वंचित - आफताब शेख

    9. अहमदनगर (उमेदवार) एकूण मतदान - 66.61%

    भाजप - सुजय विखे 
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - निलेश लंके

    10. शिर्डी (उमेदवार) एकूण मतदान - 63.03%

    शिवसेना (शिंदे गट) - सदाशिव लोखंडे 
    शिवसेना (ठाकरे गट) - भाऊसाहेब वाकचौरे
    वंचित - उत्कर्षा रुपवते

    11. बीड (उमेदवार) एकूण मतदान - 70.92%

    भाजप - पंकजा मुंडे
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - बजरंग सोनवणे
    वंचित - अशोक हिंगे-पाटील

    पाचव्या टप्प्यातील मतदान: 13 मतदारसंघातील उमेदवार

    20 मे 2024 रोजी मतदान पार पडलं.. राज्यात पाचव्या टप्प्यात एकूण 56.89% मतदान झालं.

    1. मुंबई उत्तर  (उमेदवार) एकूण मतदान - 57.02%*

    भाजप - पीयूष गोयल
    काँग्रेस- भूषण पाटील
    वंचित - सोनल गोंडाणे

    2. मुंबई उत्तर मध्य  (उमेदवार) एकूण मतदान - 51.98%

    काँग्रेस - वर्षा गायकवाड
    भाजप - उज्वल निकम
    वंचित - संतोष अंबुलगे

    3. मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य)  (उमेदवार) एकूण मतदान - 56.37%

    भाजप - मिहिर कोटेचा
    शिवसेना (ठाकरे गट) - संजय दीना पाटील
    वंचित - दौलत खान

    4. मुंबई उत्तर पश्चिम  (उमेदवार) एकूण मतदान - 54.84%

    शिवसेना (ठाकरे गट) - अमोल किर्तीकर
    शिवसेना (शिंदे गट) - रविंद्र वायकर
    वंचित - परमेश्वर रणशूर

    5. मुंबई दक्षिण  (उमेदवार) एकूण मतदान - 50.06%

    शिवसेना (ठाकरे गट) - अरविंद सावंत 
    शिवसेना (शिंदे गट)- यामिनी जाधव
    वंचित - अफजल दाऊदानी

    6. मुंबई दक्षिण मध्य  (उमेदवार) एकूण मतदान - 53.60%

    शिवसेना (शिंदे गट) - राहुल शेवाळे 
    शिवसेना (ठाकरे गट) - अनिल देसाई
    वंचित - अबुल हसन खान

    7. ठाणे  (उमेदवार) एकूण मतदान - 52.09%

    शिवसेना (शिंदे गट)- नरेश म्हस्के
    शिवसेना (ठाकरे गट)- राजन विचारे 
    वंचित - रामराव केंद्रे

    8. भिवंडी  (उमेदवार) एकूण मतदान - 59.89%

    भाजप - कपिल पाटील
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - बाळ्यामामा म्हात्रे
    अपक्ष - निलेश सांबरे (वंचित पाठिंबा)

    9. पालघर (उमेदवार) एकूण मतदान - 63.91%

    भाजप - हेमंत सावरा
    शिवसेना (ठाकरे गट) - भारती कामडी
    वंचित - विजया म्हात्रे

    10. धुळे (उमेदवार) एकूण मतदान - 60.21%

    भाजप - सुभाष भामरे
    काँग्रेस -  शोभा बच्छाव
    वंचित - अब्दुर रहमान

    11. दिंडोरी (उमेदवार) एकूण मतदान - 66.75%

    भाजप - भारती पवार 
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) -  भास्कर भगरे
    वंचित - मालती थविल

    12 .नाशिक (उमेदवार) एकूण मतदान - 60.75%

    शिवसेना (शिंदे गट)- हेमंत गोडसे
    शिवसेना (ठाकरे गट)- राजाभाऊ वाजे 
    वंचित - करण गायकर
    अपक्ष - शांतीगिरी महाराज

    13. कल्याण (उमेदवार) एकूण मतदान - 50.12%

    शिवसेना (शिंदे गट)- श्रीकांत शिंदे
    शिवसेना (ठाकरे गट)- वैशाली दरेकर
    वंचित - मोहम्मद शेख

  • 05:24 PM • 01 Jun 2024

    Maharashtra मध्ये मतदान वाढलं.. नेमका कोणाला बसणार फटका? पाहा संपूर्ण आकडेवारी

    लोकसभा निवडणूक 2024 साठी टप्प्यांनुसार महाराष्ट्रात किती झालं मतदान?

    • पहिला टप्पा महाराष्ट्र - 63.71%
    • दुसरा टप्पा महाराष्ट्र - 62.71%
    • तिसरा टप्पा महाराष्ट्र - 63.55%
    • चौथा टप्पा महाराष्ट्र - 62.21%
    • पाचवा टप्पा महाराष्ट्र - 56.89 

    2019 आणि 2024 लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय झालेले मतदान -  

    भंडारा -गोंदिया - 68.81% - (2019)
    भंडारा -गोंदिया - 67.04% - (2024)
    चंद्रपूर - 64.89% - (2019)
    चंद्रपूर - 67.55% - (2024)
    गडचिरोली-चिमूर - 72.33% - (2019)
    गडचिरोली-चिमूर - 71.88% - (2024)
    नागपूर - 54.94% - (2019)
    नागपूर - 54.32% - (2024)
    रामटेक - 62.30% - (2019)
    रामटेक - 61.01% - (2024)
    अमरावती - 60.76% - (2019)
    अमरावती - 63.67% - (2024)
    नांदेड - 65.69% - (2019)
    नांदेड - 60.94% - (2024)
    यवतमाळ वाशिम - 61.31% - (2019)
    यवतमाळ वाशिम - 62.87% - (2024)
    अकोला - 60.06% - (2019)
    अकोला - 61.79% - (2024)
    बुलढाणा - 63.60% - (2019)
    बुलढाणा - 62.03% - (2024)
    हिंगोली - 66.84% - (2019)
    हिंगोली - 63.54% - (2024)
    परभणी - 63.12% - (2019)
    परभणी - 62.26% - (2024)
    वर्धा - 61.53% - (2019)
    वर्धा - 64.85% - (2024)
    लातूर - 62.44% - (2019)
    लातूर - 62.59% - (2024)
    बारामती - 61.82% - (2019)
    बारामती - 59.50% - (2024)
    कोल्हापूर - 70.86% - (2019)
    कोल्हापूर - 71.59% - (2024)
    रायगड - 62.17% - (2019)
    रायगड - 60.51% - (2024)
    उस्मानाबाद - 63.76% - (2019)
    उस्मानाबाद - 63.88% - (2024)
    सांगली - 65.92% - (2019)
    सांगली - 62.27% - (2024)
    सातारा - 60.47% - (2019)
    सातारा - 63.16% - (2024)
    हातकणंगले - 70.60% - (2019)
    हातकणंगले - 71.11% - (2024)
    सोलापूर - 58.67% - (2019)
    सोलापूर - 59.19% - (2024)
    रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 61.99% - (2019)
    रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 62.52% - (2024)
    माढा - 63.77% - (2019)
    माढा - 63.65% - (2024)
    बीड - 70.17% - (2019)
    बीड - 70.92% - (2024)
    जालना - 64.75% - (2019)
    जालना - 69.18% - (2024)
    छ. संभाजीनगर - 63.55% - (2019)
    छ. संभाजीनगर - 63.03% - (2024)
    पुणे - 49.89% - (2019)
    पुणे - 53.54% - (2024)
    मावळ -59.59% - (2019)
    मावळ -54.87% - (2024)
    शिरूर- 59.44%- (2019)
    शिरूर- 54.16% - (2024)
    अहमदनगर - 64.79% - (2019)
    अहमदनगर - 66.61% - (2024)
    जळगाव - 56.55% - (2019)
    जळगाव - 58.47% - (2024)
    नंदूरबार - 68.65% - (2019)
    नंदूरबार - 70.68% - (2024)
    रावेर - 61.77% - (2019)
    रावेर - 64.28% - (2024)
    शिर्डी - 64.93% - (2019)
    शिर्डी - 63.03% - (2024)
    धुळे - 57.05% - (2019)
    धुळे - 60.21% - (2024) 
    दिंडोरी - 65.71% - (2019)
    दिंडोरी - 66.75% - (2024) 
    नाशिक - 59.53% - (2019)
    नाशिक - 60.75% - (2024)
    पालघर - 63.76% - (2019)
    पालघर - 63.91% - (2024) 
    भिवंडी - 53.20% - (2019)
    भिवंडी - 59.89% - (2024) 
    कल्याण - 45.31% - (2019)
    कल्याण - 50.12% - (2024) 
    ठाणे - 49.39% - (2019)
    ठाणे - 52.09% - (2024) 
    मुंबई उत्तर - 60.09% - (2019)
    मुंबई उत्तर - 57.02% - (2024) 
    मुंबई उत्तर-पश्चिम - 54.31% - (2019)
    मुंबई उत्तर-पश्चिम - 54.84% - (2024) 
    मुंबई उत्तर-पूर्व - 57.23% - (2019)
    मुंबई उत्तर-पूर्व - 56.37% - (2024) 
    मुंबई उत्तर-मध्य - 53.68% - (2019)
    मुंबई उत्तर-मध्य - 51.98% - (2024) 
    मुंबई दक्षिण-मध्य - 55.40% - (2019)
    मुंबई दक्षिण-मध्य - 53.60% - (2024) 
    मुंबई दक्षिण - 51.59% - (2019)
    मुंबई दक्षिण - 50.06% - (2024) 

     

  • 05:22 PM • 01 Jun 2024

    'भाजप-NDA महाराष्ट्रात केवळ 'एवढ्याच' जागा जिंकणार', योगेंद्र यादवांनी आकडाच सांगितला

    देशातील आकडेवारीसोबत योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या आकडेवारीचा देखील अंदाज व्यक्त केला. त्यांनी जो अंदाज वर्तवला आहे त्याने भाजप आणि एनडीएची चिंता मात्र नक्कीच वाढली आहे.

     News Tak शी खास बातचीत करताना योगेंद्र यादव म्हणाले की, '2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-एनडीएचे मोठे नुकसान होत आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत, त्यापैकी 2019 च्या निवडणुकीत एनडीएला 42 जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी एनडीएला तब्बल 20 जागांवर नुकसान होऊ शकतं. म्हणजेच 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. आणि एनडीएचे जे काही नुकसान होईल, त्याचा थेट फायदा हा India आघाडीला होईल. गेल्या वेळी 6 जागांवर मर्यादित असलेल्या विरोधी आघाडीला यावेळी 26 जागा मिळू शकतात.' असे त्यांचे म्हणणे आहे.

    दरम्यान, देशभरात भाजपला किती जागा मिळतील यावर उत्तर देताना योगेंद्र यादव म्हणाले की, 'मला वाटते की, या निवडणुकीत भाजपला कोणत्याही परिस्थितीत 272 जागांचा बहुमताचा आकडा मिळेल असे वाटत नाही. भाजपला जवळपास 250 जागा मिळू शकतात. पण त्यांच्या जागा 230 पर्यंत खाली आल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. भाजपचा मित्रपक्ष एनडीएला मिळणाऱ्या जागांवर ते म्हणाले की, एनडीए मिळून बहुमताचा आकडा म्हणजेच 272 जागांपर्यंत पोहोचू शकेल, परंतु मला याबद्दल खात्री नाही.'

  • 05:16 PM • 01 Jun 2024

    महाराष्ट्राचा कौल कुणाच्या बाजूने? पाहा Exit Poll LIVE

    LIVE Streaming पाहण्यासाठी पुढील लिंकवर करा क्लिक: https://www.youtube.com/watch?v=QGbkzh7UWLM

  • 05:06 PM • 01 Jun 2024

    Lok Sabha Election 2024 मध्ये महायुती की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी?

  • 12:24 PM • 01 Jun 2024

    Lok Sabha exit poll Updates : महाराष्ट्रात २०१९ मध्य काय होते एक्झिट पोलचे अंदाज?

    २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्त स्वरुपात मोदी लाट दिसून आली होती. दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर भाजपने ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. पण, महाराष्ट्रात किती जागा जिंकल्या होत्या आणि एक्झिट पोलेचे अंदाज काय होते, ते पहा... (2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होती.)

    Maharashtra Lok Sabha election Exit poll
    एक्झिट पोल एजन्सी      युती आघाडी
    आज तक अ‍ॅक्सिस माय इंडिया 38-42 6-10
    इंडिया टीव्ही सीएनएक्स 34 14
    टाइम्स नाऊ वीएमआर 38     10
    एबीपी सी व्होटर 34     14

    निकाल काय लागला होता?

    प्रत्यक्ष निकाल लागले तेव्हा भाजप-शिवसेना युतीला ४१ जागा मिळाल्या, तर आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 5, तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती.

follow whatsapp

ADVERTISEMENT