Maharashtra Lok Sabha : "तिकीट न देण्यासाठी एकनाथ शिंदेंवर होता दबाव", शिवसेना नेत्याने फोडला बॉम्ब

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra lok sabha result 2024 bhavana gawali big reavelation on yavatmal washim candidancy rajashri patil
शिंदे साहेबांमध्ये मला उमेदवारी देण्याची तळमळ होती
social share
google news

Bhawana Gawali News : जका खान, बुलढाणा : भाजपने जागावाटपात हस्तक्षेप केल्यामुळेच अनेक जागा गमवावा लागल्याचा सूरू सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत आहे. यामुळे अनेक जागांवर पराभवाचा सामना करावा लागल्याचीही कुजबुज आहे. असे असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माजी खासदार भावना गवळी (Bhawana Gawali) यांच्या विधानाने एकच खळबळ माजली आहे. 'शिंदे साहेबांमध्ये मला उमेदवारी देण्याची तळमळ होती. पण त्यांच्यावर आणि पक्षावर दबाव असल्याचं' मोठं विधान भावना गवळी यांनी केले आहे. त्याच्या या विधानाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. (maharashtra lok sabha result 2024 bhavana gawali big reavelation on yavarmal washim candidancy rajashri patil )

ADVERTISEMENT

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात पाच वेळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांचे तिकीट कापून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण या निवडणुकीत राजश्री पाटील यांना पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे यवतमाळ वाशिम मतदार संघात शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. आता या निकालावर भावना गवळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

हे ही वाचा : Baramati Lok Sabha : अजित पवारांचा मतदारसंघच धोक्यात! बारामतीकरांचा 'मेसेज' काय?

भावना गवळी या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या. ''मला उमेदवारी देण्यासाठी एकनाथ शिंदे यांची तळमळ होती. पण त्या ठिकाणी शिंदे साहेब आणि पक्षावर दबाव होता. तसेच जनतेच्या मनात मीच होते, मात्र मला उमेदवारी न दिल्याने जनतेने मतांच्या माध्यमातून इच्छा व्यक्त केली असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले आहे. 

हे वाचलं का?

महाराष्ट्राचा आपण जो निकाल पाहतोय आणि जनतेची जी इच्छा होती ती कदाचित पक्षश्रेष्ठीकडून पुर्ण झाली नाही. त्यामुळे मताच्या रूपात जनतेनी आपली इच्छा दाखवली आहे असे म्हणायला हरकत नाही, असे भावना गवळी म्हणाल्या. तसेच हेमंत पाटील यांनी देखील मान्य केले होते की स्क्रिप्ट लिहली गेली होती. त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा जेव्हा स्क्रिप्ट लिहल्या जातात. तेव्हा त्या पक्षाच्या हिताच्या नसतात. कधी कधी सत्य हे कटू असतं पण ते बोललं पाहिजे,असे देखील भावना गवळी म्हणाल्या आहेत. मी नाराज होणाऱ्यापैकी नाही. माझ्या मनामध्ये खंत आहे. पण मी लढवय्या देखील आहे. मी शिवसेनेचं काम करते आहे. यानंतरही करत राहिन आणि आताही करते आहे, असे भावना गवळी यांनी स्पष्ट केले. 

हे ही वाचा : मोदींची सभा, फडणवीसांची ताकद... माढ्यात कोणत्या फॅक्टरमुळे झाला भाजपचा पराभव?

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT