लाइव्ह

Lok Sabha 2024 Live : काँग्रेसचा अकोल्याचा उमेदवार ठरला! अभय पाटील निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई तक

ADVERTISEMENT

congress, abhay patil
congress, abhay patil
social share
google news

Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रातील वातावरण लोकसभा निवडणुकीमुळे ढवळून निघाले आहे. प्रचाराचा धडाका सुरू झाला असून, दुसरीकडे काही जागांवरून महायुतीतील तिढा सुटण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीकडूनही ज्या जागांवर पेच आहे, त्यासंदर्भात स्पष्टता केली जाऊ शकते... यासंदर्भातील ताजे अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी...

ADVERTISEMENT

 

 

ADVERTISEMENT

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:18 PM • 01 Apr 2024

    काँग्रेसचा अकोल्याचा उमेदवार ठरला! अभय पाटील निवडणुकीच्या रिंगणात

     काँग्रेसने अकोला लोकसभा मतदार संघातून अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर वंचित आणि महाविकास आघाडीची युती तुटल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. 

  • 07:33 PM • 01 Apr 2024

    'मोदींच्या नावावर अनेक दगडं तरली', भाजप नेत्याची ठाकरेंच्या खासदारावर टीका

    भारतीय जनता पक्ष आणि आमचा मित्र पक्ष या निवडणुकीत महादेव जानकरांना निवडून आणणार आहेत. राहिला परभणीचा प्रश्न आहे, तीन आमदार बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत. इथे येऊन आमदार झाली आहेत. खासदारही बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत. परभणी मतदार संघ हा मोदींनी मानणारा आहे. मोदीजींच्या नावावर अनेक दगडं तरली होती. त्यामुळे या निवडणुकीत आमच्यासमोर कोणतचं आव्हान नाही, अशी टीका बबणराव लोणीकर यांनी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर केली आहे. 

  • 03:15 PM • 01 Apr 2024

    Maharashtra News Live : "सरदार आता मला किती देता, हे विचारायला जातात"

    नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, "दिल्लीसमोर झुकायचं नाही, हा शरद पवार यांचा बाणा आहे. उद्धवजींचा बाणा आहे. महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी पुन्हा एकदा ही लढाई चालू केली आहे." 

    "आमच्यातील अनेक सरदार गेलेले आहेत. पण, सरदार तिकडे जाऊन पाचव्या, सहाव्या, सातव्या, दहाव्या रांगेत उभे राहतात, याचं आम्हाला दुःख आहे. सरदारांना पहिल्या रांगेत बसू देत नाहीत. सरदार आता मला किती देता, हे विचारायला जातात", असे जयंत पाटील म्हणाले.  

    "दिल्लीला जाऊन नमस्कार करतात. दिल्ली बाहेर ताटकळत ठेवते. आमचे सातारचे छत्रपती चार दिवस दिल्लीत राहिले, पण भेट नाही मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांची काय परंपरा आहे? दुसऱ्या रांगेत उभं केलं, तर छत्रपती शिवाजी महाराज दरबार सोडून परत निघून आले. आणि चार दिवस...", असे जयंत पाटील उदयनराजेंच्या दिल्ली दौऱ्याबद्दल म्हणाले.

    "महाराष्ट्राला स्वाभिमानाचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी दिलं आहे. ती परंपरा घेऊन आपल्याला लढायचं आहे. सगळ्या गोष्टी इथे होणार आहे. पाऊस पडेल...पैशाचा. इथल्या मतदारांवर माझा विश्वास आहे. तुम्ही मतांचा पाऊस पाडून त्या पावसाला उत्तर द्या", असे जयंत पाटील म्हणाले.  

  • 01:38 PM • 01 Apr 2024

    गाडी अडवताच अशोक चव्हाण फिरले माघारी, घटना काय?

    मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याची भूमिका घेतली आहे. पण, निवडणुकीमुळे मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे. याचा फटका अशोक चव्हाण यांना बसला आहे. 

    नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना हाकलून दिलं आहे. 

    नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगान ते या गावात मतदारांच्या भेटीगाठीसाठी आले होते. 'एक मराठा-लाख मराठा' अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

    गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. ग्रामस्थांचा रोष पाहून अशोक चव्हाण यांनीही काढता पाय घेतला. नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध पक्षाच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता असून प्रचार काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

  • ADVERTISEMENT

  • 10:19 AM • 01 Apr 2024

    मला अमित शाहांनी उमेदवारी दिली; जानकर काय बोलले?

    "माझी उमेदवारी मुंबईत ठरली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः दिल्लीमध्ये बोलावून मला उमेदवारी दिली. माझ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या सर्वांसमक्ष अमित शाह यांनी सांगितले की 'आपल्याला महादेव जानकर यांना परभणी लोकसभेची जागा द्यायची आहे.' तिथेच माझ्या परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारीचा निर्णय झाला", अशी माहिती रासपचे अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • 10:03 AM • 01 Apr 2024

    Lok Sabha Election 2024 : "फडणवीस मला उमेदवारी देणार होते, पण शिंदेंना...", आठवलेंचा गौप्यस्फोट

    शिर्डी लोकसभा मतदारसंघावर रामदास आठवले यांनीही दावा केला होता. पण, ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला गेली. त्यानंतर आता आठवलेंनी एक गौप्यस्फोट केला आहे. 

    "शिर्डी लोकसभा निवडणूक लढवण्याची मला इच्छा होती. २००९ मध्ये मी शिर्डीमधून लढलो होतो, त्यावेळी माझा पराभव झाला. या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मला शिर्डीमधून उमेदवारी द्यायला तयार होते. फडणवीस यांनी शिर्डीची जागा मला मिळावी म्हणून प्रयत्नही केले. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण असल्याने मला उमेदवारी मिळाली नाही", असे रामदास आठवले म्हणाले. 

  • ADVERTISEMENT

  • 09:54 AM • 01 Apr 2024

    Lok Sabha Election 2024 : मोदी मुंबईत, महायुतीचा तिढा सुटणार?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आरबीआयच्या एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी येणार आहेत. दुसरीकडे महायुतीचा जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची चिन्हे आहेत. महायुतीमध्ये काही जागांवर पेच निर्माण झालेला आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT