लाइव्ह

Maharashtra Live : अणूस्कूरा घाटात दरड कोसळली, कोल्हापूरचा कोकणाशी संपर्क तुटला

मुंबई तक

ADVERTISEMENT

ratnagiri news
ratnagiri news
social share
google news

Maharashtra news live : विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे... वाचा सगळ्या घटनांचे लाईव्ह अपडेट्स...

Maharashtra News Updates : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग येताना दिसत आहे. राज्यात विधान परिषद निवडणूक, राज्यसभा निवडणूक होत असून, त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. 

दुसरी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला जबर फटका बसला. त्यामुळे विधानसभेत यांचा फटका बसणार नाही, याची खबरदारी महायुतीतील पक्षांकडून घेतली जात असल्याचे दिसत आहे. 

सर्व घडामोडींची माहिती आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल जाणून घ्या लाईव्ह अपडेट्समध्ये....

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:29 PM • 13 Jun 2024

    अणूस्कूरा घाटात दरड कोसळली, कोल्हापूरचा कोकणाशी संपर्क तुटला

    राजापूर तालुक्यातील कोल्हापूर, मलकापूर,कराड या  मार्गाला जोडणारा पाचल येथील अनुस्कुरा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे कोल्हापूर मलकापूर कराडचा कोकणाशी संपर्क तुटला आहे. सध्या 
    कोल्हापूर मलकापूर कराड या मार्गावर जाणाऱ्या वाहतुकीला अन्यत्र वळविण्यात आले आहे. राजापूर पोलीस तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले असून रात्रीची वेळ असल्या कारणाने जेसीबीच्या सहकार्याने दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु मार्गावर मोठ मोठे दगड असल्यामुळे दरड बाजूला करणे हे रात्रीच्या वेळी शक्य नसल्याने सकाळपर्यंत मार्ग सुरळीत होईल असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

  • 07:18 PM • 13 Jun 2024

    अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपाचं नुकसान? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

    सुनेत्रा पवारांना दिलेली जागा ही राष्ट्रवादी काँग्रसेची जागा आहे. महायुतीमधून त्यांना सगळ्यांचं समर्थन आहे. मात्र महायुतीमधून हा नाही गेला तो नाही गेला, याला काही अर्थ नाही. सूरज चव्हाण काय बोलले? हे मला अजिबात माहिती नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले? 

  • 05:14 PM • 13 Jun 2024

    Manoj Jarange Updates : मनोज जरांगेंचा इशारा, 'विधानसभेला नाव घेऊन उमेदवार पाडू'

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ८ जून रोजी पासून उपोषण सुरू केले होते. १३ जून रोजी आंदोलन स्थगित करण्यात आले. 

    कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांवर सरकार काम करत असून, उपोषण सोडण्याची विनंती केली. 

    सरकारला निर्णय घेण्यासाठी १३ जुलै रोजीपर्यंत मनोज जरांगे यांनी वेळ दिला असून, तोपर्यंत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारला निर्णय घेण्यासाठी महिनाभराचा वेळ जरांगेंनी दिला आहे. 

    सरकारने निर्णय न घेतल्यास राजकारणात उतरू आणि विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, असा इशारा जरांगे यांनी सरकारला म्हणजेच महायुतीला दिला आहे. 

     

  • 04:17 PM • 13 Jun 2024

    सरकारला दिला नवा अल्टीमेटम, मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

    सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करणे,  आता 57/ 63 लाख नोंदींचा आधार मिळाला आहे, हैदराबादच गॅझेट घ्याला सांगितलं आहे, अंतरवालीसह राज्यातील गुन्हे मागे घ्यावेत, शिंदे समितीला रद्द नाही करायचं, तिला 24 तास सुरू ठेवायचं, अशा पाच मागण्या मनोज जरांगे पाटलांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. 

     जर तुम्ही 1 महिन्यात आरक्षण दिलं नाही तर आम्ही निवडणुकीत उतरणार आणि विधानसभेच्या 288 मतदार संघातील सगळ्या सीट पाडणार आहे. आजच्या तारखेपासून 1 महिन्यात जर आरक्षण दिलं नाही तर मी कोणाचच ऐकणार नाही.  13 जुलै पर्यंत सरकारला वेळ दिला आहे, 14 जुलै ला मी कोणाचंच ऐकणार नाही,असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आणि पाणी पिऊन उपोषण स्थगित केलं आहे. 
     

  • ADVERTISEMENT

  • 02:24 PM • 13 Jun 2024

    छगन भुजबळांच्या नाराजीवर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

    मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानते. आणि पक्षाने जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन. तसेच पक्षात कुठेही नाराजी नाही. या उलट भुजबळ साहेब माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. तसेच लोकसभा आणि राज्यसभेसाठी जनतेतून माझ्या नावासाठी मागणी होती. त्यामुळे सगळ्यांच्या संमतीने ही उमेदवारी दिली गेली असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. 

  • 12:56 PM • 13 Jun 2024

    Rajya Sabha Election Update : भुजबळांचा पत्ता कट, सुनेत्रा पवारच होणार 'खासदार'

    प्रफुल्ल पटेलांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे इच्छुक असलेल्या छगन भुजबळांचा पत्ता कट झाला आहे.

    नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी ही माहिती दिली. 

    "मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली. या बैठकीत पूर्णपणे विचार झाला. विचारांती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उभे करायचे आहे. त्यांचा अर्ज भरायचा, हा सर्वानुमते निर्णय झालेला आहे", असे भुजबळ यांनी जाहीर केले. 

    "मी इच्छुक होतो. माझ्याबरोबर आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी... असे अनेक जण इच्छुक होते. पण, शेवटी चर्चेअंती आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला", अशी माहिती भुजबळ यांनी दिली. 

     

  • ADVERTISEMENT

  • 10:54 AM • 13 Jun 2024

    काही झालं तरी महाराष्ट्राचे राज्य हातात घ्यायचे -शरद पवार

    लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांनी पुन्हा भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. बारामती मतदारसंघातील गावांना पवार भेटी देत असून, शिर्सुफळ गावात बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील सत्ता हातात घेण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. 

    "माणसे चांगली असतील, काम चांगले असेल आणि भूमिका योग्य असेल तर सामान्य माणूस हा योग्य रस्त्याने जातो. या देशात लोकशाही आहे, ती माझ्यामुळे टिकली नाही. पंतप्रधानांमुळे नाही, तर या देशातील १५ कोटी लोकांच्या सामुदायिक शहाणपणामुळे टिकली. ती आपण टिकवायची आहे."

    "तुमची एकजूट कायम ठेवा. तीन-चार महिन्यांनी महाराष्ट्राची निवडणूक येणार आहे. माझा प्रयत्न हा आहे की, काही झाले तरी महाराष्ट्राचे राज्य हातात घ्यायचे. ते घेण्यासाठी विधानसभा जिंकावी लागेल. विधानसभा जिंकण्याची वेळ माझ्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये येईल. काम असेच चालू ठेवा. चांगले लोक आपण महाराष्ट्रात आणू. महाराष्ट्राचे राज्य हातामध्ये आणू. काही अशक्य नाही. तुम्ही लोकांनी मला निवडून दिले. कितीदा राज्य हातात होते, चारवेळा", असे पवार म्हणाले. 

  • 09:27 AM • 13 Jun 2024

    Maharashtra Politics : सुनेत्रा काकी, पार्थ पवारांना आधीच शुभेच्छा -रोहित पवार

    प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक होत असून, या जागेवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार अशी चर्चा आहे. 

    यावरून रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.  "आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा सुरूय म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना Advance मध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन", असे रोहित पवारांनी म्हटले आहे. 

     

  • 09:16 AM • 13 Jun 2024

    Rajya Sabha election Update : सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार होणार?

    बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार आता राज्यसभेच्या खासदार होणार, असे सांगितले जात आहे. पार्थ पवार की सुनेत्रा पवार, कुणाला उमेदवारी द्यायची यावरून पेच होता. मात्र, सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

    सुनेत्रा पवार आज (१३ जून) अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लोकसभेला पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार या लवकरच राज्यसभेच्या खासदार होऊ शकतात. 

follow whatsapp

ADVERTISEMENT