PM Modi Assets : सोन्याच्या 4 अंगठ्या, बँकेत...; मोदींकडे किती संपत्ती?
Narendra Modi Net Worth : पंतप्रधान मोदींकडे सुमारे 45 ग्रॅम वजनाच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत. प्रतिज्ञापत्रात त्यांची किंमत 2 लाख 67 हजार 750 रूपये असल्याचे घोषित करण्यात आहे. विशेष म्हणजे या अंगठ्या ते कधीही घालत नाहीत. त्यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही किंवा कोणत्याही प्रकारचे त्यांच्यावर कर्जही नाही आहे.
ADVERTISEMENT
Narendra Modi Net Worth : नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. या प्रतिज्ञानापत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सध्या 3 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. (pm narendra modi bank balance income details education net worth election affidavit)
ADVERTISEMENT
53 हजार रोख
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे ना स्वत: च्या मालकीचे घर आहे, ना स्वत:चे कोणतेही वाहन आहे. पण पंतप्रधान मोदींजवळ सध्या 52 हजार 920 रूपयाची रोकड आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेत पंतप्रधान मोदींच्या बँक खात्यात 73 हजार 304 रूपये जमा आहेत. आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वाराणसीच्या शाखेत फक्त 7000 रूपये डिपॉझिट आहेत. याच बँकेत मोदींच्या 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रूपयांच्या एफडी देखील आहेत.
हे ही वाचा : Maharashtra Lok Sabha Election : पवार, ठाकरेंना मोदींची 'ऑफर', चार राजकीय अर्थ!
5 वर्षातील संपत्ती
पंतप्रधान मोदींनी यावेळी गेल्या पाच वर्षातील त्यांच्या संपत्तीची माहिती देखील सादर केली. 2018-19 मध्ये त्यांची संपत्ती 1 कोटी 11 लाख 14 हजार 230 रुपये होती. 2019-20 मध्ये 1 कोटी 72 लाख 7 हजार 60 रुपये, 2020-21 मध्ये 1 कोटी 70 लाख 7 हजार 930 रुपये संपत्ती त्यांच्याजवळ होती. 2021-22 मध्ये 15 लाख 41 हजार 870 आणि 2022-2023 मध्ये 23 लाख 56 हजार 80 रूपये त्यांची संपत्ती होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
4 सोन्याच्या अंगठ्या
पंतप्रधान मोदींकडे सुमारे 45 ग्रॅम वजनाच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत. प्रतिज्ञापत्रात त्यांची किंमत 2 लाख 67 हजार 750 रूपये असल्याचे घोषित करण्यात आहे. विशेष म्हणजे या अंगठ्या ते कधीही घालत नाहीत. त्यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही किंवा कोणत्याही प्रकारचे त्यांच्यावर कर्जही नाही आहे.
हे ही वाचा : 7 किलो सोने, 60 किलो चांदी...करोडोची मालकीण आहे बॉलिवूडची क्वीन
शैक्षणिक पात्रता किती?
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या शैक्षणित पात्रतेची माहिती देखील प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यानुसार पीएम मोदींनी 1967 मध्ये एसएससी बोर्ड, गुजरातमधूम एसएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांनी 1978 मध्ये दिल्ली विद्यापीठातून कला शाखेच पदवी प्राप्त केली होती.तर 1983 मध्ये गुजरात विद्यापीठ अहमदाबाद येथून मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT