Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात शरद पवार मोठी खेळी करणार, उदयनराजेंविरोधात हुकुमी एक्का बाहेर काढणार
Satara Lok Sabha Election 2024 : भाजपकडून उदयनराजे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून शरद पवार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. पण पवारांच्या बालेकिल्ल्यातच अंतर्गत गटबाजी सुरू आहे. या गटबाजीमुळे शरद पवारांना उमेदवार बदलावा लागणार आहे.
ADVERTISEMENT
Satara Lok Sabha Election 2024 : सकलेन मुलाणी, कराड : सातारा लोकसभेची जागा ही महायुतीत भाजपला तर महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. या जागेवर भाजपकडून उदयनराजे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून शरद पवार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. पण पवारांच्या बालेकिल्ल्यातच अंतर्गत गटबाजी सुरू आहे. या गटबाजीमुळे शरद पवारांना उमेदवार बदलावा लागणार आहे. त्यामुळे पवार साताऱ्याच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने हुकमी ऐका मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या शरद पवार करण्याची माहिती आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे विरूद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी लढत होण्याची शक्यता आहे. (satara lok sabha election 2024 sharad pawar prithviraj chavan udayanraje mahayuti vs maha vikas aghadi)
ADVERTISEMENT
खरं तर शरद पवार साताऱ्यातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे श्रीनिवास पाटील यांना विरोध होत आहे. हा वाढता विरोध पाहता श्रीनिवास पाटील आपले पुत्र सारंग पाटील यांच्यासाठी आग्रही आहेत. पण खासदार आणि त्यांचे पुत्र यांनी सर्वपक्षीय हितसंबध जपत राष्ट्रवादीतीलच कार्यकर्त्यांना बळ दिले नसल्याचा आरोप होत आहे. इतकेच नाही तर खासदार यांचे जन्मगाव असलेल्या पाटण तालुक्यातच राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाचा मोठा विरोध आहे. या विरोधातूनच शनिवारी होणाऱ्या मेळाव्यातील बॅंनरवर श्रीनिवास पाटील आणि त्याच्या पुत्राला डावलण्यात आले आहे. त्यामुळे आता शरद पवारांना सातारा लोकसभा मतदार संघात उमेदवार बदलावा लागणार आहे.
हे ही वाचा : Shivsena: अखेर शिंदेंकडून उमेदवार जाहीर, पाहा पहिली यादी
काँग्रेस नेता उतरणार मैदानात
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत छत्रपती उदयनराजे यांनी 2019 साली राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली आणि सव्वा लाखांच्या मतांनी विजयही मिळवला. पण अवघ्या चार- सहा महिन्यात राजीनामा देत भाजपाच्या कमळ चिन्हावर पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले. या काळात अचानक उमेदवार शोधण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आली.
हे वाचलं का?
त्यावेळेस तगडा उमेदवार म्हणून त्याकाळात पृथ्वीराज चव्हाण यांचेच नाव शरद पवारांनी पुढे केले होते. परंतु, अजित पवार तसेच इतरांचा विरोध आणि खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांची तयारी नसल्याने दुसरा उमेदवार शोधावा लागला होता. तेव्हा वय झाले असतानाही शरद पवारांनी आपला मित्र श्रीनिवास पाटील यांना बोलावणं धाडलं. अखेर पोटनिवडणूक झाली अन् सव्वा लाखांची मतांनी विजय मिळवणारे उदयनराजे भोसले 87 हजार मतांनी पराभूत झाले.
हे ही वाचा : रात्रीत कसं फिरलं बारामतीचं राजकारण? पवार-शिवतारेंच्या एकीची Inside Story
पण आता साताऱ्यात अंतर्गत गटबाजी आणि विरोधामुळे शरद पवारांना दुसरा उमेदवार शोधावा लागणार आहे. अशा परिस्थितीत शरद पवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने हुकमी एक्का मैदानात उतरवणार आहेत. याबाबतची घोषणा शरद पवार उद्याच्या सातारा दौऱ्यात करणार आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात पुथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सूरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT