Sharad Pawar : "2014 मध्ये महाविकास आघाडी करायची होती, पण...", पवारांनी सांगितली Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar big revealation on maha vikas aghadi maharashtra politics shiv sena ubt bjp lok sabha election 2024
उद्धव ठाकरे भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग फसला होता.
social share
google news

Sharad Pawar Big Revealation : ''राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) प्रयोग 2019 मध्ये केला होता. त्यानंतर आम्ही अडीच वर्षे सरकार चालवलं होतं. पण हा प्रयोग 2014 मध्ये करण्याचा प्रयत्न होता,पण तो यशस्वी झाला नाही'', असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. शरद पवारांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  (sharad pawar big revealation on maha vikas aghadi maharashtra politics shiv sena ubt bjp lok sabha election 2024)

ADVERTISEMENT

शरद पवार लोकसत्ताच्या लोकसंवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शरद पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. '2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर भाजपने न मागताच मी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यामागे शिवसेनेला भाजपबरोबर जाण्यापासून रोखायचे होते. कारण भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याचवेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा माझा प्रयत्न होता. पण उद्धव ठाकरे भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग फसला होता', असा खळबळजनक खुलासा शरद पवार यांनी केला. 

हे ही वाचा : "मला संध्याकाळीच पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला असता", पवारांचा गौप्यस्फोट

फडणवीसांचा दावा फेटाळला 

'माझा भाजप सरकारमध्ये शिवसेना सामील करण्यास 2017 मध्ये विरोध होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पक्षांचे सरकार हवे होते, या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात सत्य नाही. मी 2014, 2017 आणि 2019 मध्ये भाजपबरोबर सत्तेत जाण्यासाठी अजित पवार यांना पुढे करून आणि स्वत: ही चर्चा करून नंतर माघार घेतली व अजित पवार यांनी तोंडघशी पाडले, हे दावेही खोटे आहेत. उलट माझा आणि मोदी व भाजपबरोबर सत्ता सहभागासाठी विरोध होता'., असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

हे वाचलं का?

महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? 

देशात यंदा चित्र मला वेगळे दिसते, भाजपच्या विरोधात वातावरण अनुभवाला येते. महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वातावरण आहे. राज्यातील 50 टक्के जागा आम्ही नक्कीच जिंकू. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांमधील भाजपच्या जागा गत वेळच्या तुलनेत घटणार आहेत. काही राज्यांमध्ये काँग्रेसच्या जागा वाढतील असे चित्र आहे. 2019 च्या तुलनेत या निवडणुकीत भाजपचा देश पातळीवर आकडा कमी होईल, असा अंदाज शरद पवारांनी वर्तवला आहे. आता हा अंदाज किती खरा ठरतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा : पुण्यात पोर्शे कारने तरुण-तरुणीला चिरडले! थरकाप उडवणारी घटना

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT