Maharashtra Lok Sabha : "निकालानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार कुठे आहेत, हे शोधावं लागेल"
Yogendra Yadav prediction on Maharashtra lok sabha : योगेंद्र यादव यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था लोकसभा निवडणूक निकालानंतर वाईट होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
Yogendra Yadav prediction on Maharashtra lok sabha : योगेंद्र यादव यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था लोकसभा निवडणूक निकालानंतर वाईट होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
Lok Sabha election Maharashtra Prediction : लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील 48 जागांवर केंद्रातील बहुमताचे गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे या निकालाबद्दल देशात उत्सुकता आहे. ४ जून रोजी सायंकाळपर्यंत याबद्दलचे चित्र स्पष्ट झालेले असेल, पण, त्यापूर्वी राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी काही अंदाज मांडले आहेत. त्यात त्यांनी महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा फटका बसेल, असे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे या निवडणूक निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अवस्था खूपच वाईट होईल, असं विश्लेषण त्यांनी केले आहे. (Yogendra Yadav said that ajit pawar's ncp and Eknath shinde's shiv sena will Get to few seats in lok sabha election.)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी न्यूज Tak ला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
देशातील परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल कसे येतील, हे सांगतानाच योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्रात महायुतीला 20 जागांचा फटका बसताना दिसत असल्याचा अंदाज मांडला आहे.
हेही वाचा >> निकालाआधी नेत्यांची धडधड वाढणार, एक्झिट पोल कुठे आणि कधी पाहता येणार?
महत्त्वाचे म्हणजे भाजपला या निवडणुकीत 5 जागांचा फटका बसू शकतो, पण महायुतीला जो मोठा फटका बसताना दिसत आहे, तो एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे असंही ते म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
योगेंद्र यादव यांच्या अंदाजानुसार...
"माझ्या आकलनानुसार महाराष्ट्रात महायुतीला कमीत कमी २० जागांचा फटका बसताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रातील निवडणूक खरी शिवसेना कोणती? हे तर निश्चित झाले आहे. मुंबईत आल्यानंतर तर निर्णय झाला आहे. निवडणुकीत शिंदे आपटले आहेत. खरी राष्ट्रवादी कोणती, यातही शरद पवार भारी ठरले आहेत."
हेही वाचा >> महाराष्ट्रात महायुतीला मोठा झटका, MVA ला किती जागा येणार?
"एकूण अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीला ४२ जागा होत्या. यावेळी २२ पेक्षा जास्त जागा मिळताना मला दिसत नाहीयेत. हा हे जे २० जागांचे नुकसान आहे, यात भाजपला नुकसान केवळ ५ जागांवर आहे. १५ जागांचे नुकसान मित्रपक्षांमुळे आहे. माझ्या आकलनानुसार निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची अवस्था इतकी बिकट होईल की, तुम्हाला शोधावं लागेल की, ते कुठे आहेत?", असे विश्लेषण यादव यांनी केले आहे.
भाजपचं का होणार नाही नुकसान?
"भाजपला यामुळेही जास्त जागांचे नुकसान होणार नाही, कारण मागच्या वेळच्या तुलनेत त्यांनी यावेळी जास्त जागा लढवल्या आहेत. त्यामुळे भाजपला ४-५ जागांचे नुकसान होईल असा माझा अंदाज आहे", असेही योगेंद्र यादव म्हणाले.
ADVERTISEMENT