बारामतीत पवारांना कोणी दिला नकार?, बालेकिल्ल्यातील एक जबरदस्त Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

शरद पवारांचा व्यापारी मेळावा कोणी केला रद्द?
शरद पवारांचा व्यापारी मेळावा कोणी केला रद्द?
social share
google news

Sharad Pawar Baramati: वसंत मोरे, बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीकरांमध्ये देखील दोन गट पडले आहेत. बारामतीकरांच्या या गटबाजीचा फटका थेट शरद पवारांनाच बसला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ॲक्टिव मोडवर आलेल्या शरद पवारांवर  बारामतीतच आज (11 मार्च) व्यापारी मेळावा रद्द करण्याची वेळ आली. (sharad pawar businessmens gathering in baramati was suddenly cancelled read a stunning inside story lok sabha election 2024)

ADVERTISEMENT

बारामतीत आज शरद पवारांनी लागोपाठ तीन मेळावे घेतले. खरं तर त्यांचे आज नियोजित चार मेळावे होते.. पण अचानक बारामतीतील व्यापाऱ्यांनी त्यांचा नियोजित मेळावा रद्द केला. तशा स्वरूपाचे पत्र शरद पवार यांना दिले. याबाबत वकिलांच्या मेळाव्यात पवारांनी नाराजी देखील व्यक्त केली.

नेमकं काय घडलं?, शरद पवारांना कोणी दिला नकार?

दोन दिवसांपासून शरद पवार बारामतीच्या मैदानात उतरले आहेत. बारामतीत आज शरद पवार यांचे नियोजित चार मेळावे होते. त्यामध्ये होलार समाज मेळावा, बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा, बारामती, दौंड व इंदापूर तालुक्यातील वकिलांचा मेळावा आणि बारामतीतील वैद्यकीय व्यवसायिकांचा मेळावा अशा चार मेळाव्यांपैकी बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा अचानक रद्द करण्यात आला. याबाबत शरद पवारांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Citizenship Amendement Act : CAA चा महाराष्ट्रात काय परिणाम होणार?

शरद पवार म्हणाले, 'गेल्या पन्नास वर्षात असं कधी घडलं नव्हतं. मला माहीत नाही, बारामतीतील व्यापाऱ्यांना कशाची चिंता वाटते, मात्र बारामतीतील व्यापाऱ्यांचे प्रश्न मी सोडवतो. आज व्यापाऱ्यांबरोबर चर्चा होती. मात्र, अचानक मला व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्यात आल्याचे पत्र मिळाले.' 

'गेल्या पन्नास वर्षात मला कधी असे कळवले नव्हते, परंतु बारामतीतील व्यापाऱ्यांनी मला मीटिंग घेणे शक्य नाही असे कळवले. त्यांना बहुदा कोणती तरी चिंता वाटत असावी कारण कार्यक्रम घेण्यापेक्षा तो न घेतलेला बरा असे त्यांना वाटले.. त्यांनी समोरच्याचे ऐकूनही घ्यायचे नाही असे ठरवले, त्याची मला खंत वाटते.' असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> PM मोदींविरोधात वाराणसीतून 1000 उमेदवार भरणार फॉर्म!

शरद पवार यांच्या या विधानानंतर बारामतीत नेमका कोणाचा व्यापऱ्यांवर दबाव आहे याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT