14 वर्षांचा वनवास अन् रामसेतू, ‘आदिपुरुष’चा ट्रेलर पाहिलात का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

adipurush trailer release prabhas kriti sanon saif ali khan
adipurush trailer release prabhas kriti sanon saif ali khan
social share
google news

Adipurush Trailer Launch : बाहूबली फेम अभिनेता प्रभासचा (Prabhas) बहुप्रतिक्षित सिनेमा आदिपुरुषचा (Adipurush) ट्रेलर रीलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये 14 वर्षाचा वनवास, रामसेतू आणि रावणाचा कपटीपणा दाखवला आहे. हा ट्रेलर रीलीज होताच त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. हा ट्रेलर पाहताच फॅन्स जय श्री रामचे नारे देतायत. या सिनेमाचा ट्रेलर इतका भन्नाट आहे की, प्रेक्षक सिनेमा पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. या सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा आहे.( adipurush trailer release prabhas kriti sanon saif ali khan bring the ramayana to life)

ADVERTISEMENT

ट्रेलरमध्ये काय?

ट्रेलरची सुरूवात रामचरीत मानसच्या चौपाईने सुरु होते. हनुमान गुहेत तपश्चर्या करताना दाखवला आहे आणि प्रभु श्रीरामाची कथा सांगत आहेत. या सिनेमात रघुनंदन यांची गाथा सांगण्यात आली आहे. जे मानव ते देव बनले. त्यांचे जीवन मर्यादेचा उत्साह आहे. या ट्रेलरमध्ये सीता आणि हरणाची झलकही दाखवण्यात आलीय.यासोबत राम-सीतेचे प्रेम आणि वनवासही दाखवला आहे. राम लंकेत जाऊन सीतेला परत आणण्याची कहानी देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरच्या शेवटी रावणाची एक झलक दाखवली आहे, विशेष म्हणजे टीझर प्रदर्शित झाल्यानंतर रावणाच्या लुकवरूनही ट्रोल व्हावे लागले होते.त्यामुळे मेकर्सने रावणाचा लुक सिक्रेट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा : आमिर खान मायानगरीला कंटाळला? चित्रपट सोडून नेपाळ गाठत विपश्यना केंद्रात दाखल

आदिपुरूप (Adipurush) ही एक पॅन इंडिया फिल्म आहे. हा सिनेमा हिंदी ऐवजी अनेक भाषेत रीलीज होणार आहे. या सिनेमात वत्सल सेठ देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारणार आहे. तसेच पहिल्यांदाच प्रभास आणि कृती मोठ्या पडद्यावर जोडी बनले आहेत. ही फ्रेश जोडी फॅन्सना आवडली आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल अशी आशा व्यक्त होतेय.

हे वाचलं का?

राम कथेवर आधारीत असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या सिनेमात प्रभास भगवान रामाची आणि कृती सेनेन सीतेची, सनी सिंह लक्ष्मणची, मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाची आणि सैफ अली खान रावणची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 16 जून रोजी रीलीज होणार आहे.

हे ही वाचा : The kerala story बॉक्स ऑफिसवर सुसाट! दोनच दिवसांत कोट्यवधींची कमाई

दरम्यान गेल्य़ा वर्षी दसऱ्याच्या मुहू्र्तावर या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.पण या चित्रपटाचा टीझर पाहून त्याच्यावर टीका करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT