अमिताभ बच्चन यांचा ‘ती’ जाहिरात करण्यास नकार; घेतलेले पैसेही करणार परत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ट्रोल होत आहेत, अखेर त्यांनी जाहिरात सोडली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही माहिती समोर आली. कमला पान मसालाच्या जाहिरातीतून बिग बींनी माघार घेतली असून, जाहिरातीसाठी घेतलेली आगावू पैसेही ते परत करणार आहेत.

ADVERTISEMENT

अमिताभ बच्चन कमला पान मसालाच्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. पान मसाल्याची जाहिरात करत असल्याच्या मुद्द्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तर काहींनी आक्षेप घेत टीकाही केली. मात्र, त्यावेळी बच्चन यांनी व्यावसायिक कारण दिलं होतं.

पान मसालाच्या जाहिरातीमुळे लोक सातत्याने टीका आणि ट्रोल करत असतानाच आता अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीतून माघार घेतली आहे. अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीतून आपलं नाव मागे घेतलं आहे. त्याचबरोबर कंपनीने जाहिरातीसाठी दिलेली आगावू रक्कमही बिग बी कंपनीला परत करणार आहेत.

हे वाचलं का?

सर्वसामान्य लोकांबरोबरच राष्ट्रीय तंबाखू विरोधी संघटनेनंही अमिताभ बच्चन यांना पान मसाल्याची जाहिरात न करण्याचं आवाहन केलं होतं. नव्या पिढीला पान मसाला सेवनासाठी प्रोत्साहन मिळू नये म्हणून जाहिरातीतून माघार घेत असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या एका चाहत्याने पान मसाल्याच्या जाहिरातीवरून प्रश्न केला होता. त्यावेळी त्याला उत्तर देताना बच्चन म्हणाले होते की, ‘जर कुठल्या संस्थेला फायदा होत असेल, तर आपण असा विचार करता कामा नये की आपण हे काय करत आहोत. जशी आमची इंडस्ट्री चालते, तशीच त्यांचीही इंडस्ट्री चालते. तुम्हाला असं वाटतं की मी हे करु नये, पण मला यासाठी फी दिली जाते’, असं बिग बी म्हणाले होते.

ADVERTISEMENT

कमला पसंदची जाहिरात सगळी प्रदर्शित झाल्यानंतर कंपनीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत अधिकृत करार केला होता. हा करार अमिताभ बच्चन यांनी मागील आठवड्यात संपवला. ज्यावेळी हा करार केला त्यावेळी ही जाहिरात (सरोगेट जाहिरात एका उत्पादनाचा ब्रॅंड वापरून दुसऱ्या उत्पादनाची जाहिरात करणे.) प्रकारात येते याची त्यांना कल्पना नव्हती, असं आता स्पष्ट करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT