ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांनी गुपचूप आटोपला साखरपुडा? नव्या फोटोमुळे चर्चांना उधाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. गुरूवारी रात्री उशिरा तिचं आणि ललित मोदी यांचं लग्न झाल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर ललित मोदी यांनी स्पष्टीकरण देत आम्ही लग्न केलेलं नाही तर एकमेकांना डेट करत आहोत असं म्हटलं आहे. अशात आता ललित मोदी आणि सुश्मिता सेन या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला असावा अशाही बातम्या समोर येत आहेत. सुश्मिता आणि ललित मोदी यांचा एक फोटो समोर आला आहे यामध्ये सुश्मिता हातातली रिंग दाखवते आहे. ही रिंग म्हणजे त्यांच्या साखरपुड्याचीच आहे अशी चर्चा आता रंगली आहे.

ADVERTISEMENT

सुश्मिता (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi) यांचा साखरपुडा झाला?

IPL चे माजी चेअरमन ललित मोदी यांचं सोशल मीडिया अकाऊंट सुश्मितासोबतच्या फोटोंनी खचाखच भरलं आहे. अशात ललित मोदी यांनी त्यांच्या ट्विटर एक डीपी ठेवला आहे. ज्यामध्येही सुश्मिता त्यांच्यासोबत आहे. सगळीकडे गुरूवारपासून ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांची चर्चा होते आहे. फोटो समोर आल्यानंतर अनेकांना हे वाटलं होतं की या दोघांनी लग्न केलं. मात्र तसं झालेलं नाही हे ललित मोदी यांनीच स्पष्ट केलं.

अभिनेत्री सुश्मिता सेनचा चाहत्यांना धक्का! ललित मोदींसोबत थाटणार संसार

हे वाचलं का?

या सगळ्या बातम्या येत असतानाच आता ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांचा एक फोटो समोर आला आहे या फोटोत सुश्मिता सेन अंगठी दाखवत आहे. ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये सुश्मिता आहे ती आपल्या बोटात असलेली अंगठी दाखवते आहे. त्यामुळे आता हा अंदाज लावला जातो आहे की या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे की जी अंगठी सुश्मिताच्या हातात दिसते आहे तशी साखरपुडा झाल्यावरच घातली जाते. अर्थात याबाबत नक्की माहिती सुश्मिता सेन किंवा ललित मोदीच देऊ शकतात.

ADVERTISEMENT

ललित मोदी आणि सुश्मिता यांचं प्रेमप्रकरण आता जगासमोर आलं आहे. त्यानंतर लवकरच ते लग्न करू शकतात अशीही शक्यता आहे. तो दिवस नेमका कोणता असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर जेव्हापासून ही बातमी पसरली आहे तेव्हापासून या दोघांचे मीमही तयार होत आहेत. या सगळ्यात आता असं कळतंय की या दोघांनी गुपचूप साखरपुडा आटोपला.

ADVERTISEMENT

सुश्मिताचे या सेलिब्रिटींसोबत होते अफेअर

विक्रम भट्ट : मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुश्मिताचे नाव सर्वप्रथम चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांच्याशी जोडले गेले. दस्तक (1996) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुश्मिता आणि विक्रम जवळ आले होते. काही काळ रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

रणदीप हुड्डा : रणदीप हुड्डा सुश्मितासोबतच्या अफेअरमुळेही एकेकाळी चर्चेत होता. कर्मा, कन्फेशन आणि होली या चित्रपटात एकत्र काम करताना दोघे जवळ आले.

वसीम अक्रम : 2013 मध्ये सुश्मिताचे माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत अफेअर असल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात होते, मात्र सुश्मिताने हे वृत्त फेटाळून लावले होते.

हृतिक भसीन: 2015 च्या आसपास, सुश्मिता मुंबईतील रेस्टॉरंट मालक हृतिक भसीनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते.

मुदस्सर अझीझ: दिग्दर्शक मुदस्सर अझीझ हे देखील अशा लोकांपैकी एक होते ज्यांचे सुश्मिताशी अफेअर होते. सुष्मिताने दिग्दर्शक म्हणून मुदस्सरचा पहिला चित्रपट ‘दुल्हा मिल गया’मध्येही काम केले होते, जो फ्लॉप ठरला होता..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT