Mahadev Betting App Case :अभिनेता रणबीर कपूरला ईडीची नोटीस; टायगर श्रॉफ, सनी लिओनीही ‘रडार’वर
महादेव गेमिंग-बेटिंग हे ऑनलाइन सट्टेबाजीचा प्लॅटफॉर्म प्रकरणाचा ईडी तपास करत आहे. याच प्रकरणात ईडीने अभिनेता रणबीर कपूरला समन्स बजावले आहे. ६ ऑक्टोबरला ईडी रणबीर कपूरची चौकशी करणार आहे.
ADVERTISEMENT
Mahadev online betting scam : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर मोठ्या अडचणीत अडकण्याची शक्यता आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रणबीर कपूरला समन्स बजावले आहे. अलिकडेच समोर आलेल्या ‘महादेव गेमिंग-बेटिंग प्रकरणात’ रणबीर कपूरचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणाची चौकशी ईडीने सुरू केली असून, रणबीर कपूरला 6 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
Mahadev online betting case : रणबीरसह इतर सेलिब्रिटींचीही आहेत नावे
या प्रकरणात केवळ रणबीर कपूरचे नाव नाही, तर ही यादी मोठी आहे. या यादीत आणखी 15-20 सेलिब्रिटी आहेत, जे ईडीच्या रडारवर आहेत. आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेगा कक्कर, भारती सिंग, एली अवराम, सनी लिओन, भाग्यश्री, पुलकित सम्राट, कीर्ती खरबंदा, नुसरत भरुचा आणि कृष्णा अभिषेक यांची नावे या यादीत आहेत.
काय प्रकरण आहे?
या प्रकरणाबद्दल सांगायचं म्हणजे ‘महादेव गेमिंग-बेटिंग’ हे ऑनलाइन सट्टेबाजीचा प्लॅटफॉर्म आहे. या अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांचा फेब्रुवारी महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये विवाह झाला होता. या लग्नावर 200 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला होता. या आलिशान लग्नाचा व्हिडिओ भारतीय तपास एजन्सींच्या हाती लागला. या लग्नात परफॉर्म करण्यासाठी ज्या सेलिब्रिटींना बोलवण्यात आले होते, ते सगळे ईडीच्या रडारवर आले आहेत.
हे वाचलं का?
हेही वाचा >> “शरद पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावायला सांगितलं”, देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब
काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबई, भोपाळ आणि कोलकाता येथील हवाला ऑपरेटर्सवर छापे टाकले होते, ज्यांनी या कार्यक्रमासाठी पैसे मुंबईच्या इव्हेंट फर्मला पाठवले होते. गायिका नेहा कक्कर, सुखविंदर सिंग, अभिनेत्री भारती सिंग आणि भाग्यश्री यांना येथून परफॉर्म करण्यासाठी पैसे दिले गेले होते.
तपासादरम्यान, ईडीला असे आढळून आले की महादेव बुक अॅप आणि सट्टेबाजीचे हे प्रकरण छत्तीसगडमधील काही राजकारणी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित आहे. या बेटिंग अॅपची उलाढाल सुमारे 20,000 कोटी रुपये आहे.
हेही वाचा >> Nobel Prize च्या जन्माची गोष्ट, कशी झाली सुरूवात; कोण होते अल्फ्रेड नोबेल?
ईडी महादेव ऑनलाइन गेमिंग-बेटिंग अॅपची सखोल चौकशी करत आहे. अलीकडेच ईडीच्या पथकाने कोलकाता, भोपाळ, मुंबई आदी शहरांना भेटी देऊन तपास केला. यामध्ये त्याला असे आढळून आले की महादेव अॅपशी जोडलेले अनेक लोक मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कशी संबंधित आहेत. ईडीकडे अनेक पुरावेही मिळाले आहेत. त्यांनी 417 कोटी रुपयांचे गुन्ह्यांचे उत्पन्न गोठवले आहे आणि जप्त केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT