Big Boss Marathi 5: 'माज, माज...' जान्हवीचं वागणं खटकलं, अभिनेत्रीचा पारा चढला अन्...
Big Boss Marathi : जान्हवी किल्लेकरची जीभ आता पुन्हा एकदा घसरली. वर्षा उसगांवकरांनंतर तिने पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केला. आता अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी पॅडीची बाजू घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जान्हवी किल्लेकरची पुन्हा एकदा जीभ घसरली.
वर्षा उसगांवकरांनंतर पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून केला अपमान
सुरेखा कुडचींची संतप्त प्रतिक्रिया
Bigg Boss Marathi Season 5 : Janhavi Killekar : 'बिग बॉस मराठी' सीझन 5 ची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. या घरातील वाद आणि त्यावरून होणारे राडे काही नवीन नाही आहेत. पण सध्या ज्या प्रकारे एखाद्याच्या करिअरवरून टीका-टिप्पण्या होत आहेत ते अगदी भयंकर आहे. दुसऱ्यांची उणी-धुणी काढण्यात सध्या जान्हवी किल्लेकरचं नाव आघाडीवर आहे. तिने कालच्या (मंगळवारी 20 ऑगस्ट) एपिसोडमध्ये पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडीचा त्याच्या अभिनयावरून अपमान केला. त्याचे पडसाद आता वाईट उमटत आहे. दिग्गज कलाकार तिच्या या वक्तव्यावर नाराज झाले आहेत आणि काहींनी तर तिला परखड शब्दात सुनावलं आहे. (bigg boss marathi season 5 janhvi killekar insulted pandharinath kamble on his career actress surekha kudachi shared her angry reaction by the post )
ADVERTISEMENT
मंगळवारच्या एपिसोडध्ये ‘सत्याचा पंचनामा’ टास्क खेळताना निक्की-अरबाज, निक्की-वैभव, घनश्याम तसंच अभिजीत-अंकिता असे प्रत्येकात वाद झालेले पाहायला मिळाले. यावेळी पुन्हा एकदा जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली. वर्षा उसगांवकरांनंतर तिने पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केला.
हेही वाचा : Badlapur News: आता वामन म्हात्रे म्हणतात, 'त्यांना बदलापूरमध्ये दंगल घडवायची होती'
आता अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी पॅडीची बाजू घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "कोण आहे ती जी बी टीमला भीक आणून देईन म्हणते... कोण आहे ती जी त्या डीपीला गेट उघडू का विचारते... कोण आहे ती जी वर्षाताईला म्हणते की तुम्ही चुकलात की तुम्हाला मी पंढरीनाथला आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करून आता इथे ओव्हरअॅक्टिंग करायला आलाय म्हणते आहे कोण ती... काय कर्तृत्व आहे तिचं... कसला माज आहे हा... बिगबॉसचा आशीर्वाद आहे का हिला... रितेश भाऊ जरा आवाज वाढवा... आज मी मनापासून मांजरेकर सरांना करते..."
हे वाचलं का?
"ते असते तर त्यांचे शब्दच असे असतात की कुणाची हिंमत नाही होणार परत कुणाला असं बोलायची... शब्द ऐकूनच चड्डी ओली झाली असती... वारे वाह अशा लोकांना पाठिंबा दिला जातोय त्यांना काहीच बोललं जात नाही... या शनिवारी पहायचं आहे यावर काही बोललं जातंय की पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे बोललं जातंय..." अशा परखड शब्दात अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी जान्हवी किल्लेकरविरूद्ध पोस्ट शेअर केली आहे.
जान्हवी नेमकं काय म्हणाली होती?
जान्हवी म्हणाली होती, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात दम नाहीये समोर येऊन बोलायला. पॅडी दादाच्या तर अंगातच घुसलंय. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले. आता ती ओव्हर अॅक्टिंग घरात दाखवत आहेत.” जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा केलेला हा अपमान ऐकून आर्या तिला जाब विचारायला गेली. तेव्हा जान्हवी म्हणाली, “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही.” जान्हवीच्या याच वागण्यावरून सुरेखा कुडची भडकल्या. “माज उतरावा त्यांचा…खूप झालं आता…”, असं कॅप्शन सुरेखा यांनी त्यांच्या पोस्टला दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT