Karan Johar निर्मात्यांवर संतापला, काय आहे ‘मेरी ख्रिसमस’शी कनेक्शन?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Why Karan Johar lashed out at the makers of Merry Christmas as soon as the release date announced
Why Karan Johar lashed out at the makers of Merry Christmas as soon as the release date announced
social share
google news

Merry Christmas Movie Release Date : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती यांचा नवीन चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘बदलापूर’ आणि ‘अंधाधुन’ यांसारखे चित्रपट बनवणाऱ्या श्रीराम राघवन यांचा हा चित्रपट 15 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासर्वात ‘मेरी ख्रिसमस’च्या (Merry Christmas) प्रदर्शनाची तारीख समजताच करण जोहर चित्रपटाच्या निर्मात्यांवर भडकला आहे. (Why Karan Johar lashed out at the makers of Merry Christmas as soon as the release date announced)

ADVERTISEMENT

करण जोहरने थ्रेड्सवर पोस्ट करत लिहिलं, ‘फोन करून बोलण्याची तसदी न घेता एकाच तारखेला चित्रपट क्लॅश करणं हा स्टुडिओ आणि निर्मात्यांसाठी पुढे जाण्याचा योग्य मार्ग नाही. सिनेमागृहांच्या या कठीण आणि आव्हानात्मक काळातही आपण एकत्र उभे राहिलो नाही तर आपल्यातील बंधुत्व व्यर्थ आहे.’

वाचा : Opposition unity : UPA होणार नामशेष! भाजपविरोधात काय आहे रणनीती?

करण जोहरच्या संतापाचं कारण काय?

करण जोहर भडकला कारण त्याच तारखेला त्याच्याद्वारे निर्मित असलेला ‘योद्धा’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘योद्धा’ एक अॅक्शन चित्रपट आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटनी आणि राशी खन्ना यांसारखे कलाकार काम करत आहेत. यापूर्वी हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. त्यानंतर ही तारीख पुढे ढकलून 15 सप्टेंबरवर नेण्यात आली आणि 15 दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख तिसऱ्यांदा बदलण्यात आली. आता ‘योद्धा’ 15 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे वाचलं का?

अलीकडेच ‘जवान’ आणि ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलण्यात आल्या. ‘जवान’चे 2 जूनला प्रदर्शन होणार होते. पण आता तो 7 सप्टेंबरला प्रदर्शित होईल. तर ‘अ‍ॅनिमल’ 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता तो 1 डिसेंबरला प्रदर्शित होईल. या दोन चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण इंडस्ट्रीला त्यांचे वेळापत्रक रीसेट करावे लागले. त्यामुळेच गेल्या महिनाभरात जवळपास सर्वच मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलल्या आहेत.

वाचा : Lok Sabha 2024 : भाजपचं ‘खेला होबे’! शिंदे, पवारांनंतर आणखी तीन नेते ‘एनडीए’त

करण जोहरला त्याचा ‘योद्धा’ हा चित्रपट शाहरुखच्या ‘जवान’च्या एका आठवड्यानंतर प्रदर्शित करायचा नव्हता. त्यामुळेच त्याने ‘अ‍ॅनिमल’च्या नव्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहिली. संदीप रेड्डी वंगा यांनी सांगितले की, ‘अ‍ॅनिमल’ 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यानंतरच करणने 15 डिसेंबर ही तारीख ‘योद्धा’च्या प्रदर्शनासाठी निश्चित केली होती.

ADVERTISEMENT

आता मेरी ख्रिसमसच्या निर्मात्यांनी त्याच तारखेला त्यांच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. यामुळे हे दोन चित्रपट एकमेकांना टक्कर देतील किंवा त्यांना त्यांच्या तारखा बदलाव्या लागतील. जे खूप कठीण आहे. कारण या वर्षाच्या सर्व तारखा बुक झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

वाचा : Maharashtra assembly session : राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेत कुठे बसले?

‘मेरी ख्रिसमस’ स्टारकास्टमध्ये कतरिनासोबत आणखी कोणते कलाकार दिसणार?

‘मेरी ख्रिसमस’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे. रमेश तौरानी यांच्या टिप्स फिल्म्सने याची निर्मिती केली आहे. वेगवेगळ्या सहाय्यक स्टारकास्टसह चित्रपट दोन भाषांमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये कतरिना आणि विजय सेतुपतीसोबत संजय कपूर, विनय पाठक, टिन्नू आनंद आणि प्रतिमा कन्नन हे कलाकार दिसणार आहेत. ‘मेरी ख्रिसमस’च्या तामिळ व्हर्जनमध्ये कतरिना आणि विजयसोबत राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जयबाबू आणि राजेश विल्यम्स दिसणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT