पाच जणांसोबत डेटिंग? बॉलिवूडच्या Orry ने कहरच केला; कॉफी विथ करणमध्ये इंटरेस्टिंग खुलासे

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Orry Dating with five people Interesting revelation in Koffee with Karan season 8
Orry Dating with five people Interesting revelation in Koffee with Karan season 8
social share
google news

Koffee with Karan : कॉफी विथ करण (Koffee with Karan) हा सर्वात लोकप्रिय चॅट शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. करण जोहरचा हा शो गॉसिप्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे गेल्या सीझनप्रमाणे या सीझनचाही शेवट सोशल मीडिया इन्फ्लुएनसरसोबत होणार आहे. यावेळी शोमध्ये बॉलिवूडचा (Bollywood) आवडता ओरी (Orry) म्हणजेच ओरहान अवत्रमणी सामील होणार आहे. याचे काही प्रोमो व्हायरल होत आहेत. (Orry Dating with five people Interesting revelation in Koffee with Karan season 8)

ADVERTISEMENT

सोशल मीडिया इन्फ्लुएनसर्सनी करणचा शो केला हायजॅक

कॉफी विथ करणच्या सीझन 8 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये अभिनेता-कॉमेडियन कुशा कपिला, सुमुखी सुरेश, दानिश सैत, तन्मय भट्ट आणि ओरहान अवत्रामणी दिसणार आहेत. सगळे मिळून करणला खूप चिडवणार आहेत. त्याचा प्रोमो रिलीज झाला, ज्यात करणवर प्रश्नांचा भडीमार होताना दिसला. यावेळी ओरीने स्वत:बद्दल अनेक खुलासे करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत.

वाचा : Ram Mandir: ‘वाल्मिकींचा राम खरा कसा म्हणायचा?’, भालचंद्र नेमाडेंचा रामायणावरच अविश्वास

प्रोमो शेअर करताना करणने लिहिले, ‘हा सीझन बर्‍याच गोष्टींनी भरलेला होता, ज्यामध्ये फायर गॉसिप देखील होते. आता मी या सीझनचा शेवट आमच्या खास ज्युरींसोबत करत आहे, जे त्यांचे मत मांडण्यापूर्वी काहीही विचार करत नाहीत. ते या कॉफीमध्ये अधिक गरमपणाची चव जोडतील.’

हे वाचलं का?

ओरीने शेअर केले स्वत:बद्दलचे सिक्रेट्स

ओरीने सांगितले की, लोक त्याच्यावर मीम्स बनवत असले तरी त्याचा त्याला काही फरक पडत नाही. ते मीम्स बनवत आहेत, मी पैसे कमवत आहे. यासोबतच करणने तिला विचारले की तो सिंगल आहे का? आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सांगत ओरीने सांगितले की, तो पाच लोकांना डेट करत आहे. हे ऐकून करणलाही धक्का बसला.

ओरी म्हणाला, ‘मी चीटर आहे. मी पाच जणांना डेट करत आहे. ओरी चीटर आहे आणि ओरी लिव्हर आहे.’

ADVERTISEMENT

वाचा : Maharashtra Politics : बाळासाहेबांनी रात्रीत डाव फिरवला अन् देवरा…; शिवसेनेचा ‘तो’ किस्सा

करणवर लागले नेपोटिझमचे आरोप

यासोबतच इतरांनी करणची खिल्ली उडवली आणि म्हटले की, ‘हा सीझन इतका फॅमिली फ्रेंडली का होता? इथे फिल्टर असते तर त्याला फिल्टर कॉफी विथ करण म्हटले असते.’ यावर करण म्हणाला की, ‘हे वेदनादायक होते.’

ADVERTISEMENT

तर दानिश आणि कुशाने विचारले, ‘याहून दुःखदायक काय आहे, तुम्हाला सर्व स्टार किड्स लाँच करण्याची संधी मिळाली नाही कारण झोया अख्तरने आर्चीजमध्ये ते केले होते. हे कसं वाटतंय, हर्ट झालं का? करणवरने यावर ‘हो’ असे स्पष्ट उत्तर दिले.

वाचा : ‘मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत…’, राऊतांवर टीका करताना देवेंद्र फडणवीसांची जीभ घसरली!

प्रत्येकाच्या अशा तिखट प्रश्नांनी करण देखील आश्चर्यचकित आणि त्रस्त झाला आणि विचारले की मी माझ्या शोमधून एक्झिट घेऊ शकतो का? तुम्ही लोक हा शो पुढे नेणार का? या एपिसोडसाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. अनेक यूजर्सना ओरीबद्दलचे सिक्रेट जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT