Ponniyin Selvan – 2 : पहिल्याच दिवशी चांगली कमाई, हिंदीतही जमवला मोठा गल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Poniyin Selvan' by Mani Ratnam, one of the best directors in the film industry, got a strong opening
Poniyin Selvan' by Mani Ratnam, one of the best directors in the film industry, got a strong opening
social share
google news

चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये गणल्या जाणार्‍या मणिरत्नम यांच्या ‘पोनियिन सेल्वन’ या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टला शुक्रवारी (28 एप्रिल) दमदार ओपनिंग मिळाली. या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती आणि जयम रवी यांच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. ‘पोनियिन सेल्वन 2′ (PS 2) हा ऐश्वर्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणूनही ओळखला जात आहे. (Poniyin Selvan’ by Mani Ratnam, one of the best directors in the film industry, got a strong opening)

ADVERTISEMENT

‘पोनियिन सेल्वन’ चा पहिला पार्ट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. चोल साम्राज्यावर बनलेल्या या चित्रपटातील सिन्सची आणि कलाकारांच्या कामाची प्रचंड चर्चा झाली होती. पहिल्या पार्टने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती, त्यामुळे दुसऱ्या पार्टच्या प्रदर्शनानंतरही बॉक्स ऑफिसकडे लक्ष लागले होते. त्यानंतर आता पहिल्याच दिवशी ‘पोनियिन सेल्वन 2’ लाही दमदार ओपनिंग मिळाली आहे.

बॉक्स ऑफिसवर राज करण्यासाठी परतले चोल साम्राज्य :

यापूर्वी 1 सप्टेंबर 2022 रोजी ‘पोनियिन सेल्वन’ रिलीज झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने विक्रमी कमाई केली होती. जगभरातील चित्रपटाचे लाइफटाईम ग्रॉस कलेक्शन जवळपास 500 कोटींवर पोहोचले होते. रिपोर्ट्सनुसार, आता ‘पोनियिन सेल्वन 2’ चे भारतातील पहिल्याच दिवशीचे कलेक्शन 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. तर जगभरातील कलेक्शन 45 कोटींच्या जवळपास आहे. ‘पोनियिन सेल्वन 2’ ला रिव्ह्यूही उत्तम मिळाले आहेत. जोडीला प्रेक्षकांकडूनही चांगली दाद मिळत आहे. त्यामुळे ‘पोनियिन सेल्वन 2’ साठी येणारे दिवस चांगली कमाई घेऊन येणारे ठरण्याची चिन्ह आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : VIDEO: …अन् पुण्यात बावऱ्या बैलापुढे थिरकली गौतमी पाटील!

तमिळनाडूमध्ये हा चित्रपट या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. तमिळनाडूमध्ये शनिवार आणि रविवारसाठी ‘पोन्नियिन सेल्वन 2’ ची आगाऊ बुकिंग मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे पहिल्या वीकेंडमध्येच भारतीय बॉक्स ऑफिसवर जवळपास 80 कोटी रुपये कमावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : जिया खान आत्महत्या प्रकरण: विशेष CBI कोर्टाने दिला मोठा निकाल; सूरज पांचोलीची…

हिंदीतही चांगली कमाई :

‘पोनीयिन सेल्वन’ हिंदीत हिट ठरला होता. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला पहिल्या दिवशी 1.8 कोटींची ओपनिंग मिळाली होती. आता ‘पोनियिन सेल्वन 2’साठीही हिंदी चांगली ओपनिंग मिळाली आहे. शुक्रवारी चित्रपटाने हिंदीत 1.7 कोटींची कमाई केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT