शाहरूख खानने खरेदी केली ‘इतकी’ महागडी कार, किंमत एकूण बसेल धक्का
बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरूख खानने देशातली सर्वांत महागडी कार खरेदी केली आहे. शाहरूख खानने रॉल्स रॉयस (rolls royce) कलिनन ब्लॅक बेंज ही कार खरेदी केली आहे.
ADVERTISEMENT
Shah rukh khan buyx rolls royce car : बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरूख खानने (Shah rukh khan) देशातली सर्वांत महागडी कार खरेदी केली आहे. पठाणच्या (pathaan) यशाची चर्चा सुरु असताना आता त्याच्या महागड्या कारने सर्वांचे लक्ष वेधले आहे. शाहरूख खानने रॉल्स रॉयस (rolls royce) कलिनन ब्लॅक बेंज ही कार खरेदी केली आहे. या कारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान ही कार खरेदी केल्यानंतर फॅन्स त्याला शुभेच्छा देतायत.(shah rukh khan buys rolls royce car splurges 10 crore rupees pathaan movie)
ADVERTISEMENT
शाहरूख खानच्या (Shah rukh khan) पठाण (pathaan) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. ब़ॉक्स ऑफिसवरील अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले होते. तसेच ज्या बॉलिवूड सिनेमांना बॉयकॉट केले जात होते, त्यात पठाणने बाजी मारली होती. कोरोनानंतर घरी बसलेल्या प्रेक्षकांना पठाणने थिएटरमध्ये आणले होते. त्यामुळे पठाणने खुप मोठे यश मिळवलं होते. या यशानंतर शाहरूख खानने स्वत:लाच मोठं गिफ्ट दिलं आहे. शाहरूख खानने रॉल्स रॉय कार खरेदी केली आहे.
हे ही वाचा : आकांक्षानंतर आणखीण एका अभिनेत्रीची आत्महत्या,गूढ अवस्थेत सापडला मृतदेह
आलिशान कारची किंमत काय?
मीडिया रिपोर्टनुसार, शाहरूख खानने (Shah rukh khan) खरेदी केलेली कार ही भारतात विकली जाणारी सर्वांत महागडी एसयुवी कार आहे. या कारची शोरूमची किंमत 8.20 करोड रूपये आहे. तर या कारची एकूण किंमत 10 करोड रूपये आहे. या कारची नंब प्लेटही खुपच युनिक आहे. या नंबर प्लेटवर 555 हा व्हिआयपी नंबर आहे.
हे वाचलं का?
शाहरूख खानच्या (Shah rukh khan) या आलिशान कारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्याची सफेद कलरची रॉल्स रॉय कार मन्नतमध्ये शिरताना दिसत आहे.शाहरूखच्या फॅन क्लबच्या अकाऊंटवरू हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.या व्हिडिओवर आता शाहरूखचे फॅन्सचे अभिनंदन करतायत.
हे ही वाचा : Bollywood : आलिया, प्रियांका, कतरिनाच्या चित्रपटात शाहरुख खान, कोणत्या भूमिकेत दिसणार?
शाहरूख खानच्या (Shah rukh khan) पठाण सिनमाने बॉक्स ऑफिसवर 1000 हजार करोड हून अधिक रूपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिलीट सिनद्वारे रिलीज झाला होता.मात्र तरीही थिएटर्सना प्रेक्षक वर्ग मिळाला होता. या सिनेमात शाहरूख सोबत दीपिका पदूकोन आणि जॉन अब्राहम झळकले होते. यासोबत डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये अजूनही क्रेझ आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान शाहरूख खानच्या (Shah rukh khan) वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आगामी जवान आणि राजकुमार हिरानीच्या डंकी सिनेमात झळकणार आहे.यासोबत सलमान खानच्या टायगर 3 सिनेमात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT