रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतच्या व्हिडीओमुळे झाली ट्रोल, कारण….

मुंबई तक

ADVERTISEMENT

rhea chakraborty share sushant singh rajput unseen video fans troll Sushant Death Anniversary
rhea chakraborty share sushant singh rajput unseen video fans troll Sushant Death Anniversary
social share
google news

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांचा 14 जून रोजी मृ्त्यू झाला होता. आज त्याच्या मृत्यूला तीन वर्ष उलटले आहेत. या त्याच्या पुण्यतिथी निमित्त फॅन्सनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली आहे. या फॅन्ससोबतच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने (Rhea Chakaraborty)देखील त्याच्या आठवणीत एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हि़ड़िओवरून आता रिया चक्रवर्तीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. व्हिडिओत नेमकं अस काय आहे, ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात येते आहे, ते जाणून घेऊयात. (rhea chakraborty share sushant singh rajput unseen video fans troll)

ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakaraborty) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. त्यात आता सुशांत सिंह राजपूतची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. या व्हिडिओत सुशांत आणि रिया डोंगरावर असल्याचे दिसत आहेत.दोघांनीही डोंगराच्या एका भागावर उभे ऱाहून व्हिडिओ काढला आहे.

हे ही वाचा : Park Soo Ryun: पायऱ्यांवरून पडून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, पण तिचं हृदय कायम..

या व्हिडीओत रिया चक्रवर्ती (Rhea Chakaraborty) आणि सुशांत सिंह राजपूत डोंगराच्या एका भागावर बसले आहेत. या डोंगरावर रियाने सुशांतला घट्ट मिठी मारली आहे. दोघेही या व्हि़डिओत खुपच सुंदर दिसत आहे. आज सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त तिने हा व्हिडिओ शेअर करून त्याची आठवण काढली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला रियाने काहिच लिहले नाही आहे, तर निव्वळ हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे काहीही न लिहताही रिया चक्रवर्ती सुशांतची आठवण काढत असल्याचे स्पष्ट होतेय.

हे वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

नेटकऱ्यांनी केले ट्रोल

दरम्यान रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakaraborty) या व्हिडिओवर आता अनेकांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने यावर कशाला ढोंग करतेस अशी कमेंट केली आहे. तर तुला फोटो टाकण्याचा हक्क नाही, असे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे. एकूणच काय तर या व्हिडिओवरून अनेकांनी रिया चक्रवर्तीला ट्रोल केले आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : रणबीर कपूरने अ‍ॅनिमलसाठी घेतले ”इतके” कोटी, कमाईत अनिल कपूरलाही टाकले मागे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT