Jayant Savarkar passed away : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Veteran actor Jayant Savarkar passed away
Veteran actor Jayant Savarkar passed away
social share
google news

Mumbai : अनेक नाटके, शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं ठाण्यात युनिव्हर्सल रूग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवासांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. मुंबईतील राहत्या घरी आज (24 जुलै 2023) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आधी रंगभूमी आणि नंतर दूरचित्रवाणी आणि कालांतराने चित्रपट या तीनही माध्यमांतून सावरकर घरोघरी पोचले आणि कुटुंबातील सर्वच पिढ्यातील प्रत्येकाच्याच परिचयाचेही बनले. (Veteran actor Jayant Savarkar passed away)

ADVERTISEMENT

जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी, म्हणजे 1955 पासून अभिनयाची कारकीर्द सुरू केली. रंगभूमीवर वावरायचे या एकाच प्रेरणेने त्यांना झपाटले होते. त्यामुळे त्यांनी रंगभूमीवर जशी संधी मिळेल त्याचा लाभ घेण्याचे धोरण ठेवले.

‘रोहित पवारांचं आंदोलन’, अजित पवारांनी टोचले कान, उदय सामंतांची मध्यस्थी यशस्वी

सुरुवातीची बरीच वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. प्रारंभी हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी लहानसहान कामे केली आणि नंतर साहित्य संघाच्या नाट्यशाखेत कार्यरत असताना त्यांनी नाटकांत काम करण्याची मिळालेली संधी सोडली नाही. ‘एकच प्याला’(तळीराम), ‘तुझे आहे तुजपाशी’ (आचार्य), ‘व्यक्ती आणि वल्ली’ (अंतू बर्वा) आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या.

हे वाचलं का?

रंगभूमीवरील कलावंतांसाठी आजही दंतकथा असलेले केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना लाभले. आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम इत्यादींच्या दिग्दर्शनाखालीही जयंत सावरकरांना रंगमंचावर वावरण्याची संधी मिळाली. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी, याही नाटकांमधून जयंत सावरकरांनी छाप पाडली. सहजता हा त्यांच्या अभिनयाचा स्थायीभाव आहे आणि यातूनच त्यांनी आपल्या भूमिका आसपास वावरणाऱ्या माणसांसारख्या ओळखीच्या केल्या.

‘मला म्हणाली जयपूरला जातेय आणि पोहोचली पाकिस्तानात’, अंजूच्या पतीचे मोठे खुलासे

मिळालेल्या माहितीनुसार, जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर ते बरे झाले. मात्र काल (23 जुलै) संध्याकाळी त्यांची तब्येत खालावली. त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं. पण त्यानंतर त्यांचे हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाल्याने डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पण नंतर काही वेळातच त्यांचं निधन झालं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT