Cooking oil and cancer : खाद्य तेलामुळेच वाढतोय कॅन्सरचा धोका? घास घेण्याआधी वाचा धक्कादायक माहिती
अमेरिकेच्या सरकारने केलेल्या अभ्यासात त्यांनी असं म्हटलं आहे की, स्वयंपाकाच्या तेलामुळे कर्करोग होऊ शकतो. विशेषतः तरुणांना याचा धोका जास्त आहे. 'मेडिकल जर्नल गट'ने प्रसिद्ध केलेल्या रिसर्चमध्ये ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
खाद्य तेलामुळे होऊ शकतो कॅन्सर?
अमेरीकेतील संस्थेनं केलेल्या अभ्यासात धक्कादायक माहिती
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाला आपण खाद्यतेल किंवा कुकिंग ऑईल असं म्हणतो. हे तेल वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं आणि स्वयंपाक करण्याच्या पद्धतीनुसार निवडलं जातं. रोजच्या आपल्या 99 टक्के अण्णपदार्थांमध्ये तेल वापरलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का, स्वयंपाकाचं तेल सुद्धा कर्करोगाचं कारण ठरू शकतं. अमेरिकेच्या सरकारने केलेल्या अभ्यासात त्यांनी असं म्हटलं आहे की, स्वयंपाकाच्या तेलामुळे कर्करोग होऊ शकतो. विशेषतः तरुणांना याचा धोका जास्त आहे. 'मेडिकल जर्नल गट'ने प्रसिद्ध केलेल्या रिसर्चमध्ये ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. सूर्यफूल, द्राक्षातील बियाणं, कॅनोला आणि मक्केच्या बियाण्यांच्या तेलाचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं कर्करोगाचा धोका वाढू शकतो असं या अभ्यासात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
संशोधनात काय समोर आले?
कोलन कॅन्सरने ग्रस्त असलेल्या 80 रुग्णांवर संशोधन केलं असता, असं दिसून आलं की, त्यांच्यामध्ये बायोएक्टिव्ह लिपिड्सचे प्रमाण जास्त होतं. बायोएक्टिव्ह लिपिड्स हे बियाणांच्या तेलाचं विघटन केल्यानंतर तयार होतं. या संशोधनात, 30 ते 85 वर्ष वयोगटातील लोकांचे 81 ट्यूमरचे नमुने तपासण्यात आले. त्यांच्या कर्करोगाच्या ट्यूमरमध्ये लिपिडचं प्रमाण अधिक असण्याचं कारण बियांचं तेलच असल्याचं म्हटलं जातंय.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Dindigul Hospital Fire : खासगी रुग्णालयाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू, तर 20 पेक्षा जास्त रुग्णांना..
19 व्या शतकाच्या दशकाच्या सुरुवातीला मेणबत्ती निर्माण करणाऱ्या विल्यम प्रॉक्टरने साबणामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या चरबीला स्वस्त पर्याय म्हणून बियाण्यांपासून तेल बनवलं. त्यानंतर ते तेच तेल अमेरिकन लोकांच्या आहाराचा मुख्य भाग बनला.
बियांचं तेल आणि कर्करोग यांच्यातील संबंध काय?
यापूर्वी झालेल्या एका संशोधनात बियांच्या तेलाचे आरोग्यावर हानिकारक परिणाम होत असल्याचं समोर आलं होतं. या बियाणांच्या तेलामुळे शरीराच्या सूज येऊ शकते. तथापि, बियाण्यांचे तेल तुटलेले बायोएक्टिव्ह लिपिड कोलन कर्करोग जलद वाढण्यास मदत करू शकतात आणि शरीराला ट्यूमरशी लढण्यापासून रोखू शकतात. बियांच्या तेलामध्ये ओमेगा -6 आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. संशोधनानुसार, बियांच्या तेलाच्या जास्त वापरामुळे होणारी जळजळ कर्करोगाच्या विकासास प्रोत्साहन देऊ शकते. मात्र, यावर संशोधन सुरू आहे.
ADVERTISEMENT
स्वयंपाकासाठी तेल कसे निवडावं?
हे ही वाचा >> Car Accident : फिरायला जाताना लघवीसाठी गाडी थांबवली, कारमधून उतरलेला तरूण थेट 1000 फूट खोल...भयानक घटना
आरोग्य : जर तुम्ही निरोगी आहार घेत असाल तर ऑलिव्ह ऑईल किंवा सूर्यफूल तेल यासारखे हलके तेल निवडणे चांगले ठरेल.
स्वयंपाक करण्याची पद्धत : शेंगदाणा किंवा सोयाबीन तेल तळण्यासाठी चांगलं आहे. तर ऑलिव्ह तेल हे सॅलड आणि हलके अन्न बनवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
ADVERTISEMENT
चव आणि सुगंध : जर तुम्हाला विशेष चव हवी असेल तर तुम्ही तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल वापरू शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT