Home Gardening Tips: घरात गार्डनिंग करताय? 'या' गोष्टी लक्षातच ठेवा; झाडं कायम राहतील हिरवीगार
Best Gardening Tips : देशात आजच्या घडीला होम गार्डनिंगची कॉन्सेप्ट खूप लोकप्रीय झाली आहे. अनेक लोक त्यांच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीच्या छतावर गार्डनिंग करत आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
घरात कशाप्रकारे कराल गार्डनिंग?
झाडे हिरवीगार ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्याल?
या गोष्टी लगेच फॉलो कराल
Best Gardening Tips : देशात आजच्या घडीला होम गार्डनिंगची कॉन्सेप्ट खूप लोकप्रीय झाली आहे. अनेक लोक त्यांच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीच्या छतावर गार्डनिंग करत आहेत. घरात घरात गार्डनिंग करण्याची योग्य पद्धत कोणती? याबाबत सर्वांनाच माहित नसतं. काही लोकांना गार्डनिंग तर करायचं असतं, पण त्यांच्याकडे याची योग्य माहिती नसते.
ADVERTISEMENT
घरात कशाप्रकारे कराल गार्डनिंग?
तुम्हालाही गार्डनिंग करायला आवडत असेल आणि घराच्या छतावर फुलं आणि झाडांच्या वेली पसरंवायच्या असतील, तर आम्ही तुम्हाला सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या घरात सुंदर गार्डनिंग निर्माण करण्यास मदत होईल.
कुंडीतील माती तपासून घ्या
घराला सुंदर बनवण्यासाठी लोक घरातील अंगणात आणि बाल्कनीत गार्डनिंग करतात. खूप मेहनत घेतल्यानंतरही झाडे सुकतात. अशातच कुंडीतील मातीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. घरात किंवा बाहेर झाडांची वाढ तेव्हाच होते, जेव्हा त्यात सुपीक माती असते. जर तुम्ही कुंडीत झाडांचं रोप लावत असाल, तर त्या कुंडीतील माती जाड नसेल, याची काळजी घ्या. रोप लावण्याआधी झाडाला हलकं करा अणि त्यात काही बीयाणंही टाका.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Weight Loss Tips : सावधान! अचानक वजन वाढणं म्हणजे...; चुकूनही करू नका दुर्लक्ष!
योग्य प्रमाणात पाणी टाका
माणूस असो किंवा झाडे पाणी सर्वांसाठी महत्त्वाचं असतं. जर तुम्ही घरात कुंडीत झाडांची रोपं लावली असतील, तर त्यांना योग्य प्रमाणात पाणी घाला. काही झाडांना कमी पाण्याची आवश्यकता असते. तर काही झाडांना जास्त पाण्याची गरज असते. तुम्ही जेव्हा झाडं खरेदी करता, त्यावेळी पाण्याच्या प्रमाणाचाही माहिती घ्या. झाडात पाणी आणि बियाणांशिवाय काही गोष्टींची काळजी घ्या. रोपांमध्ये असलेलं योग्य अंतरही त्यांची वाढ होण्यास फायदेशीर ठरतं. झाडांना खूप वेळ उन्हात ठेवल्यावरही नुकसान होऊ शकतं. कोणत्या झाडांना उन्हात किती वेळ ठेवायचं? याचीही काळजी घ्या.
हे ही वाचा >> WTC Points Table: टीम इंडियाला मोठा धक्का! डब्ल्यूटीसीची फायनल खेळणार की नाही? जाणून घ्या समीकरण
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT