9 December 2024 Horoscope : कन्या राशीचे विरोधक सक्रीय, तर 'या' राशीच्या लोकांना आर्थिक फटका बसणार
काही राशींसाठी आज दिवस शुभ असेल, तर काही राशीच्या लोकांना छोट्या मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT
वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याचं आकलन केलं जातं. आज 9 डिसेंबर, सोमवारचा दिवस. काही राशींसाठी शुभ मानला जातो. तर काही राशीच्या लोकांना छोट्या मोठ्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT
मेष- लाभ होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी हुशारीने पुढे जाल. कामात गती राहील. आर्थिक अनुकूलता राहील. महत्त्वाच्या बाबींचा निर्णय तुमच्या बाजूने होईल. जबाबदार वर्ग सहकार्य करेल. ध्येयावर लक्ष केंद्रीत रहील. अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. इच्छित यश संपादन करू शकाल.
वृषभ- करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. व्यवस्थापनावर भर राहील. कामाच्या चांगल्या परिणामांमुळे उत्साह वाढेल. धार्मिक आणि लोकहिताच्या कामांना गती मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. विविध कामांची गती वाढेल. मुलाखत चांगली होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी राहील. चांगल्या कामांना चालना मिळेल.
हे वाचलं का?
मिथुन- तुम्हाला शुभ संदेश देणारी बातमी मिळेल. आजचा दिवस तुमच्यात भरपूर आत्मविश्वास राहील. परिस्थिती सकारात्मक राहील. काम नेहमीपेक्षा चांगले होईल. लोककल्याणाच्या कामात सहभागी व्हाल. सत्कर्म करण्याचे प्रयत्न होतील. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल.
हे ही वाचा >>Maharashtra Weather Updates : पुणे, संभाजीनगरमध्ये सर्वात कमी तापमान, सर्वाधिक तापमान कुठे?
कर्क - काम आणि व्यवसाय पूर्वीप्रमाणेच राहतील. शिस्तीचं पालन करून पुढे जाल. व्यवहारात संयम ठेवाल. विविध प्रकरणं प्रलंबित राहू शकतात. कामकाजाच्या चर्चेत सक्रियता दाखवाल. मेहनत आणि विश्वासाने ध्येय गाठाल. सेवा क्षेत्राशी संबंधित लोक चांगले काम करतील. मित्रांचं सहकार्य सहकार्य राहील.
ADVERTISEMENT
सिंह - उद्योग आणि व्यापारात स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न वाढवाल. चर्चेत सहभागी होतील. मित्र आणि सहकाऱ्यांवर विश्वास राहील. महत्त्वाच्या विषयात सक्रियता आणाल.ठरवल्याप्रमाणे काम होईल. नफा कायम राहील. ध्येयाकडे सुरू असलेला प्रवास कायम राहील. सर्वांना सोबत घेऊन जाल.
ADVERTISEMENT
कन्या - कठोर परिश्रमाचे अनुकूल फळ मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सेवाक्षेत्रात रस वाढेल. वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित कराल. विरोधक सक्रीय राहतील. व्यवहारात स्पष्टता वाढेल. चर्चेत सोयीस्कर सहभागी व्हाल. कठोर परिश्रमामुळे नव्या संधीचे दरवाजे उघडतील.
तूळ - उत्साह कायम राहील. नम्रता आणि संयम राखाल. अध्यापन आणि प्रशिक्षणाशी संबंधित कार्यात पुढे राहाल. संपर्क वाढेल. ध्यान, प्राणायाम आणि योगा कराल. स्वार्थ आणि संकुचित वृत्ती सोडून द्या. व्यावसायिक सहकाऱ्यांमध्ये प्रेम आणि विश्वास राहील. वेळेचे व्यवस्थापन सांभाळाल.
वृश्चिक- घरगुती बाबींमध्ये रस राहील. रक्ताच्या नात्यातल्या लोकांमुळे आनंद मिळेल. अत्यावश्यक कामांवर लक्ष केंद्रित कराल. नम्रता आणि विवेक ठेवा. कृती योजनांमुळे कामांना गती मिळेल. मित्रांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. स्वार्थ आणि संकुचित वृत्ती टाळा. मोठ्यांचा आदर करा.
धनु - नफा आणि व्यवस्थापन चांगलं राहील. व्यावसायिक कामात गती येईल. सामाजिक कार्यातही रस दाखवाल. बंधुभाव वाढेल. संवाद प्रभावी होईल. आदर वाढेल. आर्थिक बाबी तुमच्या बाजूने असतील. महत्त्वाच्या कामात सहभागी होऊ शकता. दानधर्म वाढेल. संस्कृती आणि सभ्यता मजबूत होईल.
हे ही वाचा >> Optical Illusion : थांबा जरा! कँडी क्रश खेळताय? आधी शोधून दाखवा फोटोत लपलेली चुकीची 'Candy'
मकर - प्रियजनांच्या सहवासामुळे विश्वास वाढेल. मनोबल आणि उत्साहाने परिपूर्ण असेल. तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे सगळे प्रभावित होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. घरगुती बाबी सकारात्मक होतील. अत्यावश्यक कामांवर लक्ष केंद्रित कराल. पाहुण्यांच्या आगमनाने आनंद वाढेल. आनंदाचे क्षण निर्माण होतील.
कुंभ - वैयक्तिक कामात अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी कराल. व्यवसायात पुढे राहाल. कुटुंबातील सदस्यांची शिकवण आणि सल्ला कायम राहील. महत्त्वाचे निर्णय घेतील. भेटीगाठी आणि चर्चेसाठी वेळ द्याल. वरिष्ठांच्या भेटीगाठी होतील. आनंदात वाढ होईल. सरप्राईज मिळू शकतात. जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
मीन - आर्थिक बाबतीत सतर्क राहा. खर्च आणि गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवा. व्यवहारांवर लक्ष केंद्रित करा. वादाच्या प्रकरणांमध्ये संयम दाखवा. परदेश प्रवासाची शक्यता राहील. अधिकारी सहकार्य करतील. काम सामान्य राहील. मोठ्या कामासाठी प्रेरणा मिळेल. आत्मविश्वास कायम राहील. उदारपणे वागेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT