Kitchen Tips Video: लोखंडी-स्टीलच्या भांड्यांना अजिबात चिपकणार नाही अन्नपदार्थ! 'या' ट्रिक्सने होतील चकाचक
How To Make An Iron Frying Pan Non-Stick : जेवण शिजवताना गॅसवर असलेल्या लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यांना अन्नपदार्थ चिपकतात. जर तुम्ही डोसा, फ्राईड राईससारखे डिश बनवत असाल, तर या भांड्यांना अन्न चिपकतं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कढई किंवा पॅनला अन्नपदार्थ चिपकणार नाही, फक्त या ट्रिक्सचा वापर करा
शेफ कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला व्हिडीओ
या ट्रिकचा वापर स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यांसाठीही करू शकता
How To Make An Iron Frying Pan Non-Stick : जेवण शिजवताना गॅसवर असलेल्या लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यांना अन्नपदार्थ चिपकतात. जर तुम्ही डोसा, फ्राईड राईससारखे डिश बनवत असाल, तर या भांड्यांना अन्न चिपकतं. त्यामुळे पॅन किंवा कढई पूर्णपण खराब होते. तसच या भांड्यातून जळण्याचा वास येतो. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोक नॉन स्टिक भांडी खरेदी करतात. बाजारात या भांड्यांची किंमत खूप जास्त असते.
तसच नॉन स्टीक भांड्यांमध्ये शिजवलेलं जेवण आरोग्यासाठी फायदेशीर नसतं. अशातच आम्ही तुम्हाला जबरदस्त किचन टीप्स सांगणार आहोत, या टीप्स फॉलो केल्यानं नॉर्मल भांड्यालाही तुम्ही नॉन स्टीक बनवू शकता. या टीप्स फॉलो केल्यावर तुमच्या पैशांचीही बचत होणार आहे. तसच तुम्ही जेवण शिजवताना पॅन किंवा कढईला अन्नपदार्थ चिपकणार नाहीत. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
तेलाचा वापर करा
ही खास ट्रीक शेफ कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. या व्हिडीओत शेफ सांगतात की, जर लोखंडी भांड्यात जेवण शिजवताना अन्नपदार्थ चिपकत असतील किंवा ते जळल्यासारखे दिसत असतील, तर सर्वात आधी कढई गॅसवर गरम करा. हे भांडं खूप गरम झाल्यावर त्यात दोन किंवा तीन चमच तेल टाका आणि साफ कॉटनच्या कपड्याने या तेलाला गरम कढईत पसरवा. हे केल्यावर तुमची नॉर्मल कढई नॉन स्टिक कढईसारखी होईल आणि यात अन्नपदार्थही चिपकणार नाहीत. या ट्रिकचा वापर तुम्ही स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यांसाठीही करू शकता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: महिलांनो! खरंच दिवाळी बोनसचे 5500 मिळणार होते? काय आहे नेमकं सत्य?
कांद्याची मदत घ्या
जर तुम्हाला स्टीलचं भांड नॉन स्टीक करायचं असेल, तर यासाठी तुम्ही आणखी एक ट्रीकचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही भांड्याला गॅसवर ठेऊन गरम करा. आता कांद्याला मधोमध कापा आणि कापलेल्या भागाला सावधपणे गरम झालेल्या स्टीलच्या भांड्यावर रगडा. असं केल्याने त्या भांड्यात अन्नपदार्थ चिपकणार नाहीत. तुम्ही या पद्धतीचा वापर लोखंडी तव्यावरही करू शकता.
हे ही वाचा >> Viral Video: पैसाच पैसा! MOMO विकणारे प्रत्येक महिन्याला किती कमवतात? आकडा वाचून थक्कच व्हाल
मीठाचा वापर करा
अॅल्युमिनियमच्या भांड्याला नॉन स्टीक बनवण्यासाठी आणखी एक ट्रीकचा वापर करू शकता. यासाठी भांड्याला चांगल्या पद्धतीने गरम करा. त्यानंतर भांड्यात थोडं मीठ टाका. जोपर्यंत मीठाचा रंग लाल दिसणार नाही. त्यानंतर मीठ भांड्यातून बाहेर काढा. यामुळे भांड्यात अन्नपदार्थ चिपकणार नाहीत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT