How To Select A Jeans : महिलांनो! कशी खरेदी करायची 'परफेक्ट जीन्स'? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षातच ठेवा
Perfect Shape Jeans : आजच्या ट्रेंडी आणि फॅशनेबल काळात जीन्स सर्वात कम्फरटेबल आऊटफीट बनलं आहे. मुलांप्रमाणेच मुलीही जीन्स घालणं खूप पसंत करतात. जीन्स तेव्हा चांगली दिसते, जेव्हा ती योग्य शेप आणि फिटिंगमध्ये असते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'या' आहेत परफेक्ट जीन्स खरेदी करण्याच्या जबरदस्त टीप्स
परफेक्ट जीन्स खरेदी करताना 'या' गोष्टींचा नक्कीच विचार करा
जीन्स खरेदी करताना बॉडी टाईप जाणून घ्या
Perfect Shape Jeans : आजच्या ट्रेंडी आणि फॅशनेबल काळात जीन्स सर्वात कम्फरटेबल आऊटफीट बनलं आहे. मुलांप्रमाणेच मुलीही जीन्स घालणं खूप पसंत करतात. जीन्स तेव्हा चांगली दिसते, जेव्हा ती योग्य शेप आणि फिटिंगमध्ये असते. मुलींसाठी परफेक्ट जीन्स अनेक गोष्टींवर डिपेंड करते. ज्यामध्ये बॉडी टाईप, स्टाईल आणि कम्फर्टसारख्या गोष्टी सामील असतात. बेस्ट जीन्स निवडण्यासाठी काय करावं, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
बॉडी टाईप जाणून घ्या
जीन्स खरेदी करताना मुलींना त्यांचं बॉडी टाईप जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्हाला योग्य जीन्स खरेदी करता येईल.
अॅप्पल शेप (Apple Shape) : जर तुमचं वजन तुमच्या मिडसेक्शनच्या जवळपास असेल, तर हाय वेस्ट जीन्स पाहा. जी तुमच्या कंबरेला हायलाईट करेलं.
हे वाचलं का?
नाशपाती शेप (Pear Shape) : मजबूत हिप्स आणि मांड्यांसाठी बूटकट किंवा स्ट्रेट लेग जीन्स पायांपर्यंत लांब करून तुमच्या शेपला बॅलेन्स करू शकते.
आवरग्लास शेफ (Hourglass Shape) : स्किनी किंवा फिट जीन्स निवडा. जी तुमच्या कर्व्जला हायलाईट करेल किंवा बॅलेन्ससाठी वाइड लेग स्टाईल जीन्स निवडा.
ADVERTISEMENT
रेक्टँगल शेप (Rectangle Shape) : स्ट्रेट लेग जीन्स किंवा बॉयफ्रेंड जीन्स कर्व्स जोडू शकता आणि कंबरेला आणखी हायलाईट करू शकता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधीच पाकिस्तानमध्ये खळबळ! ISI ने 'मुंबई 26/11' च्या मास्टरमाईंडला केलं अंडरग्राऊंड
योग्य फिटींग पाहा
बॉडी टाईपनुसार जीन्सची फिटींगही खूप महत्वाची ठरते. स्किनी जीन्स त्वचेला चिकटून राहते. तर स्ट्रेट लेग जीन्स हिप्सपासून टाचेपर्यंत क्लासिक, स्ट्रेट फिट राहते. बूटकट जीन्स थोडीफार फ्लेयर्ड असते. मॉम जीन्स हिप्स आणि मांड्यांना कम्फर्टेबल फिटिंग बसते.
हायवेस्टेड जीन्स
हायवेस्टेड जीन्स पायांपासून लांब असते आणि कंबरेला हायलाईट करते. ही जीन्स क्रॉप टॉपसोबत पेयर करण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. तसच स्ट्रेच डेनिम कपड्यांमध्ये थोडा स्पॅन्डेक्स किंवा इलास्टेन कम्फर्ट फील होतं.
हे ही वाचा >> Nana Patole: "...तर आम्ही शपथविधीला नक्कीच गेलो असतो", नाना पटोले 'हे' काय बोलून गेले
लाईट वेट डेनिमचे कपडे
लाईट वेट डेनिमचे कपडे उन्हाळी हंगामात घालणे योग्य असतं. जीन्स जर फुल लेंथची असेल, तर त्या जीन्सला क्लासिक लेंथ हील्स किंवा फ्लॅट्ससोबत पेयर केलं जाऊ शकतं. क्रॉप जीन्स टाचेच्या वरच्या भागापर्यंत येते. ही जीन्स सॅन्डल किंवा स्नीकर्ससोबत परिधान केल्यावर आकर्षक दिसते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT