Ladki Bahin Yojana: महिलांनो! निवडणुकीचा लाडकी बहीण योजनेवर काय होणार परिणाम? खात्यात कधी येतील 1500?

मुंबई तक

ADVERTISEMENT

त्या महिलांच्या खात्यात  4500 पुन्हा खात्यात जमा होणार?
निवडणुकीचा लाडकी बहीण योजनेवर काय होणार परिणाम
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबतची अत्यंत महत्त्वाची अपडेट वाचलीत का?

point

विधानसभा निवडणुकीचा लाडकी बहीण योजनेवर काय होणार परिणाम?

point

लाडक्या बहिणींना कधी मिळतील योजनेचे पैसे?

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana:  केंद्र सरकारकडून जनतेसाठी अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये खूप साऱ्या योजना महिलांसाठीही सुरु करण्यात आल्या आहेत. भारतातील वेगवेगळ्या राज्यांचे सरकारेही लोकांसाठी योजना सुरु करतात. अशातच राज्य सरकारनेही महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलीय. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य देत आहे.

ADVERTISEMENT

सरकारच्या या योजनेचा लाभ आतापर्यंत अडीच कोटींहून अधिक महिलांना मिळाल्याचं समजते. येत्या 20 नोव्हेंबरला राज्याची विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची लाडकी बहीण योजनेवर नेमका काय परिणाम होणार? असा प्रश्न तमाम महिलांना पडला आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता निवडणुकीआधी मिळणार की पैसे खात्यात जमा होण्यास विलंब लागणार? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

हे ही वाचा >>  Viral: आरारारा खतरनाक! 11 पोरं अन् घटस्फोटीत बायकांसाठी खरेदी केला कोट्यावधींचा बंगला, सर्वात श्रीमंत उद्योगपतीची कमाल

लाडकी बहीण योजनेचा हफ्ता खात्यात कधी जमा होईल?

सरकारने लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीच्या तीन हफ्त्यांचे पैसे सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा केल्याची माहिती आहे. त्यानंतरचा चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याचे पैसे काही महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत. त्यामुळे या हफ्त्यांचे पैसे नेमके कधी जमा होतील? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सरकारकडून नोव्हेंबरचा चौथा हफ्ता जारी करण्यात येऊ शकतो. कारण नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा कार्यक्रमही पार पडणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधाही महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. ज्या महिलांना या योजनेच्या एकाही हफ्त्याचे पैसे मिळाले नाहीत, त्या महिलांच्या खात्यात सर्व हफ्त्यांचे पैसे एकत्रित जमा करणार असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा >>  CM Eknath Shinde : राज ठाकरेंना मी विचारलंही होतं, पण त्यांनी थेट... संवाद तुटला? दादर-माहिमचा मुद्दा तापला

20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी

याच महिन्यात राज्याची विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. वर्ष 2023 ला मध्य प्रदेशच्या निवडणुकीआधी तत्कालिन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानने मध्य प्रदेशात ही योजना सुरु केली होती. त्यानंतर भाजपने मध्य प्रदेशात पुन्हा एकदा सरकार स्थापन केलं होतं. राज्यातही या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT