Mazi Ladki Bahin Yojana : उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र नाही? मग असा भरा अर्ज

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी कोणती कागदपत्रे हवी?
मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची संपूर्ण माहिती वाचा...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजना २०२४

point

माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे

point

माझी लाडकी बहीण योजना नियम

Majhi ladki bahin yojana documents in marathi : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे अर्ज भरणे आणि कागदपत्रांची पूर्तता करणे अधिक सोपे झाले आहेत. उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी प्रमाणपत्र नसेल, तरीही पात्र महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. नेमके कोणते नियम बदलण्यात आले आहेत. आणि कोणती कागदपत्रे द्यावी लागणार, हेच समजून घ्या... (Which documents required for mazi ladki bahin yojana)

ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली असून, लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Mazi ladki bahin yojana : कधीपासून मिळणार पैसे?

या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या पात्रता निकषांमध्येही सुधारणा केल्या आहेत. त्याचबरोबर काही अटी शिथिल केल्या आहेत. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा >> माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर कोणती कागदपत्रे द्यावी लागणार?

या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर इतर पर्याय देण्यात आले आहेत. 

रहिवाशी प्रमाणपत्र नसेल, तर 15 वर्षापूर्वीची 'ही' कागदपत्रे हवी

1) रेशन कार्ड
2) मतदार ओळखपत्र 
3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 
4) जन्म दाखला 

ADVERTISEMENT

या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> कोकण कोणाचं?, राणेंना ठाकरेंचं तगडं आव्हान 

सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता या योजनेत लाभार्थी महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष होती. ती 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आली आहे.

इतर राज्यातील महिलांना करता येणार अर्ज

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. 

माझी लाडकी बहीण योजना : उत्पन्नाचा दाखला नसेल, तर कोणती कागदपत्रे लागणार?

अडीच लाखांच्या उत्पन्नाची अट आहे. मात्र, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. 

योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT