Maza Ladka Bhau Yojana Online Apply: असा भरा ऑनलाइन अर्ज, सरकारकडून मिळवा 10 हजार रुपये!
Maza Ladka Bhau Yojana online Apply: लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि अर्ज भरताना नेमकी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत. जाणून घ्या त्याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
Maza Ladka Bhau Yojana Online Form: मुंबई: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' ही आता माझा लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana Maharashtra 2024) या नावाने ओळखली जात आहे. या योजने अंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकार 6 हजार ते 10 हजार रुपये आर्थिक सहाय्य करणार आहे. पण त्यासाठी सरकारने काही अटी आणि नियम निश्चित केले आहे. यासाठी सगळ्यात आधी तरुणांना अर्ज करावा लागणार आहे. या योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने कसा करायचा हे आपण जाणून घेऊया. (know in detail how to apply online for maza ladka bhau yojana on online and get 10 thousand rupees)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र सरकार या योजनोसाठी 6000 कोटी रुपये खर्च करणार आहे. कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि त्याद्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील तरुणांना दरमहा 10,000 रुपये सरकारकडून मिळू शकतात.
हे ही वाचा>> Majhi ladki bahin yojana New Rules : रेशन कार्डवर नाव नाही, मग असा भरा अर्ज!
Maza Ladka Bhau Yojana 2024 साठी अर्ज कसा करावा?
जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे तरुण नागरिक असाल आणि माझा लाडका भाऊ योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून सहजपणे अर्ज करू शकता.
हे वाचलं का?
Maza Ladka Bhau Yojana साठी असा करा ऑनलाइन अर्ज!
- सर्वप्रथम तुम्हाला माझा लाडका भाऊ योजनाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल (वेबसाइट अद्याप उपलब्ध नाही).
- वेबसाइटचे होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला New User Registration या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही क्लिक करताच, अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.
- आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल.
- यानंतर, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- शेवटी, तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे, तुम्ही माझा लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे ही वाचा>> Maza Ladka Bhau Yojana Apply: लाडका भाऊ योजनेसाठी 'असा' भरा अर्ज अन् मिळवा 10 हजार रुपये!
माझा लाडका भाऊ योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणं गरजेचं आहे.
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- वय प्रमाणपत्र
- चालक परवाना
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट फोटो
- बँक खाते पासबुक
सरकारकडून लाडक्या भावांना मिळणार केवळ 6 महिने विद्यावेतन
दरम्यान, सरकारने जी योजना आणली आहे ती प्रत्येक तरुणासाठी कायमस्वरूपी नाही. याबाबत जीआरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, सदर कार्य प्रशिक्षणचा कालावधी ६ महिने असेल. सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT