Ladki Bahin Yojana : 80 लाख महिलांच्या खात्यात 3000 झाले जमा, तुमच्या अर्जाचं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme 80 lakh women send  installment amount dbt on this accout  mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde
80 लाख महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाआधीच (Raksha Bandhan) ओवाळणी पोहोचली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाभार्थी महिलांच्या खात्यात आता पैसे पाठवायला सुरुवात

point

80 लाख महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले

point

तुमचा अर्ज नेमका कुठे आहे?

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यात आता पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. बुधवारपासून या प्रक्रियेला सुरूवात झाली असून आतापर्यंत 80 लाख महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाआधीच (Raksha Bandhan) ओवाळणी पोहोचली आहे. यामुळे असंख्य महिला चेहऱ्यावर आनंद आहे. तर अनेक महिलांच्या खात्यात (Women Account) पैसे पोहोचले नाही आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज नेमका कुठे पोहोचला आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme 80 lakh women send installment amount dbt on this accout  mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde) 

ADVERTISEMENT

राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेत किती महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर झाले आहेत, याची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस 32 लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे ४ वाजता 48 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत एकूण 80 लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

हे ही वाचा : Ajit Pawar: अजितदादांचा 'हा' कोणता डाव?, बारामतीची जागा सेफ करण्यासाठी नवी खेळी?

दरम्यान आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयारी झाली आहे. त्यातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी 27 लाख महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडले गेले नाही आहेत. या महिलांची बँक खाती आधार कार्डशी जोडण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामुळे या 27 लाख महिलांना अद्याप पैसे पोहोचू शकले नाहीत. 

हे वाचलं का?

इतकचं नाही तर सरकार रक्षाबंधनापर्यंत म्हणजेच 19 ऑगस्टपर्यंत महिलांना पैसे पाठवणार आहेत.त्यामुळे साधारण चार दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. ज्या महिला अर्जदारांचे अर्ज अजून पात्र ठरले नाहीत, त्या महिलांचे जर येत्या काही दिवसात अर्ज पात्र ठरल्यास त्यांच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहे. 

हे ही वाचा : Ajit Pawar : ''कुटुंबीयांना खूप त्रास...'', सुप्रिया-सुनेत्रा पवारांवर बोलताना अजितदादा झाले हळवे

विशेष म्हणजे ज्या महिलांचे अर्ज अद्याप पात्र ठरले नाही आहेत. त्या महिलांनी त्यांच्या अर्जावर लक्ष ठेवावे. सरकार तुमचा अर्ज पात्र ठरवतेय की अपात्र ठरवतेय किंवा दुरूस्तीचा पर्यायावर लक्ष ठेवावे. जेणेकरून तुम्हाला कळेल, तुमचा अर्ज कुठे पोहोचला आहे.सरकारने आतापर्यंत 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवले आहे. हा आकडा आणखीण वाढणार आहे. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT