Ladki Bahin Yojana : दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात 3000 जमा, तुमच्या बँकेत आले का?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात निधी हस्तांतरणाला सुरूवात झाली आहे. या हस्तांतरणात अनेक महिलांच्या खात्यात 3 हजार रूपये झाले आहेत. तर अनेक महिलांनी अर्ज करूनही, बँकेशी आधारकार्ड जोडून देखील त्या महिलांच्या खात्यात पैसेच आले नाहीयेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात 3000 जमा
अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात
तुमच्या खात्यात आले का 3000 रूपये?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दुसऱ्या टप्प्यात (Second Term) महिलांच्या खात्यात (Women Account) पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 3000 जमा झाले आहेत. तर अनेकांच्या खात्यात अद्याप हे पैसे आलेच नाहीयेत. त्यामुळे हे पैसे कधी जमा होणार आहेत? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. तसेच खात्यात पैसे न येण्यामागची नेमकी कारणे काय आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme second term 3000 dbt transfer to women account did it come to your bank aditi tatkare ajit pawar devendra fadnavis)
ADVERTISEMENT
दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात निधी हस्तांतरणाला सुरूवात झाली आहे. या हस्तांतरणात अनेक महिलांच्या खात्यात 3 हजार रूपये झाले आहेत. तर अनेक महिलांनी अर्ज करूनही, बँकेशी आधारकार्ड जोडून देखील त्या महिलांच्या खात्यात पैसेच आले नाहीयेत. त्यामुळे त्या महिलांना खात्यात पैसे येणार आहेत की नाही असा संशय निर्माण झाला आहे.
हे ही वाचा : Anil Deshmukh : अनिल देशमुख पुन्हा तुरुंगात जाणार? CBI कडून गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
पण जर तुम्ही योग्य पद्धतीने अर्ज भरले नाहीयेत बँकेशी संबंधित डिटेल्स आणि आधार कार्ड बँकेशी जोडलेले असेल तर नक्कीच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे काही दिवस आणखीण वाट पाहा. जर तरीही तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर एकदा तुमचं अर्ज पुन्हा तपासा. तुम्ही भरलेल्या अर्जात बँक अकाऊंट नंबर व्यवस्थित भरले आहेत की नाही ते एकदा पुन्हा तपासून घ्या. जर तो चुकीचा टाकला असेल तर पैसे येणारच नाही.
हे वाचलं का?
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक अकाऊंट आधारशी जोडले गेले असणे खूप महत्वाचे आहे. जर ते आधारशी जोडले गेले नसेल तर तुमच्या खात्यात पैसेच जमा होणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही अर्जात दिलेली बँक अकाऊंट तुमच्या आधारशी जोडली गेली आहे की नाही? हे एकदा तपासा. आणि जरी समजा तुमच्या आधारशी दुसरं अकाऊंट लिंक असेल तरी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे काहीही करून तुमच्या आधारशी बँक अकाऊंट जोडणी आवश्यक आहे. जर ती नसेल तर पैसे खात्यात येणारच नाहियेत.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : एकाच महिलेने 28 अर्ज भरले अन्...नवरा बायकोने मिळून योजनेचे किती पैसे लाटले?
'त्या' महिलांना 3000 रूपये मिळणारच नाही
ज्या महिलांना सप्टेंबरआधी अर्ज करता आला नाही आहे, त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी म्हणजेच 3000 रूपये मिळणार नाहियेत. त्यामुळे त्या महिलांना मोठा धक्का बसणार आहे. जर त्या महिलांनीच आधीच अर्ज केले असते, तर त्यांना 3000 रूपयाच्या लाभापासून मुकावे लागले नसते.
ADVERTISEMENT
1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT