LIC Unclaimed maturity Amount : पॉलिसी घेऊन विसरून गेले... LIC कडे कुणीच दावा न केलेले 880 कोटी रुपये
तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला जर तपासायचं असेल, तर तुमच्याकडे काही कागदपत्र असणं आवश्यक आहे. यामध्ये एलआयसी पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारकांचे नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड इत्यादींचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
LIC कडे किती कोटी रक्कम पडून?
दावा न केलेली रक्कम म्हणजे काय?
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच LIC कडे 880.93 कोटी रुपयांची अनक्लेम मॅच्युरिटी रक्कम पडून आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली. 2023-2024 या आर्थिक वर्षात 3,72,282 पॉलिसीधारक मॅच्युरिटीचा लाभ घेतला नाहीये. पीटीआयच्या वृत्तानुसार, या रकमेवर दावा करण्यासाठी सरकार पॉलिसीधारकांना माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.
ADVERTISEMENT
जर तुमच्याकडेही एलआयसी पॉलिसी असेल आणि तुम्ही त्याची मॅच्युरिटी विसरला असाल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यानं एलआयसी पॉलिसी घेतली असेल आणि ते आता हयात नसतील किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तिने एलआयसी पॉलिसी घेतली असेल आणि त्याची मॅच्युरिटी पूर्ण झाली असेल आणि तुम्हाला ती क्लेम करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमची LIC पॉलिसीही तपासा आणि मॅच्युरिटीवर क्लेम करायचं तेही जाणून घेऊ शकता.
कोणती कागदपत्रे लागतील?
तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला जर तपासायचं असेल, तर तुमच्याकडे काही कागदपत्र असणं आवश्यक आहे. यामध्ये एलआयसी पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारकांचे नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड इत्यादींचा समावेश आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Zakir Hussain यांचा ज्यामुळे मृत्यू झाला, तो IPF आजार नेमका काय? काय आहेत लक्षणं आणि उपचार?
मॅच्युरीटीच्या रकमेवर क्लेम कसं कराल?
कोणत्याही एलआयसी पॉलिसीधारक किंवा लाभार्थ्याला एलआयसी पॉलिसीचे पैसे त्याच्या नावावर क्लेम केलेले आहेत की नाहीत तसंच थकबाकी आहे की नाही हे तपासायचं असल्यास, त्याला तिथे नमूद केलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- सर्वप्रथम LICच्या वेबसाइटवर जा - https://licindia.in/home
- आता ग्राहक सेवा आणि 'अनक्लेम अकाऊंट्स ऑफ पॉलिसी होल्डर्स' हा पर्याय निवडा.
- यानंतर पॉलिसी क्रमांक, नाव (अनिवार्य), जन्मतारीख (अनिवार्य) आणि पॅन तपशील रिकाम्या जागेमध्ये भरा.
- आता सबमिट बटणावर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचे तपशील तपासता येतील.
मॅच्युरिटीवर क्लेम कसा कराल?
जर तुमच्याकडेही LIC क्लेम न केलेली रक्कम असेल, तर तुम्ही LIC एजंटद्वारे किंवा आवश्यक कागदपत्रांसह LIC कार्यालयात जाऊन दावा करू शकता.
ADVERTISEMENT
10 वर्षांहून अधिक काळ कोणतीही रक्कम क्लेम न केल्यास, संपूर्ण रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये हस्तांतरित केली जाते. अशी रक्कम नियमानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्यासाठी वापरली जाते. दावा न केलेल्या रकमेवरील IRDAI परिपत्रकानुसार, “अनक्लेम अमाऊंट”मध्ये विमा कंपन्यांकडे असलेली कोणतीही रक्कम समाविष्ट केली जाऊ शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT