OnePlus green line warranty : स्क्रीनवर आली ग्रीन लाईन? वनप्लसच्या ग्राहकांना मोठा दिलासा, कंपनीचा मोठा निर्णय
OnePlus Mobiles : अनेक ग्राहकांनी या स्मार्टफोनमध्ये ग्रीन लाईन आल्याची तक्रार केली होती. ग्राहकांना थेट डिस्प्ले बदलून घ्यावा लागत होता किंवा आहे त्याच स्थितीत त्यांना तो वापरावा लागत होता. पण आता कंपनीने घेतल्या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
OnePlus च्या ग्राहकांना मोठा दिलासा
स्क्रीनवर आलेल्या ग्रीन लाईनवर कंपनीचा तोडगा
OnePlus green line warranty : ने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने आपल्या सर्व स्मार्टफोन्सच्या डिस्प्लेवर ग्रीन लाईनच्या समस्येवर आता एक कायमचा तोडगा काढला आहे. कारण आता ग्राहकांना स्क्रीनसाठी लाईफ टाईम वॉरंटी मिळणार आहे. त्यामुळे जर तुमचा OnePlus स्मार्टफोच्या स्क्रीनवर ग्रीन लाइन आली आणि तो खराब झाला असेल तर कंपनी तुमचा फोन मोफत दुरूस्त करुन देणार आहे. अनेक ग्राहकांनी या स्मार्टफोनमध्ये ग्रीन लाईन आल्याची तक्रार केली होती. ग्रीन लाइनच्या या समस्येवर दोनच पर्याय असतात. एकतर त्यांना डिस्प्ले बदलून घ्यावा लागतो किंवा आहे त्याच स्थितीत त्यांना तो फोन वापरावा लागला.
ADVERTISEMENT
OnePlus च्या अनेक स्मार्टफोनमध्ये ग्रीन लाईन येत असल्याचं दिसून आलं आहे.विशेष म्हणजे त्यातल्या बहुतेक ग्राहकांना मोबाईलचा वॉरंटी संपल्यानंतर हा प्रॉब्लेम आला. त्यामुळे आता ग्रीन लाईनच्या लाइफ टाइम वॉरंटीमध्ये फक्त नवीन स्मार्टफोनच नाही तर जुने स्मार्टफोनही दुरूस्त करुन मिळणार आहेत.प्रोजेक्ट स्टारलाईट अंतर्गत कंपनीने ही माहित दिली आहे. त्यामुळे वन प्लस मोबाईल विकत घेतलेल्या ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.
हे ही वाचा >> Aaditya Thackeray meets Devendra Fadnavis : आदित्य ठाकरेंनी फडणवीसांशी हात मिळवला, पण गुलाबरावांना इग्नोर...
कंपनीने म्हटले आहे की, 2026 पर्यंत त्यांचे सर्व्हिस सेंटर 50 टक्क्यांनी वाढवणार आहेत. त्याचसोबत कंपनी आपल्या डिस्प्लेच्या टेक्नॉलॉजिला सुधारण्यावरही काम करत आहे. OnePlus ने म्हटलं आहे की, ते AMOLED डिस्प्लेसोबतच नवीन 'एज बाँडिंग लेयर'च्या माध्यमातून उत्कृ्ष्ट अशा PVX एज सीलिंग मटेरियलच्या वापरातून येणाऱ्या काळात चांगले डिस्प्ले घेऊन येणार आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Aaditya Thackeray : मारकडवाडीचा मुद्दा पेटणार? आमदारांनी शपथच घेतली नाही, आदित्य ठाकरे म्हणाले आता राज्यभर...
PUX मुळे डिस्प्ले अधिक मजबूत होतो, त्यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव येईल. OnePlus ने सांगितलंय की, PUX च्या मुख्य चाचण्यांपैकी एक म्हणजे 'डबल 85'. या चाचणीमध्ये 85 अंश सेल्सिअस आणि 85 टक्के आर्द्रतेच्या स्थितीत डिस्प्ले टेस्ट करुन पाहिला जाईल. विशेष म्हणजे या नव्या वॉरंटी स्किममुळे वापरकर्त्यांचा ब्रँडवरचा विश्वास वाढेल असा कंपनीला विश्वास आहे. गेल्या काही वर्षांत वनप्लसच्या अनेक स्मार्टफोनमध्ये ग्रीन लाईनची समस्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही समस्येवर हा तात्पुरता तोडला ग्राहकांना दिलासा देणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT