ladki Bahin Yojana: महिलांसाठी खुशखबर! 'या' दिवशी मिळतील 2100 रुपये? शिंदेंच्या नेत्यानं दिली मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana Latest News Update: पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याने महिलांना दरमहा 2100 रुपये मिळणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. अशातच शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलंय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आली समोर
लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपये?
शिवेसेनेच्या या नेत्यांन दिली महत्त्वाची माहिती
Ladki Bahin Yojana Latest News Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केलीय. सरकारने मागील पाच महिन्यांच्या हफ्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केलीय. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी प्रचार सभांमध्ये केली होती. आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याने महिलांना दरमहा 2100 रुपये मिळणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. अशातच शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलंय. माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले, "ज्या महिला पात्र आहेत. त्यांना आता नेहमीप्रमाणे पैसे मिळतील. मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 करण्यासंदर्भात सरकारचा मनोदय आहे. तेव्हापासून त्यांना 2100 मिळतील असा एकत्रित अंदाज आहे".
ADVERTISEMENT
शिरसाट महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीक करत म्हणाले, "लोकसभेला तुम्हाला जे यश प्राप्त झालं. त्यावेळी जे लाडू भरवत होते, फुगड्या खेळत होते, त्यांनीही आता पैसे भरले पाहिजेत. जिंकले तर फुगड्या खेळायच्या आणि टाळ्या वाजवायच्या आणि हारले तर रडत बसायचं. ईव्हीएमच्या बाबतीत त्यांनी आता मोर्चे वगैरे काढले पाहिजेत. लोकांना किती प्रतिसाद मिळतोय ते कळू तर द्या. आता हे घरोघरी जाणार आहेत. घरोघरी जाण्याची त्यांची लायकी सुद्धा राहिली नाही. हिम्मत असेल तर त्यांनी आंदोलन उभं करावेत आणि मोर्चे काढावेत. त्यावेळी लोक यांना किती प्रतिसाद देतात, हे त्यांनी लक्षात घ्यावं. या आंदोलनाचं नेतृत्व उद्धव ठाकरेही करण्याची शक्यता आहे, यावर बोलताना शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे अशी कामं करत नसतात. उद्धव ठाकरे आदेश देत असतात. तुम लढो..हम देखेंगे. उद्धव साहेब काही काळ पक्ष बंद करून ठेवतील".
हे ही वाचा >> Uday Samant: "60 आमदारांनी मिळून..."; एकनाथ शिंदे गावी जाताच उदय सामंतांचं मोठं विधान!
"ज्या महिला पात्र आहेत. त्यांना आता नेहमीप्रमाणे पैसे मिळतील. मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 करण्यासंदर्भात सरकारचा मनोदय आहे. तेव्हापासून त्यांना 2100 मिळतील असा एकत्रित अंदाज आहे. वक्फ बोर्डाला पैसे देणे गैर नाही. त्या पैशाचा वापर इतर कामाला होत असेल, तर त्याला आमचा विरोध राहील. अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनाने हा जीआर काढला असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल. मंत्रिपदासाठी लॉबिंगचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले, मंत्रिपदासाठी प्रत्येक जण इच्छूक असतात. आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांकडे जाणे, चार कार्यकर्ते पाठवणं, निवेदन देणं हे सर्व प्रकार पूर्वीपासून घडत आले आहेत. परंतु, जे नेते असतात ते या गोष्टींना सीरियस घेत नाहीत, असंही शिरसाट म्हणाले.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Optical Illusion Test: स्वत:ला हुशार समजता? मग चिंटूच्या गर्दीत लपलेला 'पिंटू' शोधून दाखवा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT