World Heart Day 2024: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट यांच्यात नेमका फरक काय? 'हा' आहे हेल्दी हार्ट फॉर्म्युला

मुंबई तक

ADVERTISEMENT

World Heart Day 2024
Cardiac Arrest And Heart Attack Diffrence
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यांच्यातील फरक माहितीय का?

point

या दोन्ही समस्यांवर रामबाण उपाय काय?

point

जागतिक आरोग्य संघटनेनं दिली महत्त्वाची माहिती

Cardiac Arrest VS Heart Attack : हृदयविकाराच्या समस्यांमुळे तरुण व्यक्तींचाही मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजमुळे (CVD) दरवर्षी 17.9 मिलियन (1.79 कोटी) लोकांचा मृत्यू होतो. प्रत्येक पाच लोकांमध्ये चार व्यक्तींचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने आणि स्ट्रोकच्या कारणामुळे होतो. त्यामुळे हृदयाची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. 

ADVERTISEMENT

दरवर्षी 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन मानला जातो. या दिवशी हृदयाशी संबंधीत समस्यांबाबत जनजागृती केली जाते. याच पार्श्वभूमीवर नवभारत टाईम्सने 'दिल की बात' नावाच्या वेबिनारचं आयोजन केलं होतं. यामध्ये देशाचे नामांकीत आणि अनुभवी कार्डियोलॉजिस्ट, डॉ. विनय कुमार बहल, डॉ. नरेश कुमार गोयल, डॉ. रवी प्रकाश, डॉ. संजय कुमार, डॉ. कुमार राजीव, डॉ. कार्तिकेय भार्गव, डॉ. अजय कौल आणि डॉ. अमित चौधरी यांनी सहभाग घेतला होता. 

कार्डियक अरेस्ट VS हार्ट अटॅक

डॉ. विनय कुमार बहल आणि डॉ. नरेश कुमार गोयल हार्टसंबंधीत समस्यांबाबत माहिती दिली. सेडेंटरी लाईफस्टाईल, स्मोकिंग, दारुचं व्यसन, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रोल लेव्हल, लठ्ठपणा, स्ट्रेस, व्यामान न करणे, अशाप्रकारची कारणे हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात. डॉ. रवी यांनी कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यांच्यातील नेमका फरक सांगितला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Cooker Safety Tips : जेवण शिजवताना 'या' गोष्टी लक्षातच ठेवा! किचनमध्ये प्रेशर कुकरचा स्फोट कधीच होणार नाही

डॉ. रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्डियक अरेस्टमध्ये हृदय अचानक बंद होतो आणि रुग्ण जागेवरच कोसळतो. त्याचे पल्स आणि रक्तप्रवाह थांबतो. तक हार्ट अटॅकमध्ये हृदयापर्यंत रक्त पोहचत नाही. आर्टिरीजमद्ये रक्ताचा प्रवाह थांबतो किंवा संपून जातो. त्यामुळे ऑक्सिजनची कमी होते आणि हार्ट अटॅक येतो. यावेळी डोकेदुखी, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट दोन्ही गंभीर समस्या आहेत. दोन्ही मध्ये जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

यापासून सुरक्षीत राहण्यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम, चांगली लाईफस्टाईल या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रोल, ब्लड प्रेशर, साखरेचं प्रमाण तपासणं गरजेचं आहे. याशिवाय लक्षणं असल्यास योग्य वेळी ईसीजी, इकोकार्डियोग्राफी आणि एंजियोग्राफीसारख्या चाचण्या केल्या पाहिजेत. तसच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. वेळेवर उपचार घेतल्यावर अनेकांचा जीव वाचू शकतो.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> प्रेक्षकांनो! 'Bigg Boss Marathi' पुन्हा पाहायचंय ना? फिनालेआधीच घेतला मोठा निर्णय

हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच सीपीआर आणि कार्डियक मसाज करणं खूप महत्त्वाचं असतं. एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचा वेग कमी झाल्यास कार्डियक मसाजमुळे त्याचा जीव वाचू शकतो. हार्ट अटॅक आल्यानंतर तातडीनं रुग्णाला सीपीआर दिला पाहिजे. ज्यामुळे त्याचा जीव वाचण्यास मदत होते. श्वसनाचा त्रास, छातीत दुखणं, थकवा, घाम येणं किंवा चक्कर येणं, ही हार्ट अटॅकची काही लक्षणं आहेत. हार्ट अटॅक आल्यावर छातीच्या सर्व भागात वेदना होतात. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT