Adivasi Hair Oil: आदिवासी हेअर ऑइल का होत आहे एवढं फेमस? 'सत्य' समजलं तर तुम्हीही...

मुंबई तक

ADVERTISEMENT

आदिवासी हेअर ऑइल का होत आहे एवढं फेमस?
आदिवासी हेअर ऑइल का होत आहे एवढं फेमस?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोशल मीडियावर आदिवासी हेअर ऑइलची सध्या खूपच चर्चा

point

अनेक सेलिब्रिटी आणि इन्फ्लूएन्सर या केसांच्या तेलाची करतात जाहिरात

point

हे तेल एवढं प्रसिद्ध कसं झालं?

Know All About Adivasi Hair Oil: प्रत्येकाला महिलेला लांब, दाट आणि काळे केस हवे असतात. बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू, कंडिशनर आणि केसांचे तेल उपलब्ध आहेत जे केसांची वाढ सुधारण्याचा दावा करतात. असेच एक हेअर ऑइल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्याचे नाव आहे आदिवासी हेअर ऑइल. (Adivasi Hair Oil) हे तेल कर्नाटकातील आदिवासी भागातून आल्याचे सांगण्यात येत आहे आणि आज अनेकांना याची माहिती होऊ लागली आहे. या तेलाची जाहिरात अनेक सेलिब्रिटी-इन्फ्लूएन्सरकडून केली जात आहे. ज्यात कॉमेडियन भारती सिंग, कोरिओग्राफर फराह खान, यूट्यूबर एल्विश यादव यांसारख्या अनेक नावांचा समावेश आहे. (why is adivasi hair oil becoming so famous know truth about this oil made from wild herbs from doctors)

ADVERTISEMENT

प्रमोशन पाहिल्यानंतर हे तेल वृद्ध आणि तरुणांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. या तेलाची जाहिरात ही लांब, जाड आणि गडद केस असलेल्या पुरुष आणि महिला मॉडेल्सद्वारे केली जात आहे. हे तेल केवळ केसांच्या वाढीसाठीच कारणीभूत नसून केस नसलेल्या लोकांच्या डोक्यावरही केस येतात असा दावा केला जात आहे.

हे तेल कितपत प्रभावी आहे आणि त्यात कोणती औषधे मिसळल्याचा दावा केला जातो, ते कोण बनवतं आणि ते कसे बनवले जाते हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> History Of Lipstick : ओठ लाल चुटूक करणाऱ्या लिपस्टीकचा इतिहास काय?

हे तेल कुठे बनवले जाते?

पश्चिम आणि दक्षिण भारतातील (कर्नाटक) जंगल भागात, हक्की पिक्की आदिवासी समुदाय आहे जो प्राणी आणि पक्ष्यांची शिकार करतो. ही कर्नाटकातील अनुसूचित जमात आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या राणा प्रताप सिंह यांच्याशी संबंधित मानली जाते.

वन्यजीव कायद्यामुळे शिकारीवर बंदी असताना तिथले लोक नैसर्गिक घटकांपासून अनेक गोष्टी बनवू लागले. त्यातील एक होते 'ट्रायबल हेअर ऑइल'. हे नैसर्गिक घटकांपासून बनवल्यामुळे त्याची चर्चा होऊ लागली आणि आज बरेच लोक हे तेल विकून केसांसाठी फायदेशीर असल्याचा दावा करतात.

ADVERTISEMENT

आदिवासी हेअर ऑइलचे काय फायदे सांगितले जात आहेत?

आदिवासी हेअर ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवर या तेलाची वैशिष्ट्ये आणि काही फायदे सांगितले आहेत. ते म्हणतात की, पूर्वज 5 पेक्षा जास्त पिढ्यांपासून स्वतःसाठी हे तेल घरी बनवत आहेत. त्यांच्या तेलात पॅराबेन्स, सिलिकॉन किंवा पॅराफिन नसतात. कोंडा दूर करण्यासाठी, केस मजबूत करण्यासाठी, टक्कल पडलेल्या लोकांच्या डोक्यावरील केस वाढवण्यासाठी आणि केस गळणे थांबवण्यासाठी त्यांचे तेल फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Health Tips : जोर लावूनही पोट साफ होत नाही? 'हे' उपाय केल्यास झटपट होईल समस्या दूर

लोक विश्वास का ठेवतात?

सेलिब्रेटी आणि इन्फ्लूएन्सर लोक या तेलाची जाहीरात करत असून ते हे तेल वापरण्यास लोकांना सांगत आहेत. त्यामुळे बरेच लोक विचार करतात की, आपण हे एकदा वापरून पाहिले पाहिजे. दुसरीकडे, 250, 500, 1000 मिली तेलाची किंमत अनुक्रमे 999, 1499 आणि 3000 रुपये एवढी आहे. आता अशा परिस्थितीत लोकांना वाटते की, तेल इतके महाग आहे म्हणजे नक्कीच त्याने आपल्याला फायदा होईल.

हे तेल इतकं प्रसिद्ध कसं झालं?

प्रत्येक सेलिब्रिटी-इन्फ्लूएन्सरचा लोकांवर प्रभाव पाडण्याचा एकच मार्ग आहे.  त्यांनी बेंगळुरूला जाऊन हे तेल बनवलेल्या कारखान्यांना भेट दिली. त्याच वेळी ते त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या तेलाचे फोटो देखील पोस्ट केले. जे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या तेलाच्या जाहिरातीत लांब केस असलेले स्त्री-पुरुष दाखवले आहेत. यामुळे सर्वांचे लक्ष जाहिरातीत दिसणारे मोठे केस असलेल्या स्त्री-पुरुषांकडे जाते. आता अशा परिस्थितीत प्रत्येकाला लांब, दाट आणि काळे केस हवे असतात, म्हणून ते देखील याबद्दल वाचतात आणि इतर लोकांशी बोलतात.

पण त्याची जाहिरात करणाऱ्यांनी कधी त्याचा वापर केला आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही. बरेच लोक या तेलाच्या फायद्यांबद्दल समाधानी नाहीत आणि ते याला घोटाळा म्हणत आहेत.

तज्ज्ञ काय म्हणतात?

हे तेल कर्नाटकातील हक्की पिक्की समाजाने बनवले, तर त्यांच्या पूर्वजांची मुळे जंगलाशी आणि तेथून मिळणाऱ्या वस्तूंशी जोडलेली आहेत. निसर्गाच्या खूप जवळ असल्याने त्यांचे काळे, लांब आणि दाट केस हे त्यांच्या आनुवंशिकतेमुळे आणि तेथील अन्न आणि वातावरणामुळेही असू शकतात.

तेथील लोकांची जीवनशैली शहरी जीवनशैलीपेक्षा खूपच वेगळी आहे. तेथे कोणतेही प्रदूषण नाही, नैसर्गिक उत्पादनांचा वापर केल्याने त्यांच्या केसांवर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या केसांना केवळ तेल लावल्याने नाही तर नैसर्गिकरित्या पोषणक घटक मिळतात आणि म्हणून त्यांचे केस तसे असण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया आदिवासी हेअर ऑइलच्या दाव्यावर तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे.

भरपूर नैसर्गिक घटक

आदिवासी हेअर ऑइलचे निर्माते दावा करतात की, या तेलात 108 किंवा 180 नैसर्गिक घटक असतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अधिक घटक असणे याचा अर्थ केसांच्या वाढीसाठी काम करेलच असे नाही.

डॉ. अजारा यांच्या मते, आदिवासी केसांच्या तेलामध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांना शास्त्रीय आधार नाही. जरी त्यात काही ऍलोपॅथी गुणधर्म असू शकतात. या तेलात आवळा असतो जो केसांच्या वाढीसाठी फायदेशीर मानला जातो. त्यात  कडुलिंबाच्या पानांमध्ये ॲझाडिराक्टिन आणि निम्बिडिन अल्कलॉइड्स असतात, ज्यात दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात जे टाळूच्या संसर्गास प्रतिबंध करू शकतात. आज-काल लोक 'हर्बल' हे नाव वाचताच त्याकडे आकर्षित होतात, जे चुकीचे आहे.

हे तेल वापरणे कितपत योग्य आहे?

या तेलातील घटकांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. केवळ सेलेब्स आणि इन्फ्लूएन्सर व्यक्तींच्या सल्ल्यानुसार ते वापरणे योग्य नाही. हे निराधार तेल वापरण्याऐवजी, सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधा.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT