लाइव्ह

Marathi News LIVE Updates : शिंदे गटाचे दोन मुद्दे… ठाकरे अडचणीत, आमदार अपात्रता सुनावणीत काय झालं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

MLA disqualification case hearing updates, maharashtra Latest news, Maratha Reservation, manoj jarange vs chhagan bhujbal
MLA disqualification case hearing updates, maharashtra Latest news, Maratha Reservation, manoj jarange vs chhagan bhujbal
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 01:46 PM • 28 Nov 2023

    mumbaitak

    mumbaitak
  • 01:44 PM • 28 Nov 2023

    Uddhav Thackeray : शिंदेंना म्हणाले भुरटे, ठाकरे काय बोलले?

    उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना म्हणाले, "स्वतःचं घरं न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे, राज्याला न्याय देऊ शकत नाही. राज्य वाऱ्यावर पडले आहे. एक फुल दोन हाफ... दोन हाफ कुठे आहेत, माहिती नाही. मधल्या काळात दुसरे हाफ छत्तीसगढला प्रचाराला गेले होते. दुसरे ज्यांना डेंग्यू झाला होता, ते कुठे आहेत त्याबद्दल माहिती नाही. मग या राज्याचा मायबाप कोण आहे?", असा सवाल करत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकास्त्र डागलं.
  • 12:08 PM • 28 Nov 2023

    Uddhav Thackeray : कोणत्या भाषेत प्रचार करणार आहेत?

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचे बाण डागले. ते म्हणाले, "मी मुख्यमंत्री होतो, त्यामुळे मला माहितीये की, माहिती बसल्या जागेवर येते. फिरण्याची गरज नसते. आज जे असंवैधानिक मुख्यमंत्री आहेत, ते स्वतःचं घर सोडून इतरांची घरं धुंडाळताहेत. आज मुख्यमंत्री कुठेय असं विचारलं, तर ते तेलंगणाला गेले आहेत. तेलंगणात जाऊन कोणत्या भाषेत भाषण करणार आहेत?", असा टोला ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
  • 11:49 AM • 28 Nov 2023

    mla disqualification news : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी

    महेश जेठमलानी - 21 जून 2022 चा ठरावाची मूळ प्रत अध्यक्ष यांच्याकडे कोणी आणि केव्हा सादर केली?सुनील प्रभू - पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपाध्यक्ष यांच्याकडे सादर केली.जेठमलानी - हा ठराव कधी सादर केला?सुनील प्रभू - उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात बैठकीनंतर ही प्रत सादर केली.जेठमलानी - २१ जून २०२२ रोजी पारित केलेले अशा प्रकारचे पारित केलेले मूळ प्रस्ताव अध्यक्षांकडे सादर करणे गरजेचे आहे का ? हा कारवाईचा भाग आहे का ?प्रभू - यापूर्वी जेव्हा असे ठराव दिले, तेव्हा संबंधित पक्षांनी ठरावाची मूळ प्रत सादर केलेली आहे.जेठमलानी - अध्यक्ष यांच्याकडे ठरावाची मूळ प्रत दिल्याचे दिसत नाही.जेठमलानी - विधानसभा अध्यक्षांचा नोंदींमध्ये अशी कुठलीही प्रत दिसत नाही. प्रत म्हणजे मूळ ठरावाची कॉपी.प्रभू - मूळ प्रत सादर केलेली आहे. ती रेकॉर्ड वर आहेप्रभू - तेव्हाच तर आम्ही ठरावाची मूळ प्रत सादर केलेली आहे. मूळ प्रत सादर केलेली आहे. ती रेकॉर्ड वर आहे.जेठमलानी - मूळ प्रत अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना सादर केली असे तुम्ही म्हणता पण ते खोटं आहे.सुनील प्रभू - हे खरं नाहीजेठमलानी - मूळ प्रत अध्यक्षांना सादर केली, या वक्तव्यावर आपण ठाम आहात का?प्रभू - ते रेकॉर्ड वर आहे.
  • ADVERTISEMENT

  • 11:49 AM • 28 Nov 2023

    Maratha Reservation : वडेट्टीवारांनी भुजबळांनाच सुनावले खडेबोल

    शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास विरोध केला आहे. शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले, "हा हास्यास्पद प्रकार आहे. राज्यातला एक मंत्री शिंदे समिती बरखास्त करा म्हणतो आणि सरकार त्यांचं ऐकत नाही. एकाच घरात राहणारे एकमेकांशी भांडण्याचा हा प्रयोग दिसतो. समिती बरखास्त करावी की नाही करावी हे आम्ही अधिवेशनात मांडू. पण, शिंदे समिती गठित झाले तेव्हा मंत्री म्हणून भुजबळ यांनी भूमिका स्पष्टपणे मांडला हवी होती", अशा शब्दात वडेट्टीवारांनी भुजबळांना सुनावलं.
  • 11:40 AM • 28 Nov 2023

    Maratha Reservation : जरांगे पाटलांना सद्बुद्धी मिळो, वडेट्टीवारांचा चिमटा

    लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. लायकी हा शब्द जरांगे पाटलांनी मागे घेतला. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "कोण काय म्हणतं यापेक्षा सरकार काय करतं? सरकारने त्यांना आश्वासित केलेलं आहे. सरकारच्या भूमिकेकडे आम्ही लक्ष ठेवून बसलो आहे. जरांगे यांनी जर शब्द मागे घेतला असेल तर अशी सद्बुद्धी त्यांना मिळो. त्यांच्या मुखातून असे कुठलेही शब्द येऊ नये. कोणत्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये, गुण्या गोविंदाने राहावे, ज्यांच्या त्यांच्या हक्कच त्यांना मिळावं, तो शब्दमागे घेतल्याबद्दल जरांगे पाटलांना धन्यवाद देतो", अशी भूमिका वडेट्टीवारांनी मांडली.
follow whatsapp

ADVERTISEMENT