लाइव्ह

Marathi News Live Update : नितीश कुमार यांनी 9 व्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 08:11 PM • 28 Jan 2024

    Marathi News Live Update : ज्यांना आपण सत्तेवर बसवलं त्यांनीच घात केला- प्रकाश आंबेडकर

    भाजपला असं वाटतं आहे की जे आपलं हक्काचं होतं, जे वैदिक परंपरेचं होतं ते आरक्षणातून इतरांकडे चालल आहे. मात्र कालच्या निर्णयानंतर भाजप मूग गिळून गप्प बसली कारण या निर्णयामुळे आपलं नुकसान झालं आहे. ज्यांना आपण सत्तेवर बसवलं त्यांनीच आपला घात केला असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
  • 05:26 PM • 28 Jan 2024

    Marathi News Live Update : नितीश कुमार यांनी 9 व्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    नितीश कुमार यांनी त्यांच्या पक्षासह भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील झाल्यानंतर 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता आणि आरजेडी सोबतच्या सरकारमधून त्यांचा पाठिंबा काढून घेतला. दरम्यान भाजपच्या पाठिंब्यासोबत नितीश कुमार यांनी नवं सरकार बिहारमध्ये स्थापन केलं आहे. नितीश कुमार यांच्यसह भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
  • 04:05 PM • 28 Jan 2024

    रिफायनरी होऊ देणार नाही म्हणणाऱ्याची… नारायण राणे यांचा विरोधकांना टोला

    एमआयडीसी जागेत असणारी गोशाळा हे पवित्र काम आहे. याला राजकारण्यांनी विरोध करू नये. कोकणात रिफायनरी मी करणारच. जे रिफायनरी होऊ देणार नाही असे म्हणत होते त्यांची आता आवळात चालली आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधकांना लगावला. तसेच, आरक्षण मुद्यावर मी आज बोलणार नाही असेही ते म्हणाले.
  • 04:05 PM • 28 Jan 2024

    Maharshtra Breaking News Live : मनोज जरांगे-पाटील उद्या शिवरायांच्या दर्शनासाठी किल्ले रायगडला जाणार

    मराठा आंदोलन शंभर टक्के जिंकलं असून मनोज जरांगे पाटील 29 जानेवारी रोजी रायगडावर शिवरायांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. 'काल एक दिवाळी दुसरी दिवाळी अध्यादेश मिळाल्यावर, पाहिले प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार मराठ्यांनी हे 100 टक्के आंदोलन जिंकले आहे उद्या अंतरवलीमधून रायगडकडे निघणार.' असं जरांगे पाटील म्हणाले.
  • ADVERTISEMENT

  • 03:07 PM • 28 Jan 2024

    सरकार आणि पक्ष ओबीसींच्या बाजूने – बावनकुळे

    राज्य सरकार आणि पक्ष ओबीसी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी भूमिका स्पष्ट आहे. पण ओबीसींवर अन्याय होणार नाही असे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
  • 01:47 PM • 28 Jan 2024

    सर्व शाळात पहिली ते दहावी मराठी भाषा अनिवार्य करा- राज ठाकरेंची मागणी

    विश्व मराठी संमलेनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं की, 'सर्व शाळात पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी. पंतप्रधानांना आपल्या राज्याबाबत प्रेम लपवता येत नाही, तर आपण का लपवावं. समोरच्या व्यक्तीशीही मराठीतच बोला.' असे आवाहन राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला केले.
  • ADVERTISEMENT

  • 12:12 PM • 28 Jan 2024

    Marathi News Live Update : ओबीसींवर आक्रमण होणार...नारायण राणेंचा शिंदे सरकारच्या भूमिकेला विरोध

    शिंदे सरकारने कुणबी नोंदी आढळून आलेल्या मराठा समाजातील लोकांना जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सवलती देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिंदे सरकारच्या भूमिकेला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी विरोध केला आहे.
  • 11:12 AM • 28 Jan 2024

    Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची केली फसवणूक- खासदार विनायक राऊत

    'सरकारने जारी केलेल्या अध्यादेशानुसार, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत. मनोज जरांगे यांच्या लढ्याला काही प्रमाणात यश मिळाले. जोपर्यंत सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांनी हा लढा थांबवू नये. सकल मराठा समाजाला कालच्या अध्यादेशातून काही मिळालं नाही. अध्यादेश देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली,' अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
  • 10:17 AM • 28 Jan 2024

    Marathi News Live Update : अंतरवाली सराटीत आज 123 गावातील मराठा बांधवांची बैठक

    मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठ्यांची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मोठा संघर्ष केला. यावेळी मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यानंतर काल राज्य सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे राज्यभरातल्या मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.
  • 09:35 AM • 28 Jan 2024

    Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात उद्या सुनावणी

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात उद्या सुनावणी होणार आहे. जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर ही सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकरांना 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. पण उद्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार याकडे लक्ष आहे. शिवसेनेच्या निकालाचं परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावर होणार का? हे सर्वांसाठी महत्वाचं असेल.
  • 09:29 AM • 28 Jan 2024

    Marathi News Live Update : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत. सकाळी श्री दुर्ग रायरेश्वर ते प्रतापगड दुर्ग मोहीम सांगता समारंभात ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी मंत्री शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज याच्या विवाह सोहळ्यास ते हजर राहणार आहेत.
follow whatsapp

ADVERTISEMENT