Telangana Election Results 2023 Live : तेलंगणात मुख्यमंत्री KCRची हॅट्ट्रीक हुकली, जनतेची काँग्रेसला साथ
Telangana election Results 2023 Latest Updates in Marathi : तेलंगणात केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहे. तेलंगणातील जनतेने सत्तेच्या चाव्या कोणाकडे सोपवल्या याचा निर्णय आज होणार आहे. राज्यातील विधानसभेच्या 119 जागांसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. यावेळी 2290 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
एक्झिट पोलच्या कौलानुसार तेलंगणामध्ये काँग्रेस आणि केसीआर यांच्या बीआरएसमध्ये थेट लढत आहे. भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव गेली 10 वर्षे सत्तेत आहेत. त्यामुळे ते विजयाची हॅट्रिक करू शकणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने बीआरएसला फटका बसत असल्याचे दाखवले आहे. सर्वेक्षणानुसार, तेलंगणामध्ये सत्ताविरोधी लाट आहे (Telanagana Vidhan Sabha Nivadnuk Nikal). त्यामुळेच बीआरएससाठी कठीण होऊ शकते. हैदराबादमध्ये ती फारशी प्रभावी नसली तरी तेलंगणाच्या दक्षिण, मध्य आणि उत्तर भागात सत्ताविरोधी लाट विशेषतः मजबूत आहे.
एक्झिट पोलनुसार, उत्तर तेलंगणामध्ये (तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल) बीआरएसच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. इथे काँग्रेसला 2/3 आणि भाजपला – 1/3 मते मिळत आहेत, पण मध्य आणि दक्षिण भागात हे प्रमाण काँग्रेससाठी 90% आणि भाजपला 10% आहे. मात्र, राज्यात सत्ताविरोधी लाट असूनही, सध्याचे मुख्यमंत्री केसीआर यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून लोकांनी पसंती दिली आहे. अशा स्थितीत सत्तेच्या चाव्या कोणाकडे येणार? त्याचा निर्णय मतमोजणीनंतरच होणार आहे. तेलंगणातील मतमोजणीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचत रहा…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 03:37 PM • 03 Dec 2023
तेलंगणात काँग्रेसच्या विजयानंतर रेवंत रेड्डीने काढला रोड शो
तेलंगणात काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर रेवंत रेड्डीने हैदराबादमध्ये रोड शो केला आहे. काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी डीसीपी अंजनी कुमार यांची भेट घेतल्यानंतर हा रोड शो काढला होता. - 02:49 PM • 03 Dec 2023
के चंद्रशेखर राव गजवेलमधून आघाडीवर तर कामरेड्डीमधून पिछाडीवर
मुख्यमंत्री आणि बीआरएसचे उमेदवार के. चंद्रशेखर राव हे भाजपचे एटाला राजेंद्र यांच्यापेक्षा 9766 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 31,631 मते मिळाली आहेत. तर राव हे त्यांच्या दुसऱ्या जागेवरून काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांच्या पिछाडीवर आहे. - 02:35 PM • 03 Dec 2023
रेवंत रेड्डी यांच्या कार्यालयात सीएम सीएमचे नारे
रेवंत रेड्डी यांच्या कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'सीएम सीएम'चे नारे द्यायला सुरूवात केली आहे. राज्यातील एकूण 119 जागांपैकी काँग्रेस 63 जागांवर आघाडीवर आहे, तर बीआरएसने 41 जागा जिंकल्या आहेत. आणि भाजपने अवघ्या 7 जागा जिंकल्या आहेत. - 02:24 PM • 03 Dec 2023
तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या निवासस्थानी पोलीस दाखल
तेलंगणाचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी डीजीपी अंजनी कुमार आणि इतर पोलीस दाखल झाले आहेत. तेलंगणात काँग्रेस 63 जागांवर आघाडीवर आहे, तर बीआरएसने 41 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला अवघ्या 7 जागा मिळाल्या आहेत - 11:50 AM • 03 Dec 2023
मुख्यमंत्री केसीआर यांना टाकल मागे, रेवंत रेड्डी 2,585 मतांनी आघाडीवर
काँग्रेसने खम्मम जिल्ह्यातील अस्वराओपेट मतदारसंघात प्रथमच विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ए रेवंत रेड्डी हे कामारेड्डीमध्ये 2,585 मतांनी आघाडीवर आहेत. तर प्रतिस्पर्धी मुख्यमंत्री केसीआर मागे पडले आहेत. - 11:45 AM • 03 Dec 2023
बीआरएस नेते काँग्रेसच्या संपर्कात, काँग्रेस नेत्याचं मोठं विधान
बीआरएस नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न विचारला असता रेणूका चौधरी म्हणाल्या, बीआरएसचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते कधी आमचे (आमदार) घेऊन जातात, तर कधी त्यांचे इथे येतात. आजचे राजकारण असे आहे. तसेच "आम्हाला आमच्या कोणत्याही आमदारावर शंका नाही. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. - 10:10 AM • 03 Dec 2023
तेलंगणात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
हैद्राबादमधील पक्षाचे प्रदेश प्रमुख रेवंत रेड्डी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस समर्थकांनी फटाके फोडले आहे. ताज्या निकालानुसार, राज्यात काँग्रेस 64 जागांवर, बीआरएस 41 जागांवर आणि भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे. - 09:57 AM • 03 Dec 2023
तेलंगणात आता ईव्हीएम मतांची मोजणी सूरू
तेलंगणात आता पोस्टल बॅलेटनंतर ईव्हीएम मतांची मोजणीला सुरुवात झाली आहे. या ईव्हिएमच्या मतमोजणीतही काँग्रेसने बीआरएसवर आघाडी कायम ठेवली आहे. तेलंगणातील 119 जागांपैकी 103 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेसला 61 जागा, बीआरएसला 34 जागा आणि भाजपला 6 जागा मिळाल्या आहेत. - 09:49 AM • 03 Dec 2023
तेलंगणात काँग्रेसची बीआरएसवर मोठी आघाडी
तेलंगणाच्या सुरुवातीच्या निकालात काँग्रेस पक्षाने भारत राष्ट्र समितीवर मोठी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत ज्या 84 जागांचे ट्रेंड समोर आले आहेत त्यापैकी काँग्रेस 52, बीआरएस 26 आणि भाजप 5 जागांवर आघाडीवर आहे. - 09:34 AM • 03 Dec 2023
तेलंगणात काँग्रेस आघाडीवर, भाजपनेही उघडले खाते
तेलंगणात पोस्टल बॅलेट मतांची मोजणी सूरू आहे. यामध्ये 29 जागांचे निकाल हाती आले आहे. यात बीआरएस 9 जागांवर, काँग्रेस 17 आणि भाजपा 2 जागांवर आघाडीवर आहे. - 09:28 AM • 03 Dec 2023
तेलंगणात पोस्टल बॅलेट मतांची मोजणी सुरू
तेलंगणात पोस्टल बॅलेट मतांची मोजणी सुरू आहे. काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात चुरशीची लढत सूरू आहे. सध्या 119 पैकी 19 जागांचे निकाल समोर आले आहेत, त्यापैकी बीआरएस 7 वर, कॉंग्रेस 10 आणि भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे. - 09:11 AM • 03 Dec 2023
तेलंगणमध्ये काँग्रेस आणि बीआरएसमध्ये चुरशीची लढत
तेलंगणमध्ये सुरूवातीच्या निकालात काँग्रेस आणि बीआरएसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते आहे. भाजपने अद्याप खाते उघडलेले नाही. सर्व एजन्सीच्या एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेस बीआरएसवर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. - 09:07 AM • 03 Dec 2023
एक्झिट पोल पाहून काँग्रेस खूश, बीआरएसला विजयाचा विश्वास
तेलंगणासाठी जाहीर झालेले जवळपास सर्वच एक्झिट पोल काँग्रेसच्या विजयाचे संकेत देत आहेत. पक्षाचे नेते क्लाउड नाइनवर आहेत आणि तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख ए रेवंत रेड्डी यांनी 80 हून अधिक विधानसभा मतदारसंघात विजयाचा दावा केला आहे. दुसरीकडे, बीआरएस स्वबळावर बहुमत मिळवण्याबाबत आशावादी असून पक्षाचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी त्यांच्या पक्षाला 70 जागा आरामात मिळतील असे म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT